Make Up Products

आमच्या 8व्या वाढदिवसानिमित्त एपिक सेलमध्ये लुटा शॉपिंगची मजा, घ्या ही 8 सौंदर्य उत्पादने

Vaidehi Raje  |  Mar 7, 2022
आमच्या 8व्या वाढदिवसानिमित्त एपिक सेलमध्ये लुटा शॉपिंगची मजा, घ्या ही 8 सौंदर्य उत्पादने

आजचा दिवस केवळ नेहमीचा नॉर्मल सोमवार नाही तर तो एक खास सोमवार आहे कारण आज आमचा, POPxo चा 8वा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी तुमच्या आयुष्यात येऊन आम्हाला 8 वर्षे झाली व म्हणून आम्ही हा खास दिवस तुमच्याबरोबर साजरा करत आहोत. गेल्या  8 वर्षांपासून आपण  BFF म्हणून आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला एकत्र सामोरे जात आहोत. म्हणूनच आपल्यातील हे खास नाते साजरे करण्यासाठी, आम्हाला वाटले की आपल्या BFF साठी खास ऍनिव्हर्सरी सेल आणावा! चला तर मग शॉपिंग करूया ना? 

आज आमच्या वाढदिवसानिमित्त खास तुमच्यासाठी आमच्या सर्वाधिक विकल्या जाणार्‍या सौंदर्य उत्पादनांवर फ्लॅट 41% सूट आहे आणि आयशॅडो पॅलेटपासून नेल किटपर्यंत, प्रत्येक सौंदर्यप्रेमीसाठी काहीतरी खास नक्कीच आहे. ज्या लोकांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला साथ दिली आणि आमच्यावर प्रेम केले त्या सर्वांसाठी आम्ही ही खास भेट आणली आहे. 

POPxo ऍनिव्हर्सरी सेलमध्ये या 8 ब्युटी डील्सचा नक्की फायदा करून घ्या

इंटरनेटवर सर्वांच्या नजरा वेधून घेणारा लूक मिळवा 

तुम्हाला रेचलसारखे ‘इट गर्ल’ व्हाइब्स मिळवायचे असतील किंवा वेरोनिकासारखा diva लूक हवा असेल तर हे किट तुम्हाला सगळ्यांच्या नजरा वेधून घेईल असा लूक तयार करण्यात मदत करेल. हे किट पटापट मस्त तयार होणाऱ्या स्मार्ट लूक हवा असणाऱ्यांसाठी योग्य आहे कारण ते वापरण्यास सोपे तर आहेच शिवाय या पॅलेटमध्ये भरपूर शेड्स आहेत. या पॅलेटसह क्लासिक, स्मोकी आईज मिळवा किंवा एक मजेदार, युफोरिया-प्रेरित लुक बनवा कारण या पॅलेटमध्ये या सर्व लुक्ससाठी आवश्यक त्या शेड्स आहेत. 

अल्टिमेट पॉवर मूव्ह

तुम्हाला लिपस्टिक प्रिय आहेत? मग तर तुमच्यासाठी आमच्याकडे अगदी तुम्हाला हवे असलेले प्रॉडक्ट आहे. या किटमध्ये तीन क्रीमी मॅट रंग आहेत जे प्रत्येक मूड आणि प्रसंगासाठी सूट होऊ शकतील.  एक ब्राईट पिंक,एक डीप रेड लिपस्टिक आणि ट्र्यु रेड अशा तीन शेड्स यात तुम्हाला मिळतील. जर तुम्ही तुमच्या खास व्यक्तीबरोबर डेटवर जाणार असाल किंवा तुमच्या मैत्रिणींबरोबर बाहेर धमाल मज्जा करणार असाल, या लिपस्टिक किटमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या शेड्स नक्कीच आहेत. 

हे किट तर सध्या व्हायरल आहे

या नेल किटमधील शेड्स बघितलेत का? समर मॅनिक्युअरसाठी हे नेल किट तर आवश्यकच आहे. या किटमधील खास समर शेड्स तुमच्या समर फॅशनबरोबर अगदी तंतोतंत मॅच होतील अशाच आहेत. ऑन-ट्रेंड दिसायचे असेल तर हे किट आपल्या कलेक्शनमध्ये असायलाच हवे. 

