DIY लाईफ हॅक्स

दिवाळीमध्ये मिनिट्समध्ये भांडी स्वच्छ करायची असतील तर सोपे हॅक्स

Dipali Naphade  |  Oct 21, 2020
दिवाळीमध्ये मिनिट्समध्ये भांडी स्वच्छ करायची असतील तर सोपे हॅक्स

दिवाळी लवकरच येईल आणि सध्या सगळेच नवरात्रीनंतर दिवाळीच्या तयारीमध्ये व्यस्त झाले असतील. दिवाळी म्हटली की सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे साफसफाई. संपूर्ण घराची अगदी भांड्यापासून साफसफाई करणं हे गेले कित्येक वर्ष चालत आले आहे. दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी माळ्यावरील विविध भांडीही काढण्यात येतात. यापैकी काही भांडी अर्थात अल्युमिनिअम आणि स्टीलची भांडी तर खालून जळतातही. मग सर्वात जास्त त्रास होतो तो ही भांडी स्वच्छ करताना. लोखंडाची कढई,  अल्युमिनिअमची भांडी आणि स्टीलची भांडी घासताना जीव भांड्यात उतरतो असं वाटतं. पण काही मिनिट्समध्ये तुम्ही ही दिवाळीमधील भांडी स्वच्छ करू शकता. यासाठी काही सोपे हॅक्स म्हणजेच काही सोप्या टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. अगदी जळलेल्या कुकरपासून ते काळ्या झालेल्या कढईपर्यंत सर्व भांडी स्वच्छ करण्यासाठी आमच्याकडे सोपे उपाय आहेत. या काही महत्त्वाच्या टिप्स तुमची ही दिवाळी नक्कीच आरामदायी करतील ही अपेक्षा. मग वाट कसली पाहताय वाचा  या टिप्स आणि लागा कामाला. चकाचक भांडी पाहून मग तुम्हाला खऱ्या अर्थाने भाऊबीज (bhaubeej wishes in marathi) आणि दिवाळीच्या शुभेच्छांसाठी तयार असल्यासारखं वाटेल.

अल्युमिनिअमच्या भांड्यासाठी टिप्स

Instagram

सर्वात जास्त स्वच्छ करण्यासाठी त्रास होतो तो अल्युमिनिअमच्या भांड्यामध्ये. याच्या कढईमध्ये तळल्यास, खाली चॉकलेटी असा रंग येतो. त्यामुळे हे घासून घासून स्वच्छ करताना खूप ताकद लागते. तुम्हाला अल्युमिनिअमच्या भांड्याची स्वच्छता पटकन करायची असेल तर तुम्ही या टिप्स वापरा. 

व्हिनेगर येईल कामी

Shutterstock

सर्वात पहिले तुम्हाला व्हिनेगरची मदत घ्यावी लागेल. तुमचे अल्युमिनिअमचे भांडे जर जळले असेल तर तुम्ही त्यात पहिले पाणी घाला आणि त्यात एक चमचा व्हाईट व्हिनेगर घाला आणि हे पातेले पुन्हा एकदा उकळवायला ठेवा.  साधारण 10 मिनिट्स आतल्या पाण्यासह उकळू द्या आणि नंतर थंड झाल्यावर यात लिक्विड साबण घाला आणि मग स्क्रबने हे स्वच्छ केल्यास तुम्हाला अल्युमिनिअमचे भांडे पुन्हा पहिल्यासारखे दिसेल. 

सफरचंदाच्या सालांचा करा उपयोग

Shutterstock

अल्युमिनिअम स्वच्छ करण्यासाठी अजून एक चांगला उपयोग करून घेऊ शकता तो सफरचंदाच्या सालांचा. सफरचंदाची सालं टाकून तुम्ही साधारण अर्धा तास पाणी उकळून घ्या. या पाण्यात नंतर साबण घालून भांडे घासा आणि पुन्हा पहिल्यासारखे चमकवा. 

बाहेरून करा असे स्वच्छ

अल्युमिनिअमचे भांडे बाहेरून काळे झाले असेल तर तुम्ही व्हिनेगर, कोमट पाणी आणि डिशवॉश साबणाचे मिश्रण करून घ्या आणि भांडी घासण्याच्या स्क्रबने अल्युमिनिअमचे भांडे घासा. बाहेरून खूपच जळले असेल तर ब्रायो अथवा सिल्व्हर पॉलिशनेही तुम्ही हे स्वच्छ करू शकता. 

