लॉकडाऊनच्या काळात कितीही तणाव असला तरी आपल्यातील उत्साह कायम ठेवण्याचा प्रयत्न जो तो करत आहे. याला अपवाद आपले सेलेब्सही नाहीत. या लॉकडाऊनच्या काळात एकमेंकाना चॅलेंज करणं तर सुरूच आहे. त्यासोबतच मनोरंजनही सुरू आहे. नुकतंच असं चॅलेंज करून नॉमिनेट करण्यात आलं ते अभिनेता प्रसाद ओकला. पाहा त्यावर प्रसादने दिलेला धमाल रिप्लाय.
मराठी सेलेब्समध्ये सुरू अनोखं चॅलेंज
एकीकडे चॅलेंजच्या नावावर डान्स चॅलेंज, फोटो चॅलेंज सुरू असताना निर्माते आणि दिग्दर्शक रवी जाधव यांनी मात्र मराठी सेलेब्सना नॉमिनेट केलं ते एका रिएलिस्टीक चॅलेंजमध्ये. याबाबतची पोस्ट आणि व्हिडिओ त्यांनी इन्स्टावर शेअर केला. पाहा त्यांचा हा व्हिडिओ.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये रवी यांनी लिहीलं की, ‘मी थांबलोय घरी, नव्या उत्साहाने लिहितोय, वाचतोय, आवडती गाणी ऐकतोय आणि सोबत लादी साफ करतोय!!! कठीण आहे पण मजा येतेय. तुम्हीसुद्धा घरीच थांबा, काळजी घ्या, सुरक्षित राहा. घरबसल्या अशाच काही छान गोष्टी तुम्हीसुद्धा करत असाल तर त्या नक्की Video स्वरूपात तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडलवर share करा. पुढील video साठी मी nominate करतो @ankushpchaudhari आणि @oakprasad या माझ्या मित्रांना.’
चॅलेंजवर प्रसादने केला धमाल व्हिडिओ
रवी जाधव यांनी टॅग करताच प्रसाद ओक यांनीही त्यावर फक्त रिप्लाय न देता धमाल व्हिडिओही शेअर केला. प्रसादने घरात मॉपिंग करत अजून काही अभिनेत्यांना हे चॅलेंज दिलं. पाहा प्रसादचा हा मॉपिंग करतानाचा व्हिडिओ.
या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहीलं की, ‘आमच्ये परम मित्र देवा मंजी @ravijadhavofficial यांच्या आव्हानाचा मान ठेऊन आमी ते पुर्न क्येलेलं हाय.. तवा आता ह्ये फारवर्ड करताना का नाय आपन च्याल्येन्ज करतूय आमच्ये दोस्त लका @ameyzone नादखुळा @siddharth23oct आणि माणणीय @subodhbhave सायबांना होऊन जाऊदे गड्या हो ssssss’
प्रसादने ही पोस्ट टाकताच अमेय वाघ, सिद्धार्थ जाधव, सुबोध भावे आणि रवी जाधव यांनी मजेशीर रिप्लाय दिले.
आता पाहूया प्रसादने चॅलेंज केलेल्यांपैकी कोण हे चॅलेंज पूर्ण करतंय. सध्या लॉकडाऊनच्या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओक अनेक मजेशीर पोस्ट्स शेअर करत आहे. ज्या खूपच मजेशीर आहेत.
अभिनेता अमेय वाघने प्रसादने चॅलेंज करण्याआधी फिंगर चॅलेंज पूर्ण केलं. जे सध्या इन्स्टावर अनेकजण फॉलो करत आहेत.
चॅलेंज हे तर निमित्तमात्र आहे. पण या चॅलेंजमुळे कलाकारांचं आणि त्यांच्यामुळे आपलं तणावाच्या परिस्थितीतही मनोरंजन होत आहे. हे मात्र खरं आहे.
सो…कलाकारांना हेच सांगणं आहे, असेच एकमेकांना चॅलेंज करा आणि आमचं मनोरंजनही करत राहा. तोपर्यंत घरी राहा आणि सुरक्षित राहा.
#coronaheroes ना मराठी कलाकारांचा मानाचा मुजरा
‘एक देश एक आवाज’च्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कलाकारांची मानवंदना
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade