बिग बॉस

Bigg Boss Marathi: माऊली… विशाल निकम झाला सीझनचा विजेता

Leenal Gawade  |  Dec 26, 2021
विशाल निकम ठरला विजयी

Bigg Boss Marathi सीझन 3 चे 100 दिवस पूर्ण झाले आहेत. आज रंगलेल्या ग्रँड फिनालेच्या सोहळ्यात आपल्याला या सीझनचा विनरदेखील मिळाला आहे. या सीझनच्या विजेत्यापदावर सगळ्यांचा लाडका विशाल निकम याने आपले नाव कोरले आहे. पहिल्या टॉप 3 स्पर्धकामध्ये विकास पाटील घरातून बाहेर पडला. तर टॉप 2 मध्ये विशाल आणि जय हे दोघे स्पर्धक राहिले होते. सामना अतितटीचा होता. या सीझनसाठी दोन दावेदार हे होते हे सगळ्यांनाच माहीत होते. पण आता विशाल निकमने ही ट्रॉफी जिंकल्यानंतर सगळ्यांनाच याचा आनंद झाला आहे.

उत्कर्षही झाला गेममधून बाहेर

शेवटी उत्कर्ष आणि जय राहतील असा विश्वास होता. पण या खेळातून आता उत्कर्षदेखील बाहेर पडला. त्यामुळे विकास, विशाल आणि जय हे या खेळात राहिले. या तिघांमधून कोण जाईल ? अशी धाकधूक सगळ्यांना लागलेली असताना या खेळातून विकास पाटील हा स्पर्धक बाहेर पडला. उरलेल्या दोन स्पर्धकांमधून म्हणजेच जय आणि विशालमधून विजेत्याची निवड करण्यात आली.

मीनल झाली रेसमधून बाहेर

ज्यावेळी पहिले टॉप 5 स्पर्धक मिळाले त्यामध्ये मीनल ही घरात राहिलेली एकमेव मुलगी होती. तिला तिची जागा खूप मेहनतीने मिळाली होती. यात काहीही शंका नाही. त्यामुळे ती जिंकेल अशी अपेक्षा होती.पण ती यात पहिल्यांदा एलिमिनेट झाली आणि खूप जणांना धक्का बसला. कारण हा सीझन मीनल जिंकेल अशी अपेक्षा असताना असा अनपेक्षित निकाल लागणे हे देखील खूपच धक्कादायक होते. मीनललाही काही काळ या निकालाचा धक्का बसला होता. त्यामुळे पहिल्या चार मध्ये जाण्याची संधी ही विकास, विशाल, जय आणि उत्कर्ष यांना मिळाली. 

शेवटच्या दिवसात दिसून आली मैत्री

सीझनच्या सुरुवातीपासूनच या स्पर्धकांची चांगलीच चर्चा रंगली. कारण पहिल्याच आठवड्यात काही स्पर्धकांची हुशारी दिसून आली होती. त्यामुळे उत्कर्ष, विकास, जय, विशाल हे नक्कीच वेगळे दिसून आले होते. मुलींमध्ये मीनल ही पहिल्यापासून खेळाडू म्हणून तगडी स्पर्धक होती. इतकेच नाही तर मीरा, गायत्री आणि स्नेहा यांचे देखील वेगळेपण दिसून आले होते. त्यामुळे ही स्पर्धा चांगलीच रंगत चालली होती. या सीझनमध्ये इतके राडे झाले की, त्यामुळेच हे सीझन सगळ्यांच्या लक्षात राहिले. या घरात दोन टीम होत्या त्या दोन टीम तशाच राहिल्या. त्यामुळे प्रेक्षकांनाही काही गोष्टी आवडत होत्या. निर्णय काहीही लागला तरी देखील या सीझनमधील काही चेहऱ्यांनी आपली अशी ओळख निर्माण केली होती.

Bigg Boss Marathi: फिनालेच्या इतक्या जवळ असताना सोनाली पाटील झाली एलिमिनेट

असा रंगला ग्रँड फिनाले

ग्रँड फिनाले आणि तोही एका रिॲलिटी शोचा. तर तो एकदम खास असायला हवा. यंदाच्या या सीझनचा ग्रँड फिनालेही तितकाच चांगला रंगला. घरात सगळ्यांनी धमाकेदार असे परफॉर्मन्सही केले. संध्याकाळी 7 पासून सुरु झालेले ग्रँड फिनाले हा चांगलाच रंगला. आता प्रतिक्षा आहे पुढच्या सीझनची कारण आता या नव्या सीझनमध्ये नवे कोण स्पर्धक असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे 

आता उद्यापासून या घरातील भांडणाची चर्चा काही करता येणार नाही. पण नक्कीच खूप जणांच्या आवडीचा स्पर्धक जिंकला असेल त्यामुळे या सीझनसाठी हा दिवस विश्रांतीचा होता. 

Bigg Boss Marathi : कॅप्टन्सी कार्यात होणार पुन्हा राडा

Read More From बिग बॉस