बटाट्याची भाजी प्रत्येकालाच आवडते. बटाटा ही एक अशी भाजी आहे जी प्रत्येकाच्या किचनमध्ये असतेच. एका कच्च्या बटाट्याचा रस त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर करू शकतो. तसंच हा रस वापरून तुम्ही घरगुती फेसपॅक बनवल्यास चेहऱ्यावरील काळे डाग, पिगमेंटेशन आणि टॅनिंगची समस्या दूर होऊ शकते. एवढंच नाहीतर तुमच्या चेहऱ्यावरील गेलेला ग्लोसुद्धा परत येईल. चला जाणून घेऊया बटाट्यापासून बनवता येणारे घरगुती फेसपॅक –
Shutterstock
- उजळ त्वचेसाठी बटाट्याचा फेसमास्क
साहित्य – 3 मोठे चमचे बटाट्याचा रस, 2 मोठे चमचे मध.
कृती – बटाट्याच्या रसात मध मिक्स करा. हे मिश्रण चांगलं फेटून घ्या. मग चेहरा आणि मानेवर लावा. 10 ते 15 मिनिटं ठेवा आणि मग धुवून टाका. तुम्हाला शक्य असल्यास हा उपाय तुम्ही रोजही करू शकता.
असा होईल फायदा – मध तुमची त्वचा मॉईश्चराईज करतो आणि हायड्रेट करून मऊ ठेवतं. बटाट्यातील आम्लगुण नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याला चमकदार बनवण्यात मदत करतात.
- चमकदार त्वचेसाठी लिंबू आणि बटाट्याचा फेसमास्क
साहित्य – 2 चमचे बटाटा रस, 2 चमचे लिंबाचा रस, अर्धा चमचा मध (आवडीनुसार).
कृती – बटाटा आणि लिंबाचा रस मिक्स करा. या मिश्रणात तुम्ही आवडीनुसार मधही मिक्स करू शकता. हा लेप पूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. 15 मिनिटं चेहऱ्यावर तसंच ठेवा. नंतर पाण्याने धुवून टाका. हा उपाय तुम्ही एक दिवसाआड करू शकता.
असा होईल फायदा – लिंबू आणि बटाट्यातील गुण तुमच्या चेहऱ्यावरील जास्तीचं तेल दूर करतात, बंद पोर्स खुले करतात आणि स्किन टोन करण्यात मदतत करतात. तर मधाने तुमची त्वचा हायड्रेट राहते.
- पिंपल्ससाठी बटाटा आणि टोमॅटो फेसमास्क
साहित्य – एक मोठा चमचा बटाट्याचा रस किंवा किस, एक चमचा टोमॅटोचा रस, एक मोठा चमचा मध.
कृती – बटाटा आणि टोमॅटोचा रस मिक्स करा. नंतर त्यात मध घाला आणि चांगली पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. चांगल्या परिणांमासाठी तुम्ही हा उपाय आठवड्यातून दोनदा करू शकता.
असा होईल फायदा – टोमॅटो आणि बटाटा या दोन्हींमध्ये अँटीऑक्सीडंट भरपूर प्रमाणात असतात. जे तुमच्या चेहऱ्यावरील किटाणू दूर करून त्वचा स्वच्छ ठेवतात. तसंच यातील आम्लीय गुणांमुळे बंद पोर्सही मोकळे होतात.
- पिगमेंटेशनसाठी बटाटा आणि तांदूळ पिठीचा फेसमास्क
साहित्य – एक चमचा बटाट्याचा रस, एक चमचा तांदूळाची पिठी, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध.
कृती – हे सर्वांची चांगली पेस्ट बनवा. ती चेहरा आणि मानेवर लावा आणि सुकू द्या. हा फेसपॅक सुकल्यावर स्क्रबसारखा चेहऱ्यावर चोळा आणि धुवून टाका.
असा होईल फायदा – बटाट्याच्या रसाने चेहऱ्यावरील टॅन दूर होतं आणि काळे डागही दूर होतात. तसंच तांदूळाच्या पिठीने चेहऱ्यावरील डेड स्कीनही दूर होते. तर लिंबाच्या रसाने ओपन पोर्स बंद होतात आणि मधाने त्वचा हायड्रेट राहते.
कडूलिंबापासून तयार करा हे घरगुती फेस पॅक
घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.