रक्षाबंधन म्हणजे बहिण भावाच्या प्रेमाचा, त्यांच्या बंधनाचा हा सण. आपल्याकडे देशभरात हा सण उत्साहात आणि खूपच प्रेमाने साजरा करण्यात येतो. रक्षाबंधनाची माहिती आपल्या सर्वांना आहेच. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत भाऊ बहीण एकमेकांना वेगवेगळे आणि उपयोगी येणारे गिफ्ट्सही देतात. यावर्षी 22 ऑगस्टला हा सण साजरा करण्यात येत आहे. बहीण नेहमीच या सणाची आतुरतेने वाट बघत असते. विशेषतः यावर्षी आपला भाऊ आपल्याला कोणते गिफ्ट घेऊन देणार याचीही उत्सुकता बहिणींना असते. भाऊ आणि बहीण कितीही लांब असले तरीही यादिवशी नक्कीच एकमेकांना भेटतात आणि दिवस एकत्र घालवतात. पण हा सण साजरा करताना बहीण भावाला ओवाळण्यासाठी राखीचे ताटही विशेष सजवते. तुम्हाला या रक्षाबंधनाला आपल्या भावासाठी काही वेगळं करायचे असेल आणि राखीचे ताट अधिक आकर्षक करायचे असेल तर तुम्हीही हा लेख नक्की वाचा. बाजारात नक्कीच वेगवेगळ्या डेकोरेट करण्यात आलेल्या थाळी मिळतात पण स्वतःच्या हाताने भावासाठी तयार करण्यात आले राखीच्या ताटाची गोष्टी निराळी आहे! अशाच काही ट्रेंडी डिझाईन्स कशा करायच्या ते जाणून घ्या.
गुलाबी पेपरने सजवा थाळी
तुम्ही जर रक्षाबंधनाला राखीचे ताट तयार करणार असाल तर आणि तुम्हाला जास्त झगमगाट आवडत नसेल तर तुम्ही गुलाबी पेपरचा वापर करा. राखीचे ताट तुम्ही गुलाबी पेपरने कव्हर करा आणि तुम्हाला हवं असेल तर त्यात आर्टिफिशियल पांढऱ्या रंगांची फुलंही तुम्ही चिकटवू शकता. याशिवाय तुम्हाला जांभळ्या रंगाच्या अथवा सोनेरी रंगाच्या, लाल रंगाच्या पेपरचाही सजवण्यासाठी वापर करता येईल. ताट तयार करताना व्यवस्थित चिकटविण्यासाठी फेव्हिकॉलचा योग्य वापर करा.
क्राफ्ट पेपर आणि पातळ रिबीन्सचा वापर
बऱ्याच जणी राखीची थाळी इतकी भरतात की त्यामध्ये जागा उरतच नाही. तुम्ही थाळीचा वापर अशा तऱ्हेने करा की ती सुटसुटीत दिसेल आणि आकर्षकही. तुम्हाला डिझाईन्स बनविण्यासाठी क्राफ्ट पेपर आणि रिबीन्सचा वापर करता येईल. तुम्ही तुमची थाळी राखीच्या आकारातही बनवू शकता. डेकोरेट करण्यसाठी तुम्ही एक गोलाकार काठाची थाळी घ्या. तुम्हाला आवडेल त्या रंगाचा क्राफ्ट पेपर घ्या. तो तुम्ही थाळीला पूर्ण कव्हर करा. त्यानंतर तुम्ही वेगळ्या रंगाच्या क्राफ्ट पेपरचा काठाला गुंडाळी करून वापर करा आणि त्यावर तुम्ही रिबीन्सचा गुंडाळी करत वापर करा. तुम्हाला हवे असल्यास, एका बाजूला तुम्ही आर्टिफिशियल फुलांचा अथवा मण्यांचाही वापर करू शकता. तुमची थाळी 5 मिनिट्समध्ये तयार.
कपडा आणि जरीचा करा वापर
तुम्ही कपड्याचा आणि जरीचा वापर करूनही राखीचे ताट डेकोरेट करू शकता. पण पेपर काढणे सोपे होते. कपडा चिकटवला तर ताट खराब होण्याचीही भीती असते. पण तुम्हाला जर कपड्याचा वापर करायचा असेल तर तुम्ही बांधणीचा कपडा अथवा कॉटनचा वापर करा. आधी संपूर्ण ताटाला खालपासून व्यवस्थित कपड्याने कव्हर करा. त्यानंतर तुम्ही सुई दोऱ्याने व्यवस्थित गुंफून घ्या. हे शिवल्यावर तुम्ही काठाला व्यवस्थित सोनेरी जरी घट्ट गुंडाळा आणि शिवून घ्या. तुमच्या रंगसंगतीचा यामध्ये महत्त्वाचा भाग असतो. सहसा लाल, केशरी, पिवळा बांधणी कपडा आणि सोनेरी जर अत्यंत उठावदार दिसते.
वेलवेटच्या कपड्याने राखीचे ताट सजवा
तुमच्याकडे जर जुना वेलवेटचा कपडा घरात असेल आणि वापरात नसेल तर तुम्ही राखीचे ताट सजविण्यासाठी याचा उपयोग करून घ्या. ताटाला सगळीकडे व्यवस्थित फेव्हिकॉल लावा आणि वरून वेलवेटचा कपडा चिकटवा. लक्षात ठेवा तुम्हाला कपडा नीट चिकटण्यासाठी जास्त प्रमाणात फेव्हिकॉलचा वापर करावा लागेल. वेलवेट थोडे जाडसर असते त्यामुळे तुम्ही व्यवस्थित चिकटला आहे की नाही याची खात्री करून घ्या. त्यानंतर वरून तुम्ही मोती अथवा अन्य जरीनेदेखील डेकोरेट करू शकता. यासाठी तुम्ही गडद रंगाच्या वेलवेटचा वापर केल्यास थाळी अधिक आकर्षक आणि उठावदार दिसून येईल.
यावर्षी तुम्हीदेखील आपल्या भावासाठी घरगुती सजावट करून राखीचे ताट सजवा आणि घरातल्यांचीही मिळवा वाहवा!
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar