ADVERTISEMENT
home / Diet
गाजर खाण्याचे फायदे

निरोगी जीवनशैलीसाठी जाणून घ्या गाजर खाण्याचे फायदे (Carrot Benefits In Marathi)

आहाराचा आपल्या संपूर्ण आरोग्यावर चांगला अथवा वाईट परिणाम होत असतो. यासाठीच आहारात जाणिवपूर्वक आरोग्यदायी गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे. गाजर हे एक मुबलक पोषकतत्व असलेलं कंदमुळ आहे. गाजरात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट आणि बिटा केरोटीन असतात. यासाठी गाजर खाण्याचे फायदे प्रत्येकाला माहीत असायलाच हवे. नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीराचे योग्य पोषण होते. प्राचीन काळापासून गाजराचा वापर आहारात केला जातो. गाजराचे फायदे अनेक आहेत.  थंडीत गाजरचा हलवा रेसिपी हमखास केली जाते. थोडक्यात गाजर हे अन्नाप्रमाणेच एक उत्तम औषधही आहे. यासाठीच गाजराचे गुणकारी फायदे जरूर जाणून घ्या.

गाजरातील पोषक घटक (Nutritional Value Of Carrots)

 

गाजर हे एक पौष्टिक कंदमुळ आहे. ज्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. शिवाय गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. शिवाय गाजरात व्हिटॅमिन ए, बायोटिन, व्हिटॅमिन के, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी 6, बीटा कॅरेटीन, अल्फा कॅरेटीन, ल्युटेन, लायकोपेन,असते. जे शरीराचे पोषण होण्यासाठी फायदेशीर ठरते.

एका मध्यम आकाराच्या अथवा दोन लहान आकाराच्या गाजरात पुढील पोषकतत्वं असतात –

कॅलरिज 41
पाणी88%
प्रोटिन0.9 ग्रॅम
कार्बोहायड्रेट9.6 ग्रॅम
साखर4.7 ग्रॅम
फायबर्स2.8 ग्रॅम
फॅट0.2 ग्रॅम
गाजर

आरोग्यावर होणारे गाजर खाण्याचे फायदे (Carrot Benefits In Marathi For Health)

गाजरामध्ये अनेक आरोग्यदायी घटक असतात. ज्यांचा तुमच्या आरोग्यावर चांगला परिणाम होत असतो.

ADVERTISEMENT

दृष्टी सुधारते

गाजरात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी आणि ई असल्यामुळे ते तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम ठरते. नियमित गाजराचा रस पिण्याने तुमची नजर उत्तम राहते. त्याचप्रमाणे गाजरात मुबलक प्रमाणात पौष्टिक घटक असतात ज्याचा तुमच्या आरोग्यावर नेहमीच चांगला परिणाम होत असतो. जर एखाद्या व्यक्तीच्या आहारात सतत व्हिटॅमिन ए चा अभाव असेल तर डोळ्यांच्या वरील आवरणावर त्याचा वाईट परिणाम दिसतो. यामुळे तुमच्या दृष्टीवर हळूहळू परिणाम जाणवू लागतो. यासाठीच उत्तम दृष्टीसाठी आहारात गाजराचा समावेश जरूर करा. शिवाय गाजराचे फायदे इतरांनाही सांगा.

कर्करोगापासून बचाव होतो

गाजरामध्ये असे अनेक Phytochemicals असतात ज्यामध्ये अॅंटि कॅन्सर घटक असतात. गाजरातील बीटा केरोटीन आणि कॅरोटेनॉईडमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कॅन्सरच्या पेशींना प्रतिबंध करणे सोपे जाते. काही संशोधनानुसार नियमित गाजराचा रस पिण्याने लुकेमिया अथवा तोंडाचा कॅन्सरवर मात करता येऊ शकते. 

रक्तदाब नियंत्रित राहतो

काही संशोधनानुसार रक्तदाबाच्या समस्या कमी होतात. गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असेस अनेक पोषक घटक असतात. ज्यांच्या तुमच्या रक्तदाबावर चांगला परिणाम होतो. रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीच दररोज गाजराचा रस प्या.

रक्तदाब तपासताना महिला आणि डॉक्टर

मधुमेहावर उपचार करण्यासाठी

निरोगी राहण्यासाठी आहाराबाबत काळजी घेऊन आणि वजन नियंत्रित ठेवून टाईप 2 मधुमेह कमी करता येऊ शकतो. काही संशोधनानुसार आहारात व्हिटॅमिन ए चा समावेश करून तुम्ही टाईप 2 मधुमेहावर उपचार करू शकता. गाजरात व्हिटॅमिन ए मुबलक असल्यामुळे मधुमेहींसाठी गाजर खाणं नेहमीच फायद्याचं ठरू शकतं.    

ADVERTISEMENT

रोग प्रतिकारशक्ती वाढते

व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या शरीराचे कार्य सुरळीत चालते आणि तुमचे रोगांपासून संरक्षण होते. कारण व्हिटॅमिन एमुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. यासाठीच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी गाजरामधील व्हिटॅमिन ए फायदेशीर ठरतं. म्हणूनच आहारात गाजराचा समावेश करा. 

