बॉलीवूड

प्रियंका चोप्रा वडिलांच्या आठवणीने भावुक, शेअर केला बालपणीचा फोटो

Trupti Paradkar  |  Apr 28, 2022
Priyanka Chopra misses her father shares childhood photo

अभिनेत्री प्रियंका चोप्राने बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही नाव कमावलं आहे. लग्नानंतर प्रियंका पती निक जोनससोबत अमेरिकेत शिफ्ट झाली. ज्यामुळे ती बॉलीवूड आणि हॉलीवूड अशा दोन्ही फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिव्ह आहे. एवढंच नाही तर तिचे सोशल मीडियावरही अनेक फॉलोव्हर्स आहेत. सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असल्याने प्रियंकाच्या वैयक्तिक, सामाजिक आणि प्रोफेशनल आयुष्यात काय सुरू आहे हे चाहत्यांना नेहमीच माहीत होतं. सध्या प्रियंकाला तिच्या वडिलांची खूप आठवण येत आहे. म्हणूनच तिने चाहत्यांसोबत तिचा बालपणीचा वडिलांसोबत असलेला एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे.

प्रियांका चोप्रावरही चालली चंद्रमुखीची जादू, कौतुक करून दिल्या शुभेच्छा

प्रियंका वडिलांच्या आठवणीत होते भावुक

प्रियंकाचे वडील अशोक चोप्रा यांचं 2013 साली निधन झालं. जगातील सर्व मुलींप्रमाणेच प्रियंका तिच्या वडिलांची खूप लाडकी होती. ज्यामुळे प्रियंकाला हा धक्का सहन करणं आजही कठीण जात आहे. बऱ्याचदा प्रियंका तिच्या जीवनातील हा हळुवार भावनांचा कप्पा चाहत्यांसोबत खुला करते. नुकतंच तिने इन्स्टाग्रामवर बालपणीचा वडिलांसोबत असलेला एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोत प्रियंकाला तिच्या वडिलांनी उचलून घेतलं आहे. वडिलांच्या कुशीत विसावलेली छोटी प्रियंका यात खूपच गोड वाटत आहे. या फोटोसोबत प्रियंकाने शेअर केलं आहे की, “डॅडीड लिटील गर्ल”  प्रियंकाने याच कॅप्शनचा टॅटूदेखील पूर्वी स्वतःच्या हातावर गोंदवलेला आहे. यावरून तिचं आणि तिच्या वडिलांचं नातं किती दृढ होतं हे लक्षात येतं. प्रियंकाच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक आणि कंमेट्सचा वर्षाव केला आहे. 

प्रियंका चोप्राचे आगामी प्रोजेक्ट

प्रियंका चोप्रा लवकरच ‘जी ले जरा’ या बॉलीवूड चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. कतरिना कैफ आणि आलिया भटच्या यामध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिका असणार आहेत. या चित्रपटासाठी दिग्दर्शन फरहान अख्तर याचं असणार आहे. यासोबतच प्रियंका हॉलीवूडच्या सिताडेल या चित्रपटातही झळकणार आहे. याच वर्षी जानेवारीत प्रियंका चोप्रा आणि निक जोनस आईबाबा झाले आहे. त्यांना सरोगसीच्या माध्यमातून गोंडस मुलगी झाली आहे. प्रियंकाने मुलीचे नाव मालती असं ठेवलं आहे. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बॉलीवूड