त्वचेची काळजी

असं लावाल सनस्क्रीन तर कधीच होणार नाही सनबर्न, जाणून घ्या योग्य पद्धत

Trupti Paradkar  |  May 25, 2022
Right way to apply sunscreen in Marathi

उन्हाळ्यात घाम आणि कडक सूर्यप्रकाशामुळे घराबाहेर पडणं नकोसं होतं. पण समर सीझनमध्येच सुट्टी असल्यामुळे वेकेशनचे देखील प्लॅन केले जातात. अशा वेळी समुद्रकिनारी अथवा डोंगरदऱ्यांमधून फिरताना सनटॅन होण्याची जास्त शक्यता असते. सनस्क्रीन लावून तुम्ही सनटॅन अथवा सनबर्नचा त्रास कमी करू शकता. यासाठी जाणून घ्या सनस्क्रीनबाबत संपूर्ण माहिती। Everything About Sunscreen And Lotion … पण असं असलं तरी उन्हाळ्यात सनप्रोटेक्शन घेऊनही कधी कधी सनबर्नचा त्रास होऊ शकतो. यामागे तुमची सनस्क्रीन लावण्याची पद्धत कारणीभूत असते. म्हणून स्कीन केअर साठी सनस्क्रीन कसं लावावं हे तुम्हाला माहीत असायला हवं.

सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत (Right way to apply sunscreen)  

कोणतंही स्कीन केअर प्रॉडक्ट तुम्ही कसं लावता हे खूप महत्त्वाचं आहे. यासाठी जाणून घ्या सनस्क्रीन लावण्याची योग्य पद्धत

सनस्क्रीन कधी लावावं

बाहेर निघण्यापूर्वी कमीत कमी वीस मिनीटे आधी सनस्क्रीन लावा. कारण सनस्क्रीन लावून लगेच घराबाहेर पडणं चुकीचं आहे. वीस मिनीटे आधी सनस्क्रीन लावलं तर त्यामुळे तुमच्या त्वचेचं संरक्षण होऊ शकतं. शिवाय दिवसभरात फक्त एकदाच सनस्क्रीन लावून काम होणार नाही. दर दोन तासांनी तुम्हाला सनस्क्रीन त्वचेवर लावावं लागेल.

कंजुसपणा करू नका

सनस्क्रीन लोशन हात, पाय चेहरा आणि शरीराचा उघडा राहिल अशा प्रत्येक भागावर लावायला हवं. म्हणूनच कंजुसपणा न करता शरीरावरील या सर्व भागावर पुरसे सनस्क्रीन लावा आणि मगच घराबाहेर पडा.

Right way to apply sunscreen in Marathi

सनस्क्रीन म्हणजे पूर्ण सुरक्षा कवच नाही

सनस्क्रीन म्हणजे सूर्यकिरणांपासून सुरक्षित ठेवणारं दिव्य कवच आहे असा अनेकांचा समज होतो. मात्र ठेवा सनस्क्रीन तुम्हाला पन्नास ते नव्वद टक्के सुरक्षित ठेवू शकतं. यासाठीच सनस्क्रीन लावलं आहे तर तुम्ही विनाकारण सूर्यप्रकाशात बसू नका. कारण जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहणं नक्कीच सुरक्षित नाही.

सनस्क्रीन आणि बरंच काही…

सनस्क्रीन लावलं तरी स्कार्फ, टोपी, गॉगल, चांगले फूटवेअर, छत्री अशा गोष्टी उन्हाळ्यात जवळ बाळगा. ज्यामुळे तुमची त्वचा काळवंडणार नाही. उन्हाळ्यात अनेक लग्न समारंभ अथवा कार्यक्रम असतात, अशावेळी मेकअप करण्याआधी योग्य पद्धतीने सनस्क्रीन लावलं तर त्वचा काळवंडत नाही. म्हणूनच जाणून घ्या उन्हाळ्यात मेकअप कसा करावा | Tips For Summer Makeup In Marathi

सनस्क्रीन निवडताना सावध राहा

प्रत्येकाची त्वचा निरनिराळी असते. सहाजिकच तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य सनस्क्रीन लावलं तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय सनस्क्रीन निवडताना ते जास्त एसपीएफ असलेलं निवडा ज्यामुळे तुमच्या त्वचेचं जास्तीत जास्त संरक्षण होईल. यासाठी जाणून घ्या तेलकट त्वचेसाठी उत्तम सनस्क्रिन | Best Sunscreen For Oily Skin

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा   MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From त्वचेची काळजी