हाडे मजबूत होतात

व्हिटॅमिन ए मुळे तुमच्या हाडांमधील पेशींचे मेटाबॉलिझम सुधारते. गाजरातील बीटा केरॉटीनमुळे तुमच्या शरीराला
अॅंटिऑक्सिडंटचा पुरवठा होतो आणि तुमच्या हाडांचे आरोग्य वाढते. 

वजन कमी करण्यास मदत होते

कच्च्या गाजरामध्ये अंदाजे 88% पाणी असतं. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गाजर असणं अतिशय गरजेचं आहे. गाजरातील फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं. ज्यामुळे तुम्हाला अवेळी भुक लागत नाही. गाजर खाण्याचे फायदे समजून घ्या आणि तुमचे वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा करा. 

कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते

नियमित गाजर खाण्यामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि शरीराला अॅंटिऑक्सिडंचा पुरवठा होतो. म्हणूनच ह्रदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी गाजर आहारात असायलाच हवे. 

ADVERTISEMENT

दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी उत्तम

ताज्या आणि कच्च्या गाजरामुळे तुमचे दात मजबूत राहतात, तोंडाला येणारा घाणेरडा वास कमी होतो. गाजरातील फायबर्समुळे तोंडात भरपुर लाळ निर्माण होते. तोंडात निर्माण होणारी लाळ तुमच्या तोंडाच्या आरोग्यासाठी चांगली असते.

यकृताचे आरोग्य सुधारते

गाजर नियमित खाण्यामुळे तुमचे यकृत निरोगी राहते. गाजरात मुबलक प्रमाणात फ्लेवोनॉईड आणि बीटा केरोटीन असते. या दोन्ही घटकांमुळे तुमचे यकृत डिटॉक्स होते आणि यकृताचे संपूर्ण कार्य सुधारते. म्हणूनच गाजर खाणे तुमच्या यकृताच्या आरोग्यासाठी उत्तम असते. 

पीसीओडीचा त्रास कमी होतो

आजकाल अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास होत असतो. पीसीओडीच्या त्रासावर उपाय करण्यासाठी ताज्या भाज्या आणि कंदमुळे खाण्याचा सल्ला दिला जातो. काही संशोधनानुसार पीसीओडीवर उपचार करण्यासाठी गाजर खाणे फायदेशीर ठरते.

गरोदरपणात फायदा होतो

गरोदर महिलांना आहारातून त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असते. गरोदर महिला जे अन्न खाता त्याचा त्यांच्या बाळाच्या विकासावर परिणाम होत असतो. मात्र गाजरातील पोषकतत्त्वांमुळे या दोघांचेही आरोग्य चांगले राहते. यासाठी गरोदर महिलांच्या आहारात गाजराचा समावेश असायाच हवा. 

ADVERTISEMENT
गरोदर महिला

सौंदर्यावर गाजराचे फायदे (Beauty Benefits Of Carrots In Marathi)

गाजर खाण्याचे फायदे अनेक आहेत मात्र एवढंच नाही. आरोग्याप्रमाणे तुमच्या सौंदर्यावर गाजराचे फायदे नक्कीच होतात. जाणून घेण्यासाठी वाचा ही माहिती.

सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात

वयोमानुसार प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एजिंगच्या खुणा दिसू लागतात. मात्र आजकाल धुळ, माती, प्रदुषण याचा परिणाम त्वचेवर होत असतो. ज्यामुळे वयाच्या आधीच चेहऱ्यावर फाईन लाईन्स आणि सुरकुत्या  दिसायला लागतात. मात्र जर तुमच्या आहारात नियमित गाजराचा समावेश असेल तर तुमच्या एजिंगच्या खुणा लवकर दिसत नाहीत. शिवाय वयोमानानुसार येणाऱ्या या खुणा लपवण्यासाठी तुम्ही गाजरापासून तयार केलेले फेसपॅक चेहऱ्यावर लावू शकता. याचप्रमाणे तुम्ही डार्क सर्कल्स अथवा डोळ्याखाली काळी वर्तुळं कमी करण्यासाठी तुम्ही दररोज गाजराचा रस पिऊ शकता. 

त्वचेचे आजार बरे होतात

गाजरामधील अॅंटी ऑक्सिडंट घटकामुळे तुमच्या शरीरातील रक्त शूद्ध होते. त्वचेचे योग्य पोषण न झाल्यामुळे अथवा इनफेक्शमुळे त्वचेच्या समस्या आणि आजार निर्माण होत असतात. मात्र जर तुम्ही नियमित गाजराचे सेवन करत असाल तर तुम्हाला त्वचेच्या समस्या कमी होतात. 

