नखं

#POPxoReviews: विश्वास ठेवा, या तीन नेल किट्स कोणत्याही मूड आणि कार्यक्रमासाठी आहेत अप्रतिम

Trupti Paradkar  |  Nov 11, 2021
#POPxoReviews: विश्वास ठेवा, या तीन नेल किट्स कोणत्याही मूड आणि कार्यक्रमासाठी आहेत अप्रतिम

माझ्या इतक्या वर्षाच्य अनुभवात, चुका करत करत मी एक गोष्ट शिकली आहे की ब्युटी ट्रिटमेंट्स जसं की हेअर कट, हायलाईट्स हे नेहमी प्रोफेशनल व्यक्तीकडूनच करून घ्यावे. पण याला एक अपवाद नक्कीच आहे… तो म्हणजे स्वतःची नखं स्वतःच रंगवणं. मला तुमचं माहीत नाही पण माझ्या आठ हजाराहून जास्त मॅनिक्युअर इन्स्टाग्रामवर सेव्ह आहेत. माझ्या हातात वेळ असल्यामुळे आणि DIY करण्याची सवय असल्यामुळे, मी नखांवर सतत नवनवीन प्रयोग करत असते. प्रामाणिकपणे सांगते मला माझी नखं रंगवण्यात खूप आनंद मिळतो. असं असलं तरी नखांसाठी परफेक्ट शेड निवडणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. यासाठीच माझ्यासाठी परफेक्ट नेलपॉलिश शोधणं हे एक मिशनच आहे.  अशा नेलपॉलिश ज्यामध्ये व्हायब्रंट रंग असतील, जास्त दिवस टिकतील आणि त्या लावणं अतिशय सोपं असेल.

त्यामुळे मी स्वतःला आता यात एक तज्ञ अथवा पारखी म्हणून ओळखू लागली आहे. सहाजिकच आज मी तुम्हाला अशा एका नेल किटची ओळख करून देणार आहे, ज्यामुळे तुम्हाला मेनिक्युअपसाठी सलॉनमध्ये पैसे खर्च करावे लागणार नाहीत. यासाठी तुम्ही POPxo ने नुकत्याच लॉंच केलेल्या नेटकिटवर विश्वास ठेवू शकता. सध्या हे नेलकिट खूपच प्रसिद्ध होत आहेत. कोणताही ऋतू असो वा कोणताही ट्रेंड तुमच्या स्कीन टोन, मूड आणि आऊटफिट्स साठी बेस्ट आहेत या शेड्स

विश्वास ठेवा, या किट्समुळे तुमची नखं खूपच स्टायलिश दिसणार आहेत

हे काय आहे ?

संपूर्ण ब्युटी प्रॉडक्टचा विचार केल्यास हे एक अप्रतिम उत्पादन आहे. POPxo ने नेल डिपार्टमेंटमधला दर्जा नक्कीच वाढवला आहे. POPxo नेट किट्समध्ये आहेत  Chillin’, Hustlin’ आणि Vibin’ या मुख्य तीन शेडचे किट आहेत. ज्या प्रत्येक किटमध्ये पाच निरनिराळ्या शेड्स आहेत. अप्रतिम रंगाचे हे किट्स तुम्हाला नक्कीच आवडतील. कारण ते क्रिएटिव्ह मेनिक्युअर करण्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. याच्या मदतीने तुम्ही Pinterest वरील एखादे मेनिक्युअर रिक्रिएट करू शकता, तुमची बोटं हवी तशी तुम्ही रंगवू शकता. कारण तुम्हाला हवं ते सर्व या किट्समध्ये आहे. तुमच्याजवळ एवढ्या छान नेलपेंट्स आहेत त्याही अगदी स्वस्त किंमतीत… आहे ना फायद्याचा सौदा.

तुम्हाला हे का आवडेल ?

तुम्हाला विश्वास बसणार नाही पण या किटची किंमत आहे फक्त 249 रू. आणि एवढ्या पैशात तुम्हाला वर्षभरासाठी पाच अप्रतिम शेड मिळतात. आहे ना मजेशीर गोष्ट… या नेल किटमध्ये ते सर्व आहे जे तुम्हाला मेनिक्युअर करण्यासाठी गरजेचं आहे. घाणेरड्या आणि साध्या नखांमुळे तुम्हाला हवी तशी लोकप्रियता मिळणार नाही. म्हणूनच तुम्हाला या किटची गरज आहे.  यात आहे समर नियॉन ते फेस्टिव्ह शिमर आणि ब्रिझी न्यूड ते ब्रशिंग पिंक… त्यामुळे तुम्ही तुमच्या नेल कलेक्शनमधून ट्रेंड सेट करू शकता. जा आणि पटकन घ्या… विश्वास ठेवा तुम्हाला या नक्कीच आवडतील.

रेटिंग 

टेक्चर – 9/10

पॅकेजिंग –  10/10

फॉर्म्युला –  8/10

हे प्रॉडक्ट कसे वापरावे ?

जुनं नेलपॉलिश काढून तुमची नखं तयार करा आणि त्यांना फाई करून परफेक्ट शेप द्या. नखांच्या मध्यभागाकडून नेलपेंट लावण्यास सुरूवात करा. बाजूच्या कडांना नेलपेंट लावा आणि एक स्मूथ स्ट्रोक द्या. पहिल्या कोट सुकल्यावर दुसरा कोट लावा. ज्यामुळे छान फिनिश मिळेल. टॉपकोटने नखं सील करा. नेल पेंट रिमूव्हरने कडांना लागलेलं नेलपेंट काढून टाका. या ब्राईट आणि प्लटरिंग शेड्सच्या मदतीने तुम्ही आणखी काही क्रिएटिव्ह प्रकार नखांवर ट्राय करू शकता.

हे प्रॉडक्ट कसे दिसते ?

त्वरा करा! तुमच्या कार्टमध्ये हे नेलकिट्स असायलाच हवेत.

फिचर इमेज – Ayushi Verma

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

Read More From नखं