मनोरंजन

राणू मंडलचा प्रवास म्हणजे एका चित्रपटाची कहाणी

Leenal Gawade  |  Sep 3, 2019
राणू मंडलचा प्रवास म्हणजे एका चित्रपटाची कहाणी

सध्या सगळीकडे पाहावी तिकडे राणू मंडलचीच चर्चा आहे. तिला हिमेश रेशमियाने गाण्याची संधी दिल्यानंतर एका पाठोपाठ एक तिला गाण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. तिला अनेक ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावण्यात येत आहे. ती अनेक ठिकाणी आपला अनुभव शेअर करत आहे. पण तिचा हा प्रवास एका चित्रपटापेक्षा कमी नसल्याचे तिने एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे. त्यामुळे आता भविष्यात कदाचित राणू मंडलवर एखादा चित्रपट नक्कीच येऊ शकेल आणि कदाचित तिच्या गाण्याप्रमाणेच तिच्या या चित्रपटालाही प्रसिद्धी मिळेल.

बाप्पा पावला आणि शिवचं स्वप्न झालं पूर्ण

राणू मंडलची परिस्थिती अशी नव्हती

Shutterstock

राणू मंडलने तिच्या लहानपणीच्या आठवणी सांगताना म्हटले की, माझे बालपण चांगले होते. मी फुटपाथवर नाही तर चांगल्या घरात जन्माला आले. पण काळाने घाला घातला. मी 6 महिन्यांची असताना माझे आई-वडील गेले. त्यामुळे माझ्या आजीनेच मला सांभाळले. डोक्यावर छप्पर होतं. पण परिस्थिती तशी गंभीर होतीच. आजीने मोठे केले. लहानपणीच मला गाण्यांची आवड असल्यामुळे मी गात होते. लता मंगेशकर, आशा भोसले यांची गाणी गायला मला आवडायचे. त्यामुळे गाणं हा माझा जीव की प्राण होता. माझा आवाजही चांगला होता, असे देखील सगळे म्हणायचे.

लग्नानंतर बदलले आयुष्य

Instagram

लग्नानंतर राणू मंडल मुंबईत नवऱ्यासोबत मुंबईत आली. नवऱ्यासोबत असताना ती फिरोज खानच्या घरी काम करत होती. स्वत:ची आवड देखील जपत होती. ती मुंबईत क्लबमध्ये गाणं गात होती. त्यावेळी तिला राणू बॉबी नावाने ओळखले जायचे. त्यावेळी कदाचित तिला प्रसिद्धी मिळाली असती. पण काळाने पुन्हा एक घाला घातला.राणू मंडलच्या नवऱ्याचे निधन झाले आणि मुंबईतून तिला पुन्हा एकदा पश्चिम बंगालला जावे लागले. पश्चिम बंगालला घरी गेल्यानंतर कमाईचे कोणतेच साधन नसल्यामुळे तिने स्टेशनवर गायला सुरुवात केली.त्यावेळीच हा व्हिडिओ एका मुलाने रेकॉर्ड केला.

एका रात्री प्रसिद्धीच्या शिखरावर चढल्या या व्यक्ती

माझा प्रवास सोपा नव्हता

Instagram

आज सगळ्यांनी मला इतकं प्रेम दिलं आहे की मी भारावून गेले आहे. या प्रेमाचा मला विसर पडला होता. पण एका व्हिडिओने माझं आयुष्य बदलून टाकलं.त्याच्या या व्हिडिओनंतर मला प्रसिद्धी मिळाली. आता माझी आवड जपण्याचे कारण मला मिळाले आहे. हा व्हिडिओ आता आल्यानंतर मला लगेच प्रसिद्धी मिळाली असे लोकांना वाटले असेल पण त्या आधीचे माझे आयुष्य अजिबात चांगले नव्हते. त्यावेळी मला असे कधी माझ्या आयुष्यात घडेल आणि माझे आयुष्य असे बदलेल असेही वाटले नव्हते. पण आता माझे आयुष्य बदलले आहे. मला चांगले आयुष्य देणाऱ्यांची मी आभारी आहे असे देखील तिने अनेक ठिकाणी सांगितले आहे.

ब्रेकअप झाल्यानंतरही बेस्ट फ्रेंड्स आहेत हे सेलिब्रिटी कपल्स

कोण तयार करेल राणूवर चित्रपट

राणूची प्रसिद्धी पाहता आता राणूवर कोण चित्रपट बनवणार हे पाहावे लागेल. सध्या सगळीकडे राणूचीच चर्चा होताना दिसत आहे. त्यामुळे आता तिच्यावर चित्रपट तयार केल्यानंतर कदाचित प्रेक्षकांचा याला उदंड असा प्रतिसाद मिळू शकेल. राणू मंडलनेच ही इच्छा व्यक्त केल्यानंतर कदाचित आता तिच्यावर हा चित्रपटही तयार होईल. 

आता राणू मंडलवर चित्रपट कोण तयार करणार हे पाहावे लागेल.

Read More From मनोरंजन