सौंदर्य

#POPxoReviews: तुमच्या मुलींच्या गँगमधील प्रत्येकासाठी परफेक्ट ठरणारे असे लिपस्टिकचे कलेक्शन

Dipali Naphade  |  Oct 5, 2021
mini-lip-kit

प्रत्येक मुलीच्या किट्समध्ये अर्थातच लिपस्टिकचे खूप असे कलेक्शन नसते. तुम्हाला हवी असणारी प्रत्येक शेड असणे हे नक्कीच प्रत्येकासाठी शक्य नाहीये. कितीही मेकअपचे वेड असले तरीही प्रत्येक मुलीला वेगवेगळ्या लिपस्टिकच्या शेड्स बदलाव्या वाटणे हे साहजिकच आहे. पण भारतीय त्वचेसाठी अगदी परफेक्ट लिपस्टिक शेड्स शोधून काढणे हे तसे नक्कीच कठीण आहे असे म्हटले जाते. पण आता मात्र POPxo चे नवे मेकअप कलेक्शन लाँच झाले असून तुमच्याकडे याचे मिनी लिप किट्स असायलाच हवेत. तुम्हाला हव्या असणाऱ्या लिपस्टिकच्या शेड्स एकाच ठिकाणी आता मिळू शकतात आणि ते मिळविण्यासाठी तुम्हाला फक्त क्लिक करायचे आहे ते MyGlamm संकेतस्थळावर. 

माझ्या हातात POPxo Makeup Collection मिनी लिप किट्सच्या सेटमधील तीन गोष्टी सापडल्या आहेत आणि खरं सांगू का मला तर या उत्पादनाने वेडच लावले आहे. 

नक्की काय आहे हे?

द पॉपएक्स मेकअप कलेक्शन मिनी लिप किट हे तीन सेट्समध्ये समाविष्ट आहे – ‘पॉवर ट्रिप’ (Power Trip), ‘नो ड्रामा (No Drama)’ आणि ‘प्रिटी मेस’ (Pretty Mess). या तिन्ही किट्समध्ये प्रिटी पिंक्स, विविध न्यूड्स आणि बोल्ड ह्यूजचा समावेश आहे. सर्वांसाठी यामध्ये शेड असून तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये रंग तुम्हाला सापडेल. 

आम्हाला हे का आवडले?

जेव्हा तुम्ही याचा वापर करता तेव्हा तुम्हाला हे नक्कीच मनाला भावते. वेगवेगळ्या मेकअप करणाऱ्यांना अगदी योग्य पिगमेंटेशनसह योग्य फॉर्म्युला यातून सापडतो. इतकंच नाही तर तुमच्या ओठांवर हे अगदी योग्य प्रमाणात लावता येतात आणि अधिक आकर्षक दिसतात. विटामिन ई युक्त असल्याने ओठांना अगदी आकर्षक आणि अप्रतिम लुक मिळतो. किट्स सेट्समधील प्रत्येक लिपस्टिक ही क्रिमी मॅट फिनिश असून सेल्फी काढताना तुमच्यावर अधिक उठावदार दिसते. सर्वात मनाला भावणारी गोष्ट म्हणजे प्रत्येक किट आहे केवळ रू. 349 मध्ये. 

रेटिंग 

कलर पे ऑफ – 10/10
पॅकेजिंग – 9/10
फॉर्म्युला – 10/10

कसे वापरावे 

हे मिनी लिप किट्स वापरणे अगदी सोपे आहे. लिप बामवर हे तुम्ही आरामात वापरू शकता अथवा तुमचे ओठ फाटलेले नसतील तर तुम्ही नुसतीसुद्धा लाऊ शकता. या लिप्पीचा अगदी वेगळा बिल्डेबल फॉर्म्युला आहे आणि त्याअर्थी तुमचा मेकअप लुक करण्यासाठी तुम्ही याचा नक्कीच प्रयोग करू शकता. 

हे उत्पादन कसे दिसते?

पॉप आर्ट असणारं हे गुलाबी पॅकेजिंग खरेदी करण्यासाठी अधिक सुंदर वाटतं

तुम्ही तुमचा वेळ अधिक विचार करण्यात फुकट दवडू नका. संपूर्ण विकलं जाण्याआधी तुम्ही तुमच्या कार्टमध्ये नक्कीच याचा समावेश करून घ्या!

फिचर इमेज – Eden Norohna

तुमच्यासह सौंदर्याचे भविष्य निर्माण करण्यासाठी POPxo आणि MyGlamm दोघेही एकत्र आले आहेत! तुम्हीही The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि MyGlamm कडून मोफत लिपस्टिकसह मिळवा रू. 1000 चे ब्युटी बेनिफिट्स!

Read More From सौंदर्य