मनोरंजन

राणू मंडल इज बॅक, ‘बचपन का प्यार’ व्हिडिओ व्हायरल

Leenal Gawade  |  Aug 16, 2021
बचपन का प्यार

 एकेकाळी राणू मंडलच्या नावाचा चांगलाच बोलबाला होता. एका रात्रीत गाण्याची ऑफर मिळवलेली राणू मंडल हिमेश रेशमियाच्या चित्रपटात गाताना दिसली. पण अचानक मिळालेली प्रसिद्धी राणू मंडलच्या फारशी पचनी पडली नाही. त्यामुळेच तिच्या डोक्यात हवा गेली आणि ती कायमीच सगळ्यांच्या विस्मरणात गेली. पण सध्या राणू मंडल इज बॅक असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण राणू मंडलचा एक नवा व्हिडिओ पुन्हा एकदा समोर आला आहे. आता राणू मंडल कोणते खास गाताना दिसत नाही. तर ती सध्याचे प्रसिद्ध गाणे ‘बचपन का प्यार’ गाणे गाताना दिसत आहे. तिचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bigg Boss OTT: शमिता दिव्याची तुटली मैत्री, करणने केली दिव्याची कानउघडणी

राणू गातेय बचपन का प्यार

सध्या सगळ्या सोशल मीडियावर एकाच गाण्याची क्रेझ असलेली पाहायला मिळत आहे. ‘बचपन का प्यार’ नावाचे एक गाणे शाळकरी मुलाने असे काही गायले की, त्याचे मीम्स, रिल्स असे सगळे काही बनवले गेले आहे. आता या गाण्याची भूरळ राणू मंडल हिला पडली असावे असे दिसत आहे. कारण खूप दिवसांनी राणू मंडल गाताना दिसत आहे. आता तिचा हा नवा व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्या व्हिडिओमध्ये ती बचपन का प्यार हे गाणं गाताना दिसत आहे.  एका व्लाॅगरने घेतलेल्या मुलाखतीदरम्यान राणू  बचपन का प्या हे गाणं थोडं वेगळ्या स्वरुपात गाताना दिसत आहे. राणू मंडलचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. त्यामुळे आता राणू इज बॅक असेच म्हणावे लागेल. 

प्रसिद्धी गेली डोक्यात

राणू मंडलला हिमेश रेशमियाने गाण्याची एक संधी देत त्याच्या चित्रपटासाठी गाणे गायला लावले होते. त्यानंतर अनेक ठिकाणी राणू मंडलला बोलावले गेले. अनेक कार्यक्रमांमध्ये राणू दिसत होती. पण प्रसिद्धीची ही हवा तिच्या डोक्यात गेली होती. कारण ती खूपच वाईट वागू लागली. आजुबाजूच्या लोकांशी तिचे वागणे फारच बदलले होते. ती फार उर्मटपणाने सगळ्यांनी बोलू लागली होती. त्यामुळेच की काय ज्या वेगाने ती प्रसिद्ध झाली त्याच वेगाने ती खाली आपटली गेली. आता ती पुन्हा तिचे नाव सगळ्या सोशल मीडियावरुन गायब झाले. आता तिला कोणीच विचारत नसल्यामुळे तिची अवस्थाही पूर्वीसारखी राहिलेली नाही.

हिरामंडी’मध्ये रेखा ऐवजी आता ऐश्वर्याची एन्ट्री

बचपन का प्यार असा झाला व्हिडिओ व्हायरल 

 सोशल मीडियावर एखादी गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. आता हेच गाणं बघा ना छत्तीसगडमधील सुकमा या गावातील छिंदगढ येथील एका शाळेत सहदेव दिरदो नावाच्या एका मुलाने शाळेत असताना हे गाणे गायले होते. हे गाणं त्याच्या शिक्षकांनी रेकॉर्ड केले होते. 2019 साली हा व्हिडिओ त्यांनी शूट केला होता. पण आता हा व्हिडिओ कमालीच व्हायरल होऊ लागला आहे. हे गाणं ज्याने गायलं आणि ज्यांनी शूट केलं त्या शिक्षकाला सुद्धा हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल असे वाटले नव्हते. तर अशाप्रकारे हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 

आता तुम्ही जर हे गाणं पाहिलं नसेल तर हा व्हिडिओ नक्की बघा

फँड्रीच्या शालूने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल, म्हणाली…

Read More From मनोरंजन