दरवर्षी रक्षाबंधनाला नक्की आपल्या भावाबहिणीला काय गिफ्ट द्यायचे हा प्रश्न असतोच. कारण आपल्या बहिणीसाठी काहीतरी खास करायला हवे हीच एक भावना भावाच्या मनात असते. वर्षभर कितीही त्रास दिला तरीही रक्षाबंधन (Rakshabandhan) हा भावाबहिणीच्या नात्याचा अनोखा सण आहे. आपल्याकडे श्रावणातील अगदी वाट पाहिला जाणारा हा सण आहे. रक्षाबंधनाची माहिती आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपल्याला माहीत आहेच. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्यासाठी प्रत्येक भाऊ आणि बहीण उत्सुकत असतात. यावर्षी तुम्ही हा रक्षाबंधन सण कोणते गिफ्ट्स देऊन साजरे करावा यासाठी काही कल्पना आम्ही तुम्हाला देत आहोत. तुम्हीही नक्की याचा वापर करून आपल्या बहिणीला आनंद द्या.
हस्तकलाकुसरीचे कानातले
दागिना हा नेहमीच कोणत्याही स्त्री चा जिव्हाळ्याचा विषय आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्ही तुमच्या बहिणीला यापेक्षा भारी गिफ्ट ते काय देऊ शकता. रिलायन्स ज्वेल्सने यावर्षी खास रक्षाबंधनाासाठी आभार कलेक्शन आणले असून हस्तकुलाकुसरीचे दागिने आणि अगदी नाजूक असे कानातल्यांचे डिझाईन्स बनविण्यात आले आहे. यामध्ये फुलांचे गुच्छेदार, नक्षीदार, टॉप अँड ड्रॉप, लटकन, झुमके, कुड्या आणि चांदबाली असे अनेक कानातल्यांचे डिझाईन्स उपलब्ध आहेत. तुमच्या बहिणीच्या आवडीनुसार तुम्ही या कलेक्शनमधून नक्कीच निवड करून यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी तिला खूष करू शकता.
मेडिक्लेम अथवा पॉलिसी
आपल्या बहिणीचे आयुष्य आणि तिच्या भविष्याची चिंता प्रत्येक भावाला असते. त्यामुळे तिच्या भविष्याचा विचार करून तुम्ही एखादी पॉलिसी अथवा मेडिक्लेम तिच्यासाठी या रक्षाबंधनाला काढून देणे हे अत्यंत उत्तम गिफ्ट तिच्यासाठी ठरू शकते. तिच्या भविष्यात तिला अधिक शिकण्यासाठी अथवा तिच्या तब्बेतीची काळजी घेण्यासाठी लागणारा पैसा त्वरीत उभा करण्यासाठी उचलेले हे पाऊल नक्कीच भावूक असेल हे लक्षात घ्या. तिच्यासाठीदेखील हा क्षण तितकाच भावनिक आणि तुम्ही तिची किती काळजी करता हे दाखवणारा ठरतो. त्यामुळे तुम्ही या पर्यायाचाही नक्कीच विचार करावा. कोणत्याही भौतिक गिफ्टपेक्षा हे गिफ्ट नक्कीच वेगळे ठरते.
वाचा – वडिलांकडून मुलीला लक्षात राहणारे गिफ्ट्स
लहानसे रोपटे लावणे
तुमच्या बहिणीला प्लांटेशनची आवड असेल तर तिला छानशी रोपटी रक्षाबंधनाच्या दिवशी आणून द्या. पर्यावरणाला पूरक असे गिफ्ट देणे नक्कीच छान आहे. सध्या पर्यावरणाची होत असलेली हानी पाहता आपण हे एक उचललेले पाऊल नक्कीच योग्य आहे. तुमच्या घराच्या आसपास अथवा सोसायटीमध्येही जागा असेल तर तुम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या बहीण अथवा भावाला रोपटे द्या आणि त्यांना त्या दिवशी रोपट्यांची लागवड करायला लावा. हे एक उत्तम गिफ्ट ठरू शकते.
टी रिच्युअल्स
तुमच्या बहिणीला अथवा भावाला काही क्लासी गोष्टी आवडत असतील तर तुम्ही त्यांना या रक्षाबंधनाला टाटा क्लिक लक्झरीच्या इंडिलक्सकडून (IndiLuxe by Tata CLiQ Luxury) टी रिच्युअलर्स गिफ्ट म्हणून देऊ शकता. त्यांना या दिवशी विशेष फील करण्यासाठी तुम्ही नक्कीच वेगवेगळ्या गिफ्ट्सचा विचार करत असणार. मग त्यासाठी त्यांना जर चहाची आवड असेल तर तुम्ही नक्की या गिफ्टचा विचार करायला हवा.
फ्रेम्स
तुम्ही आणि तुमच्या भावामध्ये अनेकदा भांडणं असतील अनेक गोष्टींचे फोटो असतील. तर त्याच्या आठवणींची साठवण म्हणून ते फोटो फ्रेम करून बहिणीला अथवा भावाला तुम्ही देऊ शकता. अशा अनेक आठवणींनीच हा सण अधिक प्रेमाने साजरा होतो. त्यामुळे आपल्या बहिणीला अथवा भावाला असा एखादा फोटो फ्रेम करून द्या जो त्यांच्या आठवणी ताज्या करू शकतो आणि भावनिक करू शकतो. एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्यासाठी यासारखा उत्तम दिवस नाही.
गॅजेट्स
तुमच्या बहिणीला अथवा भावाला गॅजेट्सचे वेड असेल तर तुम्ही त्यांच्या आवडीचे स्मार्टवॉच अथवा त्यांच्या आवडीचा आणि त्यांना कामाला येईल असा फोन अथवा कोणतेही त्यांच्या उपयोगी पडेल असे गॅजेट त्यांच्या आवडीने त्यांना यावर्षी घेऊन द्या. अर्थात हे जरी कॉमन गिफ्ट असले तरीही त्यांच्या उपयोगी येणार असेल तर अजून काय हवे?
यावर्षी आपल्या बहिणीला आणि भावाला जास्तीत जास्त उपयोगी ठरतील आणि कायम स्मरणात राहतील असेच गिफ्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांना आनंदी ठेवा! POPxo मराठीकडून आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar