लग्नसराई

आकाश अंबानी आणि  श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग पार्टीमध्ये ‘रणबीर-आलिया’ लाईमलाईटमध्ये  

Trupti Paradkar  |  Feb 27, 2019
आकाश अंबानी आणि  श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग पार्टीमध्ये ‘रणबीर-आलिया’ लाईमलाईटमध्ये  

आकाश अंबानी  आणि श्लोका मेहताच्या प्रि-वेडिंग सेलिब्रेशनला सुरूवात झाली आहे. अंबानी आणि मेहता परिवार सध्या  स्वित्झर्लंडमध्ये प्रि-वेडिंग फंक्शन्स सेलिब्रेट करत आहेत. या सेलिब्रेशनमध्ये बॉलीवूड सेलिब्रिटीजही सामील झाले आहेत. या सेलेब्समध्ये करण जोहर, रणबीर कपूर, आलिया भट्ट, अर्जुन कपूर आणि मलाइका अरोरा सहभागी झाले होते.मात्र या सर्व सेलिब्रेटीजमध्ये  सध्या रणवीर कपूर आणि आलिया भट लाईमलाईटमध्ये आहेत. रणवीर आणि आलियाचे काही फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये रणवीर आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांना जवळ घेत शुभेच्छा देत आहे. रणवीरने आकाशला मिठी मारत त्याला मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये रणवीरसोबत आलियादेखील दिसत आहे. शिवाय या फंक्शन्समुळे रणवीर-आलिया यांनीदेखील एकमेकांना चांगला वेळ देता आल्याचं दिसून येत आहे.

रणवीर आणि आलिया लवकरच ब्रम्हास्त्रमध्ये दिसणार एकत्र

रणवीर कपूर सध्या यशराज फिल्म्सच्या शमशेरा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. शिवाय तो लवकरच अयान मुखर्जीच्या ब्रम्हास्त्र चित्रपटात आलियासोबत दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंगदेखील सूरू झालं आहे. त्यामुळे रणवीर आणि आलियाच्या चाहत्यांना त्यांना ब्रम्हास्त्रमध्ये एकत्र पाहण्याची उत्सुकता लागली आहे. गली बॉय चित्रपटाच्या स्क्रिनींग दरम्यान रणवीर आणि आलियाच्या नात्यात दूरावा आल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यानंतर आलियाने त्याचं नातं  व व्यवस्थित असल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. व्हॅलेंटाईन डेलादेखील ते एकत्र डिनरसाठी गेले होते. आता आकाश आणि श्लोकाच्या प्रि-वेडिंगमध्ये रणवीर आणि आलिया पुन्हा एकत्र आलेले दिसल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

आकाश अंबानीच्या प्रि-वेडिंगचा थाट

आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचं प्रि-वेडिंग सेलिब्रेशन सध्या जोरदारपणे स्वित्झर्लंडमधील सेंट मोरिट्ज इथल्या सर्वात महागड्या बडरुट पॅलेस (badrutt palace) येथे सुरू आहे. या सेलिब्रेशनचे फोटोजही सोशल मीडीयावर व्हायरल झाले आहेत. यासाठी लेकसमोर असणाऱ्या हॉटेलमधील एका रुमचा कमीतकमी खर्च 98,500 रूपये एवढा आहे तर या हॉटेलच्या महागड्या सूटचा खर्च तब्बल 3,08,939 एवढा आहे. अंबानींच्या घरचं लग्न म्हणजे एवढा खर्च तर होणारच.

कसा पार पडणार अंबानीच्या घरचा विवाहसोहळा

9 मार्चला दुपारी 3:30 ला आकाशची वरात अंबानी यांच्या घरातून निघेल आणि सायंकाळी सात वाजता आकाश आणि श्लोकाच्या लग्नाचे विधी जियो वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडतील. तर 10 मार्चला संध्याकाळी या दोघांच्या लग्नाचं ग्रॅंड सेलिब्रेशन केलं जाईल. 11 मार्चला काही खास पाहुण्यांसाठी रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात येणार आहे. लग्नासाठी देश-विदेशातील पाहुणे मंडळी हजर होणार आहेत. आकाशची बहीण ईशा अर्थात अंबानींच्या लाडक्या कन्येचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला होता. आता आकाशच्या लग्नाचा शाही थाटही काही कमी नसणार त्यामुळे सर्वांचेच डोळे या विवाहसोहळ्याकडे लागले आहेत.

 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

Read More From लग्नसराई