मल्टी-टास्कर

या पॅलेटचे नावच सांगते की त्यात आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आहात. हे पॅलेट एकदा बघा आणि तुमच्या मनात ‘हॉट डॅम! अशीच प्रतिक्रिया येईल याची आम्हाला खात्री आहे. या किटमध्ये तुम्हाला मेकअपसाठी लागणाऱ्या आयशॅडो, ब्लश, हायलाइटर आणि सेटिंग पावडर या सर्व आवश्यक गोष्टी आहेत. त्यामुळे घाई असताना फक्त हे किट पर्समध्ये कॅरी केले तुम्हाला पटकन कुठेही टच अप करता येईल कारण टच अपसाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट या किटमध्ये आहे. 

प्रिटी इन पिंक 

गुलाबी रंग आवडतो?  तर मग हे किट तर तुमच्या अगदी आवडीचेच आहे. कारण या सुंदर गुलाबी शेड्स दिवसभर ऑफिसमध्ये वावरण्यासाठी आणि रात्रीही नाईट आउटसाठी तयार होताना सूट करतात. या उत्पादनांमध्ये व्हिटॅमिन ई चे गुण आहेत आणि सुपर पिग्मेंटेड आहेत त्यामुळे तुमचे ओठ नेहमीच सुंदर आणि हायड्रेटेड तर दिसतील शिवाय व्हिटॅमिन ई मुळे तुमच्या ओठांचे पोषण देखील होईल. 

तुमचा #MOTD व्हायरल करा

नुकताच मेकअप करायला शिकला आहात?  मग तर ही किट खास तुमच्यासाठीच आहे. आता मेकअप करण्यासाठी प्रो असण्याची गरज नाही. कारण या आयशॅडो किटमध्ये चार ब्लेंडेबल पिगमेंटेड शेड्स आहेत ज्या तुमच्या पापण्यांवर छान उठून दिसतील. क्रीज आणि बाहेरील V मध्ये मॅट शेड्स लावा आणि नंतर पापणीवर बोटांच्या मदतीने ग्लिटर लावा की झाला तुमचा सुंदर आयमेकअप! तो ही अगदी झटपट! 

सर्वांची आवडती लिप किट 

जर तुम्हीही माझ्यासारख्याच न्यूड लिपस्टिक शेड्स प्रेमी असाल तर दिल थाम के बैठिये! कारण तुम्ही या किटच्या अगदी प्रचंड प्रेमात पडणार आहेत. POPxo नो ड्रामा मिनी लिप किट बघितल्यावर तुम्हाला ते घेतल्याशिवाय चैन पडणार नाही. गुलाबी आणि कोरल रंगांपासून ते तपकिरी रंगांपर्यंत, या सेटमध्ये प्रत्येकासाठी काहीतरी आहे.

तुमच्या  #स्पायसी मॅनिक्युअर मूडसाठी परफेक्ट 

तुमच्यापैकी ज्यांना नेल केअरची आवड आहे आणि ज्यांचा लूक परफेक्ट नेलपेंटशिवाय पूर्ण होत नाही अशांसाठी Queenin’ मिनी नेल किट अगदी परफेक्ट प्रोडक्ट आहे. या किटमध्ये तुम्हाला कॉन्फिडन्ट लूक देण्यासाठी ब्राईट लाल शेड्स आहेत ज्या जगाला तुमचा कॉन्फिडन्स दाखवतील. तसेच हे नेलपेंट्स चिप-रेझिस्टंट आणि अगदी अपारदर्शक आहेत. त्यामुळे त्यांचा केवळ एक कोटही पुरेसा आहे.  

काय मग शॉपिंगसाठी तयार ना? आमच्या या ऍनिव्हर्सरी सेलमध्ये शॉपिंग करा आणि शॉपिंगबरोबरच मस्त डिस्काउंटचाही आनंद लुटा! 

Featured Image: Instagram

Read More From Make Up Products