Care

हेअर प्रॉडक्ट वापरताना मुळीच चुकवू नका हा क्रम

Trupti Paradkar  |  Jul 9, 2021
हेअर प्रॉडक्ट वापरताना मुळीच चुकवू नका हा क्रम

त्वचा आणि केसांची निगा नियमित राखणं खूप गरजेचं आहे. पण बऱ्याचजणींना वाटतं की यासाठी फक्त चांगले प्रॉडक्ट वापरलं की झालं. पण असं मुळीच नाही कारण जर प्रॉडक्ट चांगले असतील तरी ते चुकीच्या क्रमाने वापरले तरी तुमच्या त्वचा आणि केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठीच जाणून घ्या केसांची निगा राखताना कसे वापरावे स्टेप बाय स्टेप हेअर प्रॉडक्ट. ज्यामुळे ते प्रॉडक्ट तुमच्या केसांवर योग्य परिणाम करतील आणि तुमचे केस होतील मऊ आणि चमकदार

हेअर प्रॉडक्ट वापरण्याचा योग्य क्रम

केसांची निगा राखण्यासाठी तेलापासून कंडिशनरपर्यंत अनेक प्रॉडक्ट सध्या  बाजारात आहेत. मात्र हे प्रॉडक्ट वापरताना तुम्हाला त्यांचा योग्य क्रम माहीत असायला हवा. जर योग्य क्रमात हे प्रॉडक्ट वापरले नाहीत तर या प्रॉडक्टचा परिणाम चांगला होणार नाही. चुकीच्या पद्धतीने वापरलेली उत्पादने तुमच्या केसांवर चुकीचा परिणाम करू शकतात. यासाठी चांगल्या परिणामासाठी तुम्हाला हेअर केअर प्रॉडक्टचा योग्य क्रम (Right order to apply Hair care products)  माहीत असणं खूप गरजेचं आहे. यासाठी जाणून घ्या  क्रमाक्रमाने केसांवर कसे वापरावे हेअर प्रॉडक्ट

हेअर ऑईल –

केसांची निगा राखायची म्हणजे फक्त केस चांगल्या पद्धतीने  स्वच्छ करायचे असं नाही. केस धुण्याआधी तुम्हाला  केसांचे योग्य पोषण करण्यासाठी हेअर ऑईलने मसाज करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण केसांना धुण्याआधी आदल्या रात्री अथवा दिवसभर तेल लावल्यास केसांमध्ये ते योग्य पद्धतीने मुरते. केसांना तेल लावण्याआधी ते थोडं कोमट करा म्हणजे केसांना हॉट ऑईल मसाज मिळू शकेल. कोमट तेल केसांच्या मुळांमध्ये  लवकर मुरतं आणि केसांना योग्य पोषण मिळू शकतं.

हेअर शॅम्पू आणि कंडिशनर –

आदल्या दिवशी केसांना तेलाने मालिश केल्यावर दुसऱ्या दिवशी केस चांगल्या शॅम्पूने धुवावेत. तुमचे केस कोणत्या प्रकारचे आहेत त्यानुसार तुम्ही केसांसाठी शॅम्पू निवडू शकता. शक्य असल्यास सौम्य, सल्फेट फ्री शॅम्पू केसांसाठी चांगले ठरतात. केस धुतल्यावर ते घट्ट पिळून घ्या आणि मगच केसांवर कंडिशनर लावा. कंडिशनर कधीच स्काल्पवर लावू नका. केसांच्या मुळांना कंडिशनर लावा आणि थोड्या वेळाने केस साध्या पाण्याने धुवून टाका. केस शॅम्पू आणि कंडिशनर करत असताना केसांवर गरम पाणी न वापरता कोमट अथवा थंड पाण्याचा वापर करा.

डीप डिशनिंग मास्क –

जर तुमचे केस फारच कोरडे आणि रूक्ष असतील तर तुम्ही केसांना मऊपणा यावा यासाठी डीप कंडिशनर मास्कचा वापर करू शकता. डीप कंडिशनर मास्क तुम्ही केस धुतल्यावर आठवड्यातून दोन ते तीन वेळा केसांना लावू शकता. मात्र असा एखादा हेअर मास्क वापरण्याआधी त्यावर लिहिलेल्या सर्व नियमांचे योग्य पद्धतीने पालन करा. 

हेअर सीरम –

केसांचे संरक्षण होण्यासाठी तुम्ही केसांचा वरचा लेअर हेअर सीरमने सुरक्षित करू शकता. हेअर सीरम नॉन स्टिकी आणि केसांना मऊपणा आणि चमक देणारे असतात. केस सुकताना थोडे ओलसर असताना काही थेंब हेअर सीरम तुम्हाला केसांच्या मध्याकडून टोकाकडील भागाला लावायचे आहे. जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर हेअर सीरममुळे तुमचे केस हायड्रेट राहतील. सीरमवर दिलेल्या सूचनेनुसार हेअर सीरम तुमच्या स्काल्पवर लावा. 

हेअर स्प्रे –

हेअर स्प्रे हे असं एक प्रॉडक्ट आहे जे  तुम्हाला केसांची स्टाईल केल्यावर केसांना लावावे लागते. हेअर स्प्रेमुळे तुमचे केस आहेत तसेच सेट राहतात आणि बराच काळ तुमची हेअर स्टाईल टिकून राहते. मात्र हेअर स्प्रेचा वापर गरज असेल तेव्हाच करा कारण असं न केल्यास तुमचे केस खराब होण्याची शक्यता अधिक असते. हीट प्रोटेक्ट हेअर स्प्रे वापरल्यामुळे तुम्ही केसांचे हिटिंग टूल्सपासून संरक्षण करू शकता. हेअर स्टाईल करताना केसांवर हेअर स्ट्रेटनर, ड्रायर असे प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी हीट प्रोटेक्ट हेअर स्प्रे तुम्हाला वापरायचा आहे. 

फोटोसौजन्य –  Pixels

अधिक वाचा –

खास समारंभासाठी केसांच्या कोणत्या हेअरट्रिटमेंट कराव्यात, जाणून घ्या

आठवड्यात होतील केस घनदाट, असे वापरा राईचे तेल

सतत करत असाल या हेअर स्टाईल कर केस होतील खराब

Read More From Care