साधारण अभिनेता हा हँडसम कॅटगरीमध्ये मोडणारा असतो. जर तो हँडसम नसेल तर आपण त्याला क्युट अशी तरी एखादी उपमा देतोच. पण अभिनेता रणवीर सिंहला नेमकी कोणती उपमा द्यावी हा कधी कधी प्रश्नच पडतो. कारण रणवीर फॅशनच अशी काहीतरी हटके करतो. आता सध्या त्याने एक नवा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमुळे सगळीकडे त्याचीच चर्चा होऊ लागली आहे. काही जणांनी चक्क त्याच्या या फॅशनची मस्करीही केली आहे. रणवीरच्या अशा फॅशनमुळे एलियनही पृथ्वीवर यायला घाबरतात अशी कमेंट केली आहे. आता हा एकूणच त्याचा अवतार आणि हे फोटोशूट काय ते जाणून घेऊया
कपिल देवचा ‘नटराज शॉट’ लगावताना दिसला रणवीर सिंह, शेअर केला फोटो
रणवीरचा हा लुक पाहून थक्क
रणवीरचा फॅनफॉलोविंग खूपच चांगला आहे. त्याने अगदी कोणतीही स्टाईल केली तरी देखील त्यांना ती रणवीरने केली म्हणून खूप जास्त आवडते. रणवीरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये त्याने काही खास ब्रँडचे कपडे घातले आहेत. त्यासाठी त्याने हे फोटो काढले आहेत. त्याने निळ्या रंगाचा ट्रॅक सुट आणि जॅकेट घातले आहे. गळ्यात सोन्याचा मोठा नेकलेस घातला असून त्याने हातात एक छोटी बॅगही घेतली आहे. आता विशेष म्हणजे या फोटोमध्ये त्याने केसांवर वीग घातला आहे. त्यामुळे तो थोडा अधिकच वेगळा दिसत आहे. रणवीर नेहमीच काहीतरी वेगळं करत असतो. पण त्याचा हा लुक पाहून खूप जणांनी त्यांना चांगल्या कमेंट्स केल्या आहेत. पण खूप जणांनी त्याला ट्रोल देखील केले आहे. पण हे ट्रोल मजेशीर आहे. काहींनी त्याला डॉक्टरचा पत्ता पाठवला तर काहींनी त्याची तुलना एलियनशी करुन
दीपिका पादुकोणच्या ‘द्रौपदी’नंतर रणवीर सिंह साकारणार आता सूर्यपुत्र ‘कर्ण’
महागड्या ब्रँडचे असेही प्रमोशन
काही ब्रँड असे असतात की जे प्रिंट्सवरुनच ओळखता येतात. रणवीरने देखील या फोटोसाठी मोठ्या ब्रँड्सचे कपडे आणि बॅग हातात घेतली आहे. त्याने मुलीला लाजवतील अशा पद्घतीने ही बॅग हातात घेतली आहे. रणवीरचा हा लुक सोशल मीडियावर इतका गाजतोय की, आता अनेक दुसरे ब्रँड रणवीरच्या पायाशी लोळण घालतील यात काहीही शंका नाही. रणवीरचा हा लुक एकदम रेट्रो कम ट्रेंडी असा आहे. आता हा लुक कॅरी करताना केसाचा तेवढा विचार सगळ्यांनाच करावा लागेल. कारण रणवीरने जो वीग वापरला आहे. त्यातून त्याने फेमिनाईन आणि मेन अशा दोन्ही बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘जून’ – नवी सुरूवात करून देणारा, मनाची घालमेल ओळखणारा
चित्रपट रिलीजच्या प्रतिक्षेत
रणवीर सिंहच्या नव्या चित्रपटाच्या सगळेच प्रतिक्षेत सगळेच आहेत. कारण त्याचा एकही नवा चित्रपट सिंबानंतर आलेला नाही. आता त्याचा एक बिग बजेट चित्रपट रिलीज होणार आहे. 1983 च्या वर्ल्ड कपवर आधारीत या चित्रपटात कपिल देवची भूमिका रणवीर साकारणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले तरी देखील हा चित्रपट प्रदर्शनासाठी खोळंबून राहिला आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे थिएटर बंद आहेत. अद्यापही थिएटर उघडतील याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे या चित्रपटाच्या रिलीजच्या तारखा पुढे पुढे सरकवल्या जात आहे. या चित्रपटाचे नुकसान होत आहे. पण ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट रिलीज करण्याची इच्छा ही चित्रपटकर्त्यांची मुळीच नाही. त्यामुळे हा चित्रपट इतक्यात रिलीज होणार नाही.
दरम्यान चित्रपटातून नाही. पण रणवीरने फोटोतून नक्कीच सगळ्यांचे मनोरंजन केलेले आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade