आपल्या प्रत्येकाकडे एकतरी लेदर बॅग नक्कीच असते. जर तुमच्याकडे प्युअर लेदर बॅग असेल तर तिची काळजी घेणं गरजेचे असते. कारण कालांतराने लेदर बॅग या जुन्या वाटू लागतात. त्यांची चमक निघून जाते किंवा leather वर घाण साचते. ही बॅग साफ करण्यासाठी थेट लाँड्रीमध्ये द्यावी लागते. पण जर तुम्हाला इतका खर्च न करता तुमच्या बॅगची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी तुमच्या बॅगची स्वच्छता करु शकता. आता जाणून घेऊया घरच्या घरी leather बॅग कशी स्वच्छ करायची ते.
बाहेर जाण्याचा प्लॅन करताय, देशातील ही ठिकाणं आहेत ऑगस्ट महिन्यासाठी बेस्ट
डिटर्जंट (Detergent Water)
shutterstock
वेगवेगळ्या कंपनीचे कपडे धुण्याचे डिटर्जंट हल्ली अगदी सहज उपलब्ध असतात. याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या लेदर बॅगवरील डाग काढू शकता. तुम्हाला एका भांड्यात थोडेसे डिटर्जंट आणि पाणी घ्यायचे आहे. एक पातळ आणि स्वच्छ कपडा घेऊन डिटर्जंटमध्ये बुडवून तुम्हाला तुमची लेदर बॅग स्वच्छ करता येते. बॅग स्वच्छ झाल्यानंतर दुसरा कपडा घेऊन तो स्वच्छ पाण्यात बुडवून बॅगवरुन डिटर्जंट काढायला विसरु नका.
*कारण जर तुमची बॅग ओली राहिली तर हे लेदर खराब होऊ शकते.
ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर (Olive Oil and Vinegar)
shutterstock
Leather बॅगसाठी आणखी एक दुसरा उपाय आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर. तुम्हाला एका भांड्यात एक बूच ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळायचे आहे. अगदी डिटर्जंटच्या इलाजाप्रमाणे तुम्हाला कपड्याचा उपयोग करुन ते बॅगवर फिरवायचे आहे. व्हिनेगरमुळे तुमच्या बॅगवरील घाण निघून जाते आणि ऑलिव्ह ऑईलमुळे लेदर चमकते त्यामुळे तुम्हाला तुमची बॅग अगदी लगेचच स्वच्छ आणि चमकदार दिसते.
उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य
मॉश्चरायझर (Moisturizer)
shutterstock
एखाद्या मॉश्चरायझरचा उपयोग करुनही तुम्ही तुमची बॅग स्वच्छ करु शकता. तुमच्याकडे एखादे मॉश्चरायझर असेल तर ते टिश्यू पेपरवर घेऊन मॉश्चरायझर तुमच्या लेदर बॅगवर लावा. तुम्हाला तुमची बॅग स्वच्छ दिसेलच. शिवाय तुम्हाला तुमचे लेदर चमकदार दिसेल. तुमच्या घरी असलेले कोणतेही मॉश्चरायझर तुम्ही यासाठी वापरु शकता.
क्युटीकल रिमुव्हल क्रिम किंवा पेट्रोलिअम जेल (Cuticle remover cream)
shutterstock
क्युटीकल क्रिम किंवा पेट्रोलिअम जेलचा उपयोग करुनही तुम्ही तुमची leather bag स्वच्छ करु शकता. सॉफ्ट टिश्यू पेपरवर जेल घेऊन तुम्हाला तुमच्या बॅगवर ही जेल फिरवायची आहे. जर तुम्हाला ही जेल अधिक चिकट वाटत असेल तर तुम्ही दोन तीन वेळा टिश्यू पेपर फिरवून तुम्ही तुमची बॅग स्वच्छ करुन घ्या.
पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
हे ही असू द्या लक्षात
- तुमचे Leather कोणत्या प्रकारातील आहे त्याची माहिती असू द्या. जर तुमचे leather कडक असेल तर त्यावर काहीही करताना थोडे अलगद करा.
- Soft leather वर पाणी राहिले म्हणून ती बॅग पिळायला जाऊ नका. कारण त्यामुळे तुमच्या बॅगच्या लेदरचे तुकडे पडू शकतात.
- बॅगेचे कोपरे साफ करण्यासाठी कोणत्याही अणुकुचीदार वस्तूचा उपयोग करु नका. त्यापेक्षा इअरबड्सचा वापर करा.
- Leather बॅग स्वच्छ केल्यानंतर त्या कोरड्या करणे आवश्यक असते.
- महिन्यातून किमान एकदा तरी तुम्ही तुमची leather बॅग स्वच्छ करा.