Festival

रथसप्तमी माहिती मराठी | Ratha Saptami Information In Marathi

Trupti Paradkar  |  Dec 3, 2021
Ratha Saptami Information In Marathi

रथसप्तमी (rathasapthami in marathi) हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतातील इतर धार्मिक सणांप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर रथसप्तमीदेखील साजरी केली जाते. रथसप्तमीलाच काही जण माघ सप्तमी, आरोग्य सप्तमी, माघ जयंती, अर्क सप्तमी, पुत्र सप्तमी अथवा सूर्य जयंती असंही म्हणतात. सूर्य हा भगवान विष्णूचा अवतार असल्यामुळे या दिवशी सूर्य नारायणाची पूजा केली जाते. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला महिला हळदीकुंकवाचे वाण एकमेकींना देतात. हा समारंभ मकर संक्रातीपासून रथसप्तमीपर्यंत करण्याची पद्धत आहे. दक्षिण भारतातही हा रथसप्तमी मोठ्या प्रमाणावर साजरी होते. वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणाऱ्या रथसप्तमीच्या दिवशी दक्षिण भारतात मोठ्या उत्साहात सूर्यपूजा केली जाते. दक्षिणेत या सणाला ब्रम्होत्सव असंही म्हणतात. तिरूपती बालाजी, बिहार, ओडिसा आणि झारखंडमध्ये या सणाचे एक वेगळे महत्त्व दिसून येते. पूजा पाठ केल्यानंतर सूर्य देवाची रथयात्राही काही ठिकाणी काढली जाते. भारत हा विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आहे. मात्र भारतातील प्रत्येक धार्मिक विधीत अथवा संस्कृतीत निसर्गपूजा नक्कीच आढळून येते. निसर्गाचा मुख्य घटक असलेल्या सूर्याची उपासना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच रथसप्तमीदेखील भारतातील विविध राज्यात विविध पद्धतीने केली जाते. यासाठीच जाणून घ्या रथसप्तमी माहिती मराठी तून (ratha saptami information in marathi) यासोबतच सर्वांना द्या Makar Sankranti Wishes In Marathi | मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी.

शुभ मुहूर्त रथसप्तमी 2022 | Ratha Saptami 2022 Tithi

Ratha Saptami Information In Marathi

रथसप्तमी (rathasapthami in marathi) यंदा भारतीय कालदर्शिकेनुसार सोमवारी 7 फ्रेब्रुवारी 2022 आहे. रथसप्तमीचा शुभ मुहूर्त सात फेब्रुवारी सायंकाळी 4:35 वा. पासून 8 फ्रेबुवारी सायंकाळी 6:20 वा. पर्यंत आहे. शुभ मुहूर्ताच्या काळात रथसप्तमीची पूजा करणं लाभदायक ठरू शकतं. रथसप्तमीला सूर्यदेवाच्या उपासना केली जात असल्यामुळे सर्व पूजापाठ पहाटे लवकर उठून सुर्योदयाच्या वेळी करण्याची प्रथा आहे. असं केल्यामुळे सूर्यदेव प्रसन्न होऊन दीर्घायुष्य, आरोग्य, संतती, समृद्धी आणि यशाची बरसात भक्तांवर करतात अशी मान्यता आहे. म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व.

रथसप्तमी माहिती मराठी (Ratha Saptami Information In Marathi)

रथसप्तमीपासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. वैज्ञानिक दृष्टीने पृथ्वीची स्वतःभोवती आणि सूर्याभोवती प्रदक्षिणा सुरू असताना ज्यावेळी पृथ्वीची उत्तर धृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा त्याला उत्तरायण आणि दक्षिण धृ्वाकडील बाजू जास्तीत जास्त दक्षिणेकडे असते तेव्हा त्याला दक्षिणायन असं म्हणतात. साधारणपणे उत्तरायण हे 21 मार्च ते 21 जून पर्यंत असते तर दक्षिणायन हे 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत असते. पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरूवात होते. हिंदू धर्मामध्ये सूर्याला देवाचे स्थान असून सूर्यदेवाप्रती कृतज्ञ असण्यासाठी हा दिवस भारतात साजरा केला जात असावा. सूर्य हा निसर्गातील सर्वात मोठा तारा असून तो स्वयंप्रकाशित आहे. शिवाय सर्व ग्रह आणि ताऱ्यांसोबत तो अवघ्या विश्वाला स्वतःच्या प्रकाश आणि उष्णतेने उजळून टाकतो. सहाजिकच ज्याच्या सत्तेने सर्व निसर्ग चक्र सुरू आहे अशा सूर्य देवाची मनोभावे पूजा करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. यासाठीच जाणून घ्या रथसप्तमी माहिती मराठी (ratha saptami information in marathi)

रथसप्तमीचा इतिहास (History Of Ratha Saptami)

