आरोग्य

हिवाळ्यात का खायला हवा गाजरचा हलवा

Trupti Paradkar  |  Dec 22, 2021
reasons why you must eat Gajar Halwa this winter in Marathi

हिवाळा सुरू झालाय आणि अशा मस्त गुलाबी थंडीत तुम्ही अजून गाजरचा हलवा नाही खाल्ला तर काय मजा… कडकडीत थंडीत गरमगरम गाजरचा हलवा स्वादिष्ट तर लागतोच पण तो आरोग्यासाठी अतिशय उत्तम असतो. गोड पदार्थ असूनही गाजराच्या हलव्यामुळे चांगलेच फायदे तुमच्या आरोग्यावर होतात. म्हणूनच थंडीत गाजरचा हलवा प्रत्येक घरात बनवलाच जातो. यासाठीच जरी तुम्ही हेल्थ कॉन्शिअस असला तरी हिवाळ्यात एकदा तरी थोड्या प्रमाणात गाजरचा हलवा नक्कीच खा. यासाठी जाणून घ्या थंडीत का खावा गाजरचा हलवा आणि यासोबतच वाचा गाजर खाण्याचे फायदे.

स्पेशल पार्टीसाठी मेन्यू ठरवत आहात, मग हे वाचाच (Party Menu Ideas In Marathi)

थंडीत का खावा गाजर हलवा

गाजरचा हलवा बनवताना त्यामध्ये लाल गाजराचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. थंडीत ही गाजरे मोठ्या प्रमाणावर आणि फ्रेश मिळतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, बीटा कॅरोटीन, पोटॅशियम आणि फायबर असते. गाजर खाणे तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी लाभदायक ठरते. शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजर खायलाच हवे. थंडीत होणारे इनफेक्शन यामुळे दूर ठेवता येते. गाजरचेस सलाड, कोशिंबीरी आणि गाजराचा रस तुम्ही नक्कीच पिऊ शकता. मात्र त्यासोबत गाजरचा हलवा खाण्यास या काळात नक्कीच काही हरकत नाही. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर गाजरामधील फायबर्स तुमच्या आरोग्यासाठी उत्तम ठरते. गाजरामुळे तुमच्या शरीरातील रक्त शुद्ध होण्यास मदत होते.

केळवणाचा बेत आखताय, मग बनवा हे खास पदार्थ (Kelvan Menu In Marathi)

गाजर हलवा खाण्याचे अफलातून फायदे

गाजर हलव्यामध्ये तूप वापरण्यात येते. तूपाचे फायदे शरीरावर नक्कीच चांगले होतात. कारण यामध्ये असलेले ओमेगा थ्री फॅटी अॅसिड तुमच्या शरीराला स्वस्थ ठेवते. मात्र यासाठी अती प्रमाणात तूप गाजर हलव्यामध्ये वापरू नका. शिवाय गाजर हलव्यामध्ये वरून वेलची वापरली जाते. वेलची तुमच्या शरीरातील फॅट कमी करून तुमच्या मेंदूचे कार्य सुरळीत ठेवते. यातील ड्रायफ्रूटमुळे तुमच्या आरोग्यावर थंडीत चांगला परिणाम होतो. दूधातून तुमच्या शरीराला प्रोटीन्स आणि कॅल्शिअम मिळते. फक्त कमी प्रमाणात साखर हलव्यामध्ये वापरली तर गाजरचा हलवा खाणं तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतं.  

Read More From आरोग्य