मासे आणि चिकन जर तुम्ही खात असाल तर तुमच्यासाठी आजचा आमचा विषय फारच महत्वाचा आहे. घरी मासे आणि चिकन आणल्यानंतर ते सर्वसाधारणपणे स्वच्छ केले जाते आणि धुतले जाते. पण तुम्हालाही मासे किंवा चिकन आणल्यानंतर साफ करण्याची अशी सवय लागली असेल तर तुमच्या आरोग्यासाठी ही गोष्ट चांगली नाही. आज आपण जाणून घेणार आहोत मासे आणि चिकन स्वच्छ करण्याची योग्य पद्धत.
#Fishlover जाणून घ्या फिश फ्राय करण्याची योग्य पद्धत
तुम्ही करत नाही ना ही चूक
shutterstock
- काही जणांना मासे आणि चिकन आणल्यानंतर त्याचा वास अनेकांना सहन होत नाही. त्यामुळे चिकन आणि मासे सरळ ते नळाखाली धरतात. असे करताना तुम्ही जर चिकन आणि मासे खसाखसा धूत असाल तर तुमची ही पद्धत फारच चुकीची आहे. कारण चिकन आणि मासे खसाखसा धुणे अजिबात चांगले नाही कारण असे करत असाल तर तुम्हाला मासांहारामधील पोषक घटक अजिबात मिळणार नाही.
- शिवाय काही जण मासे कापून घेतल्यानंतर किंवा चिकनचे तुकडे केल्यानंतर ते धुतात. असेही करणे चांगले नाही. कारण असे केल्यामुळे मासे आणि चिकनची चव म्हणावी तितकी चांगली लागत नाही.
- जर तुम्ही मासे आणि चिकन स्वच्छ व्हावे म्हणून गरम पाण्याने धूत असाल तर ही पद्धतही चुकीची आहे. गरम पाण्याने तुम्ही चिकन आणि मासे धुतले तरी त्यातील पोषकघटकं गरम पाण्यासोबत निघून जातात. मासे शिजवल्यानंतर ते चिवट आणि वातड लागतात.
- काहींना मासे स्वच्छ करणे कपडे स्वच्छ करण्यासारखे वाटते म्हणून ते बाजारातून आणल्यानंतर किमान 5 ते 7 वेळा तरी पाण्यातून काढतात. त्यामुळे माशांमध्ये असलेलं क्षार निघून जातं आणि मासे, चिकन बेचव लागू लागतात.
कोबी आणि फ्लॉवरच्या भाजीचा दर्प असा करता येईल कमी
असे स्वच्छ करा मासे आणि चिकन
shutterstock
- कोळंबी, हलवा, पापलेट, सुरमई असे कोणतेही मासे आणल्यानंतर जर तुम्ही ते कापून आणले असतील तर मग तुम्ही त्याला त्यात एकदाच पाणी घालून धुवून घ्या. आणि मग त्यात मीठ घाला.
- शिंपल्या, खेकडे या सारखे मासे स्वच्छ करताना ते बरेचदा धुतले जातात. कारण शेल असलेल्या माशांमध्ये अनेकदा समुद्राची वाळू अडकलेली असते. ती जर तशीच राहिली तर तुमचे जेवण अगदीच चरचरीत लागू लागते.त्यामुळे असे मासे किमान दोन चार वेळा धुतलेले बरे असतात. पण तेही फार धुवू नयेत.
- चिकन घरी आणलं असेल आणि ते कापून आणलं असेल तरी सुद्धा तुम्हाला ते एकदा किंवा दोनदाच फार फार धुवायचे आहे.जर तुम्ही बाजारात मिळणारे साफ केलेलं चिकन आणलं असेल तर तुम्ही ते फार धुवूच नका. अगदी नावाला त्याला पाण्यातून काढा. कारण पॅक करण्याआधी हे चिकन व्यवस्थित धुतलेलं असतं.
- त्यामुळे आता जर तुम्ही घरी चिकन किंवा मासे आणले असतील तर ते धुताना काळजी घ्या. कारण जर तुम्ही ते खूप धुतले तर तुम्हाला त्या पासून मिळणारे फायदे मिळणार नाहीत.
हेही वाचा –
मासे खाऊन मिळवा सुंदर त्वचा, केस आणि निरोगी आरोग्य