बिग बॉस

हा अभिनेता होऊ शकेल Bigg Boss OTT 2 चा नवा होस्ट 

Vaidehi Raje  |  Jul 4, 2022
bigg boss ott 2

बिग बॉस हा शो नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खान हा शो होस्ट करत आहे. आता टीव्हीवरील हा शो ओटीटीवर आला आहे.त्याचा पहिला सीझन प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने होस्ट केला होता. या शोची विजेती दिव्या अग्रवाल होती, पण या शो मध्ये सहभागी झालेले शमिता शेट्टी, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट हे स्पर्धकही चर्चेत होते.  सुरुवातीला लोकांना हा शो फारसा आवडला नव्हता, पण नंतर हळूहळू शोची लोकप्रियता वाढू लागली. आता बातम्या येत आहेत की यावेळी करण जोहर हा शो होस्ट करणार नाही. कारण त्याचाच शो कॉफी विथ करणचा नवा सिझन सुरू होणार आहे.

लोकप्रिय रिऍलिटी शो ‘बिग बॉस’च्या संपूर्ण सीझनला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. त्याच धर्तीवर, कोरोनाच्या काळात OTT वर ‘बिग बॉस’ सुरू झाला, ज्याला ‘बिग बॉस ओटीटी’ म्हटले गेले.आता त्याच्या दुसऱ्या पर्वाची तयारी जोरात सुरू आहे. यावेळी ‘बिग बॉस OTT 2’ मध्ये करण नसून रणवीर सिंग होस्ट करताना दिसेल अशी चर्चा आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही 

‘बिग बॉस ओटीटी 2’ बाबत अद्याप काहीही अधिकृत जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु सध्या अशी चर्चा सुरु आहे की या शो मध्ये आता करण जोहर ऐवजी रणवीर सिंग दिसणार आहे. आता रणवीर या शो मध्ये होस्टची भूमिका निभावताना दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शोच्या निर्मात्यांनी बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनवर काम सुरू केले आहे. करण जोहरकडून डेट मिळू न शकल्याने निर्मात्यांनी रणवीर सिंगला शो होस्ट करण्यासाठी फायनल केले आहे. रणवीरने यापूर्वी ‘द बिग पिक्चर’ नावाचा रिऍलिटी टीव्ही शो होस्ट केला होता. ‘बिग बॉस ओटीटी’च्या दुसऱ्या सीझनमध्येही पाच स्पर्धक असतील. यामध्ये लोकप्रिय टीव्ही स्टार्स कांची सिंग, महेश शेट्टी आणि पूजा गौर यांना फायनल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्मात्यांची इच्छा आहे की संभावना सेठ आणि पूनम पांडे यांनीही या सीझनचा भाग व्हावे. मात्र, दोन्ही अभिनेत्रींनी अद्याप यासाठी होकार दिलेला नाही. गेल्या सीझनची विजेती दिव्या अग्रवाल होती आणि निशांत भट हा उपविजेता ठरला. मात्र, या शोमध्ये अभिनेत्री शमिता शेट्टी खूप चर्चेत होती. याच कारणामुळे तिला ‘बिग बॉस 15’ चा भाग होण्याची संधीही मिळाली. तिने हा शो जिंकला नसला तरी या शोमुळे ती खूप चर्चेत आली होती. 

Bigg Boss OTT 2

प्रथम सलमान आणि आणि नंतर फराहचे नाव होते चर्चेत 

Bigg Boss OTT 2

याआधी बिग बॉस ओटीटीबद्दल असे बोलले जात होते की सलमान खान या शोमध्ये पुनरागमन करू शकतो, परंतु आता असे होणार नाही. सध्या बिग बॉस OTT 2 च्या होस्टच्या नावाबाबत जोरदार चर्चा सुरू असली तरी यासाठी प्रथम फराह खानचे नाव समोर आले होते, त्यानंतर बातमी आली होती की हिना खान हा शो होस्ट करू शकते. पण आता या शोच्या होस्टसाठी बॉलीवूडमधील सर्वात हँडसम व्यक्तीच्या नावाची म्हणजेच रणवीरची चर्चा जोरात सुरू आहे. रणवीर सिंगने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, आता रणवीर सिंग या शोमध्ये आल्यानंतर काय बदल होतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From बिग बॉस