लोखंडी भांड्याच्या स्वच्छतेसाठी टिप्स

Instagram

लोखंडी भांडी स्वच्छ करणे अत्यंत कठीण काम आहे. कारण ती भांडी काळीच राहतात आणि ही घासण्यासाठी खूपच ताकद वापरावी लागते आणि सतत यावर गंज चढण्याचाही धोका असतो. त्यामुळे तुम्ही पुढील टिप्स वापरा.

जळलेली काळी कढई होईल मिनिटांत स्वच्छ, वापरा सोपी पद्धत

कोल्ड्रिंकचा वापर करा

ब्लॅक कोल्ड्रिंक लोखंडी भांडी स्वच्छ करण्यास फायदेशीर ठरतात. त्यासाठी तुम्ही लोखंडी भांड्यात कोल्ड्रिंग घ्या आणि उकळवा आणि उकळल्यावर प्लास्टिकच्या ब्रशने अथवा साबणाच्या मदतीने भांडे धासा.  भांड्यावर जमलेले काळे पटकन निघून जाते. 

मीठही ठरते फायदेशीर

Shutterstock

मीठाच्या मदतीने पटकन स्वच्छ करता येते. त्यासाठी तुम्हाला जास्त प्रमाणात मीठ घेऊन स्क्रब पॅडच्या मदतीने लिक्विड सोप घेऊन लोखंडाची भांडी स्वच्छ करता येतील. असं केल्यास भांडी पटकन स्वच्छ होण्यास मदत मिळते.

बेकिंग सोडाही उपयोगी

Shutterstock

बेकिंग सोडादेखील लोखंडी भांड्याची स्वच्छता करण्यासाठी उपयोगी ठरतो. तुम्हाला केवळ बेकिंग सोडा पाणी आणि लिंबाच्या रसासह पेस्ट करून गरम पाण्यासह या भांड्यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर जळलेले भांडे असेल त्याला ही पेस्ट लावा. थोडा वेळ तशीच राहू द्या आणि मग स्वच्छ करा. 

स्वयंपाकघरातील चिकट टाईल्स चमकविण्यासाठी सोप्या टिप्स

स्टील्सच्या भांड्याची स्वच्छता

Instagram

स्टीलची भांडी अधिक स्वच्छ आणि सुंदर बघायला कोणाला नाही आवडत. बऱ्याचदा दिवाळीचे पदार्थ आपण स्टीलच्या भांड्यातच बनवत असतो. पण ही भांडी स्वच्छ करताना नाकी नऊ येतात. अशावेळी वापरा सोपे हॅक्स. 

टॉमेटो केचअपची घ्या मदत

Shutterstock

तुम्ही विचार करत असाल की टॉमेटो सॉसची कशी मदत होईल. पण जळलेल्या स्टील्सच्या भांड्यावर टॉमेटो सॉस  घालून तुम्ही रात्रभर तसेच ठेवा.  सकाळी यावर काळपटपणा येईल. त्यानंतर तुम्ही हे साबणाने स्वच्छ करा.  

लिंबाचा रस

Shutterstock

लिंबाच्या रसानेही तुम्ही स्टील्सच्या भांड्याची स्वच्छता करू शकता. थोडा वेळ भांड्याना लिंबाचा रस लावा आणि ठेऊन द्या.  भांडी जास्त खराब असतील तर त्यात लिक्विड सोप घाला.  त्यानंतर पटकन स्क्रबने घासून टाका. काही जणांना लिंबाच्या रसाने हाताला त्रास होत असेल तर तुम्ही MyGlamm चे वाईपआऊट वापरून हाताची काळजी घेऊ शकता. 

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

वाईनचाही होतो उपयोग

स्टीलच्या भांड्यामध्ये वाईन ही व्हिनेगरप्रमाणे काम करते. जळलेल्या भांड्याना रात्रभर वाईन लाऊन ठेवा. सकाळी तुम्ही पटकन घासून स्वच्छ करू शकता. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From DIY लाईफ हॅक्स