मनोरंजन

रामायणातील क्लायमॅक्स सीन पाहून चाहते का झाले निराश

Trupti Paradkar  |  Apr 20, 2020
रामायणातील क्लायमॅक्स सीन पाहून चाहते का झाले निराश

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या देशभरात लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. ज्यामुळे अनेक मालिकांच्या पुढील भागांचे शूटिंग बंद आहे. लोकांचे मनोरंजन करण्यासाठी दूरदर्शन वाहिनीवरून या आधीच अनेक जुन्या आणि पौराणिक मालिकांचे पुनःप्रसारण केले जात आहे. ज्यामधील रामायण या मालिकेच्या टीआरपीने अक्षरशः उच्चांक गाठला आहे.  या टिआरपीमुळे रामानंद सागर यांची  रामायण मालिका अचानक पुन्हा एकदा सर्वांच्या चर्चेत आली आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांना आजही ही मालिका तितकीच आवडत आहे. ज्यामुळे या मालिकेतील सर्व सीन्स प्रेक्षकांनी अगदी बारकाईने पाहीले आहेत. आता या मालिकेचं पहिले पर्व संपून लवकरच उत्तर रामायणाला सुरूवात होणार आहे. लॉकडाऊनमध्ये दिवसभरात दोनदा प्रसारित होणारा हा शो तितक्याच आवडीने लोकांनी पाहिला. एवढंच नाही तर या मालिकेच्या काही सीन आणि क्लायमॅक्समध्ये बदल केल्याबद्दल त्यांनी वाहिनीकडे नाराजी देखील व्यक्त केली आहे. सहाजिकचं यामुळे प्रेक्षक आणि वाहिनीच्या प्रमुखांकडून आलेल्या कंमेट्मुळे सध्या सोशल मीडियावर एक वेगळंच युद्ध सुरू झालं आहे. 

खरंच रामायणाचा शेवट बदलून दाखवला आहे का

रामायणाच्या या क्लायमॅक्स सीनमध्ये रावणाचा वध दाखवण्यात आहे. रावणाच्या वधानंतर राम, लक्ष्मण आणि सीता पुन्हा अयोध्येला परततात. मात्र हा क्लायमॅक्स सीन पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावरून चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त देखील केली आहे. लोकांच्या मते रावणाच्या वधादरम्यान अनेक गोष्टी एडिट करून दाखवल्या आहेत. यातील काही सीन्स पाहण्यासाठी प्रेक्षक अतिशय आतूर होते. मात्र ते एडिट केल्यामुळे त्यांची घोर निराशा झाली आहे. एका प्रेक्षकाने तर ट्वीट करून सांगितले आहे की, “रामायणात लक्ष्मण आणि त्याची पत्नी ऊर्मिला जवळजवळ एक तपानंतर एकमेकांना पुन्हा भेटतात. मात्र रामायणाच्या क्लायमॅक्समध्ये त्यांची भेट दाखवण्याच आली नाही. एका प्रेक्षकाला तर या एडिट केलेल्या रामायणामुळे हनुमान छाती फाडून रामसीतेचं दर्शन घडवतो तो सीन पाहता आलेला नाही. थोडक्यात प्रेक्षकांच्या मते रामायण एडिट करून दाखवण्यात आल्यामुळे त्यांना काही महत्त्वाचे सीन पाहता आले नाहीत. चाहत्यांच्या मते रामानंद सागर यांच्या पौराणिक मालिका या आर्टवर्कवर बेस आहेत. ज्यामुळे हे सर्व सीन्स रामायणामधून एडिट करण्याची मुळीच गरज नव्हती. यासाठीच प्रेक्षकांनी सोशल मीडियावरून दूरदर्शन वाहिनीला असं ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. सध्या दूरदर्शनवर रामायणातील एक पर्व संपून पुढील पर्व सुरू होत आहे. रावणाच्या वधानंतर रामायणात पुढे काय घडतं हे दाखवण्यात येणार आहे. उत्तर रामायणामधून थोड्याच दिवसात ‘लवकुश’ची एन्ट्री दाखवण्यात येणार आहे. उत्तर रामायणात तरी असे सीन्स एडिट न करता दाखवावे यासाठी प्रेक्षक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत.

वाहिनीकडून आले असे प्रति उत्तर –

प्रेक्षकांनी केलेल्या या सर्व प्रश्नांना प्रसार भारतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रति उत्तर दिलेलं आहे. त्यांच्या मते या मालिकेतील कोणताही सीन एडिट केलेला नाही. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी शेखर यांनी याबाबत असं स्पष्टीकरण दिलं आहे की, “आपल्या भारतीय महाकाव्ये अतिशय सुंदर आहेत. या काव्यांमध्ये मुळ कथेसोबतच अनेक छोट्या कथा आणि संकल्पना गुंफण्यात आलेल्या आहेत ही यातील एक अतिशय कल्पक गोष्ट आहे. मात्र अशा छोट्या- छोट्या गोष्टी टिव्हीवरील मालिकांमधून दाखवणं नक्कीच शक्य नाही. मात्र तुमच्या या सूचना लक्षात ठेवून भविष्यात याबाबत नक्कीच विचार केला जाऊ शकतो “

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

प्रसाद ओकने स्वीकारलं हे अनोखं चॅलेंज

अर्चना पूरनसिंहने खराट्याने केलं लॉन स्वच्छ ते पाहून मेड झाली थक्क

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क… सांगतेय विद्या बालन

 

Read More From मनोरंजन