त्वचेचा कोरडेपणा कमी होतो

त्वचेला पुरेसे पोषण न मिळाल्यास तुमची त्वचा कोरडी होते. त्वचेचा हा कोरडेपणा कमी करण्यासाठी नियमित गाजर खाणे फायदेशीर ठरेल. याचप्रमाणे गाजराचा रस पिण्यानेदेखील तुमची त्वचा हायड्रेट राहते. गाजराच्या रसाने चेहऱ्यावर एक नैसर्गिक ओलावा आल्यामुळे त्वचा मऊ आणि मुलायम होते.

ADVERTISEMENT

हानिकारक सुर्यकिरणांपासून संरक्षण होते

गाजरातील अॅंटि ऑक्सिडंट तुमचे सुर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करतात. गाजरातील बीटा केरोटीन हे एक प्रकारच्या सन प्रोटेक्टरप्रमाणे काम करते. मात्र ते सनस्क्रीन नक्कीच नाही. म्हणूनच त्वचेचं सुर्यकिरणांपासून संरक्षण करण्यासाठी गाजर खाण्यासोबतच चांगल्या सनस्क्रीनचादेखील वापर करा. 

चेहऱ्यावरील डाग आणि व्रण कमी होतात

गाजरामध्ये त्वचा नितळ करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे तुमची त्वचेवरील डाग आणि व्रण कमी होतात. चेहऱ्यावरचे डाग कमी झाल्यामुळे त्वचा उजळ दिसू लागते. ज्याचा परिणाम  तुमच्या त्वचेच्या ग्लोवर होतो. म्हणूनच नियमित चेहऱ्यावर गाजराचा रस लावणं फायदेशीर ठरेल. 

केस मजबूत होतात

गाजरातील पोषक घटकांमुळे तुमच्या त्वचेप्रमाणेच तुमच्या केसांचेही योग्य पोषण होते. केसांचे पोषण न झाल्यास केस निस्तेज होतात अथवा अकाली पांढरे दिसू लागतात. मात्र तुम्हाला जर घनदाट, काळेभोर केस हवे असतील तर आहारात गाजराचा समावेश जरूर करा. 

मजबूत केस असलेली महिला

केस गळणे कमी होते

नियमित गाजर खाण्यामुळे तुमचे केस गळणंदेखील कमी होऊ शकतं. गाजरामधील पोषक घटकांमुळे केस कमकुवत होणं, केसांना फाटे फुटणं, केस कोरडे आणि निस्तेज होणं कमी होतं. ज्यामुळे तुमचे केस कमी  गळतात आणि घनदाट दिसतात.

ADVERTISEMENT

गाजराच्या फायद्यांबाबत मनात असलेल निवडक प्रश्न – FAQ’s

 

1. दररोज गाजर खाणे योग्य आहे का ?

होय नक्कीच. गाजरामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळते. माणसाच्या शरीराचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. शिवाय गाजरात फायबर्सही भरपूर असतात. ज्यामुळे अपचनाची समस्या होत नाही. यासाठी आहारात गाजराचा रस, कोशिंबिर, सलाड, पछडी, हलवा जरूर असायला हवा.             

2. गाजराचा रस पिणे  योग्य की गाजर कच्च्या स्वरूपात खाणे योग्य ?

गाजराचे तुकडे करून ते कच्च्या स्वरूपात खाणे नेहमीच योग्य मात्र जर तुम्हाला न गाळलेला गाजराचा रस पिणे शक्य असेल तर तो प्या ज्यामुळे गाजरामधील फायबर्स तुमच्या सहज पोटात जातील. 

ADVERTISEMENT

3. गाजर खाण्याचे काही दुष्परिणाम आहेत का ?

नक्कीच नाही. कारण गाजर खाण्याचे फायदे अधिक आहेत. पण कोणतीही गोष्ट अती प्रमाणात खाल्ली तर ती त्रासदायक ठरू शकते. यासाठीच योग्य प्रमाणात गाजराचे सेवन करा. 

4. गरोदरपणात गाजर खाण्यामुळे काय फायदा होतो ?

गरोदर असताना महिलेने तिच्या आणि तिच्या बाळाच्या आरोग्याची काळजी  घ्यायला हवी. गाजरातील पोषक घटक आईच्या पोषणातून बाळाला मिळत असतात. गाजर खाण्यामुळे बाळाची वाढ आणि विकास चांगली होते. यासाठी प्रत्येक गरोदर महिलेला गाजर खाण्याचे फायदे माहीत असायला हवे. 

ADVERTISEMENT

5. गाजराचा रस नेमका कधी प्यावा ?

गाजराचा रस दिवसभरात कधीही पिण्यास काहीच हरकत नाही. मात्र सकाळी उठल्यावर, व्यायामानंतर गाजराचा रस पिल्यास पटकन फ्रेश वाटू शकते.

 

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

जाणून घ्या कंदमूळं खाणं आरोग्यासाठी कसं आहे फायदेशीर

हिवाळ्याच्या दिवसात आवर्जून खा काळं गाजर

सुपरफूड अवकॅडोचे आरोग्यदायी फायदे (Avocado Benefits In Marathi)

06 Feb 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT