डाएट करत असताना काही सुपर फुड्स असे असतात ज्यांचा समावेश तुमच्या डाएटमध्ये खूपच महत्वाचा असतो. आज आपण अशाच एका सुपर फूडविषयी जाणून घेणार आहोत ज्याचे नाव आहे मिलेट्स…बाजरी, नाचणी, ज्वारी जव या सगळ्यांना मिलेट्स म्हणून ओळखले जाते. अनेकदा वजन आणि शरीरातील फॅट कमी करु इच्छिणाऱ्यांना मिलेट्स खाण्याचा सल्ला अगदी हमखास दिला जातो. या मिलेट्सचे फायदे काय आणि त्याचा आहारात कसा समावेश करायचा या संदर्भात आज तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती देणार आहोत. चला तर मग करुया सुरुवात
पोषण भंडार :उत्तम आरोग्यासाठी शरीराला योग्य ते पोषण मिळणे फारच गरजेचे असते. मिलेट्समध्ये मोठ्या प्रमाणात न्युट्रीएंटस असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फारच आवश्यक असतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात याचा समावेश केला तर तुम्हाला अगदी योग्य प्रमाणात पोषण मिळते. डाएट करत असाल किंवा नसाल तरी देखील तुम्ही तुमच्या आहारात मिलेट्सचा समावेश केला तर तुम्हाला पोषक आणि चौकस असा आहार मिळतो. जो तुमच्या आरोग्यासाठी फारच महत्वाचा आहे. जर तुम्हाला तुमचा आहार परिपूर्ण आहे असे वाटत नसेल तर तुम्ही आहारात याचा समावेश करायलाच हवा.
गरोदरपणात तूप खाण्याचे काय होतात फायदे
पोटभरीचा उत्तम आहार :डाएट करताना अनेकदा असणारी अडचण म्हणजे भूक लागणे.कोणत्याही वेळी लागणारी ही भूकच अनेकदा आपल्याला नको ते खाण्यासाठी प्रवृत्ती करते. जर तुम्ही मिलेट्स खाल्ले तर तुमचे पोट जास्त वेळासाठी भरलेले राहते. तुम्हाला पटकन भूक लागत नाही. उत्तम आरोग्यासाठी नको त्यावेळी लागणारी भूक शमवणे फारच गरजेचे असते ही भूक मिलेट्समुळे उत्तम पद्धतीने शमवता येते. त्यामुळेच पोटभरीचा उत्तम आहार अशी याची ओळख आहे. त्यामुळेच तुमचे वजनही नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
ह्रदयविकारापासून ठेवते दूर:ताणतणाव कामाच्या अधिकच्या वेळा यामुळे अनेकांच्या शरीरावर नकळत ताण पडत असतो. त्यामुळेच अनेकांना ह्रदयासंदर्भात अनेक तक्रारी कायम जाणवतात. या तक्रारींकडे दुर्लक्ष केले तर अगदी हमखास ह्रदयरोग होण्याची शक्यता असते.ज्यांना या आजाराची भीती आहे. किंवा ज्यांना याचा त्रास आहे त्यांनी मिलेट्सचे सेवन करणे फायदेशीर ठरते कारण मिलेट्समध्ये पोषण गुणांसोबतच आवश्यक असे फॅट्स असतात. तुमच्या शरीराची सर्व कमतरता भरुन काढण्यासाठी ते फार गरजेचे असतात.
आहारात असेल सोयाबीन चंक्स तर होईल फायदाच फायदा
मिलेट्सपासून बनवा या रेसिपीज
मिलेट्स फायदे वाचल्यानंतर मिलेट्सपासून काय बनवता येईल असा विचार करत असाल तर तुम्ही त्यापासून या काही रेसिपी हमखास बनवू शकता.
मिलेट्सचा उपमा
- रव्याच्या उपम्याप्रमाणेच तुम्हाला मिलेट्सचा उपमा बनवता येतो.
- मिलेट्स न भाजता ते काही काळ पाण्यामध्ये भिजत घाला.ते छान दाणेदार झाले की, मग तुम्ही त्याला उपम्याप्रमाणे फोडणी देऊ शकता.
- एका कढईत तेल किंवा तूप गरम करुन त्यामध्ये मोहरी, बारीक चिरलेला कांदा, मिरची, हळद, गाजर,मटार घालून छान परतून घ्या.
- ते छान परतून झाल्यावर त्यामध्ये भिजवलेले मिलेट्स घाला आणि ते छान शिजेपर्यंत झाकून ठेवा.
- वरुन छान कोथिंबीर भुरभुरुन मस्त दही सोबत सर्व्ह करा.
मिलेट्सचा पुलाव
- मिलेट्स भिजत घाला. ते छान फुलू द्या.
- भाताच्या पुलावप्रमाणे तुम्ही सगळ्या आवडीच्या भाज्या चिरुन घ्या.
- कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करुन त्यामध्ये मोहरी, कांदा, जिरे (किंवा तुमच्या आवडीच्या भाताप्रमाणे फोडणी द्या)
सर्व मसाले आणि आवडीचे पदार्थ घालून त्यात मिलेट्स घाला. सगळे पदार्थ छान एकजीव करा आणि कुकरचे झाकण लावून साधारण 2 शिट्ट्या काढून घ्या. तुमचा मिलेट्सचा पुलाव तयार
या सारख्याच तुम्ही अनेक वेगळ्या रेसिपीज बनवू शकता. आजपासूनच तुमच्या आहारात मिलेट्सचा समावेश करा.
सकाळी उठल्याबरोबर प्याल हे तर होईल फायदाच फायदा