लग्नसराई

#Nickyanka च्या प्रेमाचा जलवा व्हायरल

Sneha Ranjankar  |  Dec 1, 2018
#Nickyanka च्या प्रेमाचा जलवा व्हायरल

जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये #Nickyanka म्हणजेच प्रियांका चोप्रा आणि निक जोनस अखेर लगीनगाठीत बांधले गेले. आज ख्रिस्ती पध्दतीने या दोघांचं लग्न लागलं आणि  रविवारी 2 डिसेंबरला त्यांचा हिंदू पध्दतीने विवाह होणार आहे. गंमत म्हणजे स्वतः निकच्या वडिलांनी बायबलच्या साक्षीनं दोघांचं लग्न लावलं, असं कळतंय. लग्नानंतर प्रिनिकचे फॅन्स त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यास उत्सुक असतानाच, व्होग मॅगझिनने त्यांच्या Insta अकाउंटवर ह्या लव्हबर्डसचे व्हिडीओ शेअर केले आहेत.

Credit : Instagram

वरील व्हीडीओमध्ये निक जोनसने खास आपल्या बायकोसाठी त्याचं ‘क्लोज’ हे गाणं acoustic व्हर्जनमध्ये गायलंय आणि देसी गर्ल पीसी मनमोकळेपणानं त्याच्या या रोमॅंटिक गाण्यावर थिरकतेय. हा व्हिडीओ पाहताना त्या दोघांमधली कमालीची केमेस्ट्री पाहिला मिळतेय. सेलिना रोल्ससन-हॉलने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे, तर स्टिव्हन ब्राह्म्सने दिग्दर्शित केलंय.

वोग मॅगझिनने अजून एक व्हिडीओ  काही सेकंदांचा व्हीडिओ शेअर केलाय.  त्यात निक गिटार प्ले करतोय आणि प्रियांकाचा मुड कमालीचा रोमॅंटीक वाटतोय.

व्होग मासिकाने लग्नाआधी या क्युट कपलचा इंटरव्ह्यू देखील घेतला होता. त्यात दोघांना त्यांच्या फर्स्ट किसबद्दल एक प्रश्न विचारला होता. त्यात दोघं पास झाले की नाही, हे तुम्हीच पहा.

दोघांचे नवे व्हीडिओज् आले असतील तरी देश-विदेशातल्या त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो पाहण्यासाठी उत्सुकता निर्माण झालीयं. कारण प्रख्यात डिझायनर राल्फ लॉरेनने आपल्या देसी गर्लसाठी खास असा वेडिंग गाऊन डिझाईन केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्याने कोणत्याही सेलिब्रेटीसाठी वेडिंग गाऊन डिझाईन केला नव्हता. प्रियांका आणि त्याचं तसं खास रिलेशन आहे. म्हणूनच त्याने तिचा वेडिंग गाऊन तयार केला. आज त्याने लग्नानंतर त्याच्या Insta वरुन दोघांना शुभेच्छाही दिल्या आहेत. त्याचमुळे तिचा लुक पाहण्यासाठी फक्त तिचे चाहतेच नाही,तर प्रत्येक होऊ घातलेली नववधू उत्सुक आहे,असंच म्हणावं लागेल.

तिचा आज ख्रिस्ती पध्दतीने विवाह झाला असला तरी मेहेंदी-हळद-संगीत असे कार्यक्रमही छान साजरे झाले. त्यात आपली देसी गर्ल तिच्या कपड्यांबाबत किती चुझी आहे, हे प्रत्येकाला चांगलच माहीत आहे. त्यामुळे तिच्या मेंदीचे फोटो इन्स्टावर येताच लगेच लाइक्सची बरसात झाली. हा पाहा तिचा मेहंदी लुक 

प्रियांका-निक उद्या हिंदू पध्दतीने लग्न करणार असून प्रियांकासाठी प्रसिध्द अबू जानी आणि संदीप खोसलाने आउटफिट डिझाईन केले आहे. त्यामुळे तिही उत्सुकता आहेच.

Read More From लग्नसराई