Ratha Saptami Information In Marathi

भारतीय पुराणात सांगितल्याप्रमाणे सूर्य देव सोन्याच्या रथातून प्रवास करतो ज्याला सात घोडे असून त्याचे सारथ्य अर्जुनाकडे असते. रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरूवात होते. सहाजिकच सूर्य नारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी (ratha saptami chi mahiti) साजरी केली जाते. शिवाय सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथ सप्तमी असं पडलं असण्याची शक्यता आहे. हा सण हिंदू धर्मामधील एक शुभ सण असून तो महाराष्ट्र आणि भारतातील काही राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी सूर्याचा जन्म झाला होता. आदिती आणि कश्यप यांचा पूत्र म्हणजे सूर्य देव…रथसप्तमीच्या दिवशी सूर्याचा जन्म झाला आणि सर्व ब्रम्हांड उजळून निघालं. सूर्य देवाचे सामर्थ्य तर सर्वांना माहीत आहेच. पण पुराणातही याबाबत अनेक कथांचा उल्लेख आढळतो, हिंदू पुराण कथेनुसार एका महान राजाकडे त्याचे राज्य चालवण्यासाठी वारस नव्हता. तेव्हा त्याने देवाजवळ प्रार्थना केली. प्रार्थनेनुसार त्याला पुत्र प्राप्ती झाली मात्र त्याचा पुत्र जन्मानंतर सतत आजारी पडू लागला. तेव्हा त्या राजाला एका साधूने रथसप्तमीच्या दिवशी पूजापाठ करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पूजापाठ केल्यावर राजाच्या मुलाचे आरोग्य सुधारले. पुराणात सांगितल्यानुसार या दिवशी पूजा पाठ केल्याने संतान प्राप्ती होते. म्हणूनच या सणाला आरोग्य सप्तमी अथवा पुत्र सप्तमी असंही म्हटले जाते. 

रथ सप्तमी पूजा विधी (Ratha Saptami Pooja Vidhi In Marathi) 

पुराणात सांगितल्याप्रमाणे रथसप्तमीची पूजा कशी करावी याची थोडक्यात माहिती…

या दिवशी पहाटे स्नान करून सूर्यदेवाची आराधना केल्यामुळे सर्व रोग आणि पापातून मुक्तता मिळते अशी मान्यता आहे. शिवाय पुत्रप्राप्तीसाठी, निरायम आरोग्यासाठी, संपत्तीसाठी आणि सोभाग्य मिळण्यासाठीदेखील सूर्यदेवाची आराधना केली जाते. 

रथ सप्तमी रांगोळी (Ratha Saptami Rangoli)

रथसप्तमीच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची असते ती म्हणजे रांगोळी… कारण भारतात प्रत्येक सणाला अथवा धार्मिक शुभकार्याला घरासमोर रांगोळी काढण्याची पद्धत आहे. रांगोळी ही भारतीय सणसमारंभांचा एक महत्त्वाचा घटक आहे. दसरा, दिवाळीप्रमाणेच रथसप्तमीलादेखील अंगणात रांगोळी काढली जाते. मात्र रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या रथाच्या आकाराची, सूर्याची अथवा सात रंग असलेली रांगोळी काढली जाते. रांगोळीभोवती दिवा लावून सूर्यदेवाचे स्वागत केले जाते. महाराष्ट्रात यासाठी ठिपक्यांची रांगोळी काढली जाते तर दक्षिण भारतात मुग्गुळु, कोलम रांगोळी काढली जाते. रांगोळीचा प्रकार वेगवेगळा असला तरी या रांगोळीतून सूर्य, सूर्यदेवाचा रथ, निसर्ग यांची प्रतिके रेखाटली जातात. 

पाहा या रथसप्तमीच्या निरनिराळ्या प्रकारच्या रांगोळ्या – 

रथसप्तमीसाठी खास महाराष्ट्रीय पद्धतीची ठिपक्यांची रांगोळी, यात रेखाटले आहेत सूर्यदेव, रथ, कमळ आणि दिवे

Ratha Saptami Information In Marathi

तुम्हाला कमी वेळात आणि झटपट रथसप्तमीची रांगोळी काढायची असेल तर ही रांगोळीचा साचा वापरून काढलेली रांगोळीदेखील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

रथसप्तमीची खास रांगोळी… यात सुंदर फुलापानांच्या सजावटीमध्ये सूर्यदेवाचा रथ रेखाटला आहे. विशेष म्हणजे हा सण संपूर्ण भारतात साजरा होतो म्हणून यात  भारताचा नकाशाही काढला आहे. 

दक्षिण भारतातील ही खास मुग्गुळु रांगोळी रथसप्तमीच्या सणाला अगदी पांरपारिक टच देईल.

पारंपरिक पद्धतीने सण साजरा करायचा असेल तर तुम्ही ही ट्रेडिशनल कोलम रांगोळी नक्कीट काढायला हवी. 

आम्ही तुमच्यासोबत शेअर केलेली रथसप्तमीची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही रथसप्तमी कशी साजरी करता हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा . या सोबतच वाचा साधी सोपी रांगोळी आणि रांगोळीचे प्रकार (Simple Rangoli Designs In Marathi).

Read More From Festival