आपल्यापैकी प्रत्येकालाच स्वप्ने पडतात. काही स्वप्ने आपल्याला आठवतात तर काही आपण पूर्णपणे विसरतो. कधी आपल्याला चांगली स्वप्ने पडतात तर कधी वाईट. काही लोक सकाळी उठल्याबरोबर रात्रीचे स्वप्न विसरतात, परंतु अनेकांना त्यांचे स्वप्न आठवते. स्वप्न वाईट असेल तर त्यावर आपण खूप विचार करू लागतो. जरी अजूनही आपल्या शास्त्रज्ञांना स्वप्नांमागील रहस्य नीट कळू शकलेले नाहीये, परंतु त्यांच्या मते, स्वप्ने पडण्याची अनेक कारणे असू शकतात. अनेकदा आपल्याला एकच स्वप्न वारंवार पडते. कधी कधी यामागे काही संकेत असू शकतात असे तज्ज्ञ सांगतात. तुम्हालाही एखादे स्वप्न वारंवार पडत असेल तर पुढे वाचा.
स्वप्नांबद्दल काय म्हणतात शास्त्रज्ञ
शास्त्रज्ञांच्या अनेक अभ्यासांत असे लक्षात आले आहे की स्वप्न पडण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त ताण घेणे, नीट झोप न लागणे, जास्त प्रमाणात मद्यपान करणे, सिगारेट ओढणे आणि कोणतेही औषध घेणे इ. याशिवाय गरोदरपणात महिलांच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही त्यांच्या झोपेवरही परिणाम होतो, त्यामुळे त्यांना चांगली-वाईट स्वप्ने पडतात.
ज्योतिषशास्त्रानुसार वाईट स्वप्ने पडण्याचे कारण
तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्हाला माहित असेल की ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहूची दशा असते, त्याला वारंवार वाईट स्वप्ने पडतात. आपल्या अनेक धर्मग्रंथांमध्येही चांगल्या आणि वाईट स्वप्नांचा उल्लेख केलेला दिसून येतो. ज्योतिषशास्त्रानुसार जी स्वप्ने आपल्याला ठळकपणे लक्षात राहतात व वारंवार पडतात त्या प्रत्येक स्वप्नामागे काहीतरी रहस्य असते. काही स्वप्ने आपल्याला काहीतरी संकेत देत असतात. बऱ्याच लोकांचा असाही विश्वास आहे की आपण ज्या गोष्टीबद्दल पुन्हा पुन्हा विचार करतो, तेच आपल्याला स्वप्नांतही दिसते. जर एखाद्या व्यक्तीला तेच स्वप्न पुन्हा पुन्हा पडत असेल तर ते भविष्यातील घडणाऱ्या एखाद्या घटनेचा संकेत असू शकते.
वारंवार पडणाऱ्या स्वप्नांचा अर्थ काय घ्यावा
प्रत्येक स्वप्नाला काहीतरी अर्थ असतो, म्हणजे जर तुम्हाला अनेकदा स्वप्नात पाणी दिसत असेल तर त्याचे दोन अर्थ असू शकतात. स्वच्छ पाणी म्हणजे पैसा मिळवणे, तर घाणेरडे पाणी म्हणजे आर्थिक नुकसान किंवा जीवनात त्रास होऊ शकतो. याशिवाय स्वप्नात मृत व्यक्तीकडून काही मागणे अशुभ मानले जाते परंतु जर त्यांनी तुम्हाला काही दिले तर ते खूप शुभ मानले जाते. तसेच जर तुमचे पूर्वज तुमच्या स्वप्नात वारंवार येत असतील तर त्यामागे देखील काही कारण असू शकते. अशा परिस्थितीत, अशा स्वप्नांकडे दुर्लक्ष करू नये. तुमचे पूर्वज तुम्हाला स्वप्नांत अनेकदा दर्शन देत असतील तर त्यांच्या मुक्तीसाठी तुम्ही काहीतरी करणे आवश्यक आहे. म्हणजे ते गेल्यानंतर त्यांचे क्रियाकर्म व्यवस्थित झाले नसेल तर त्यांना मुक्ती मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तज्ज्ञ व्यक्तीशी चर्चा करून त्यांच्या मुक्तीसाठी योग्य ती उपाययोजना करावी.
कालसर्प दोष
काहींना स्वप्नात अनेकदा सर्प दिसतो. स्वप्नात साप दिसणे हे कालसर्प दोषामुळे असू शकते असे काही ज्योतिषतज्ज्ञांचे मत आहे. तुम्हाला वाईट स्वप्ने पडण्याचे हे देखील एक कारण आहे. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. महामृत्युंजयचा जप करणे, शिवाची पूजा करणे, इत्यादी देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल.
ताणतणाव असला की शांत झोप लागत नाही. अर्धवट झोपेतही आपल्या मनातले विचार स्वप्नांच्या रूपाने आपल्याला दिसतात. यासाठी तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याबरोबरच विश्रांतीकडेही पुरेसे लक्ष देणे आवश्यक आहे. याशिवाय तणाव कमी करण्यासाठी काही उपाय करा. तसेच जर तुम्हाला सतत वाईट आणि भितीदायक स्वप्ने पडत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Photo Credit – istockphoto, pexels
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक