DIY लाईफ हॅक्स

जाणून घ्या leather बॅग स्वच्छ करण्याच्या योग्य पद्धती

Leenal Gawade  |  Jul 29, 2019
जाणून घ्या  leather बॅग स्वच्छ करण्याच्या योग्य पद्धती

आपल्या प्रत्येकाकडे एकतरी लेदर बॅग नक्कीच असते. जर तुमच्याकडे प्युअर लेदर बॅग असेल तर तिची काळजी घेणं गरजेचे असते. कारण कालांतराने लेदर बॅग या जुन्या वाटू लागतात. त्यांची चमक निघून जाते किंवा leather वर घाण साचते. ही बॅग साफ करण्यासाठी थेट लाँड्रीमध्ये द्यावी लागते. पण जर तुम्हाला इतका खर्च न करता तुमच्या बॅगची काळजी घ्यायची असेल तर तुम्ही अगदी घरच्या घरी तुमच्या बॅगची स्वच्छता करु शकता. आता जाणून घेऊया घरच्या घरी leather बॅग कशी स्वच्छ करायची ते.

बाहेर जाण्याचा प्लॅन करताय, देशातील ही ठिकाणं आहेत ऑगस्ट महिन्यासाठी बेस्ट

डिटर्जंट (Detergent Water)

shutterstock

वेगवेगळ्या कंपनीचे कपडे धुण्याचे डिटर्जंट हल्ली अगदी सहज उपलब्ध असतात. याचा उपयोग करुन तुम्ही तुमच्या लेदर बॅगवरील डाग काढू शकता. तुम्हाला एका भांड्यात थोडेसे डिटर्जंट आणि पाणी घ्यायचे आहे. एक पातळ आणि स्वच्छ  कपडा घेऊन डिटर्जंटमध्ये बुडवून तुम्हाला तुमची लेदर बॅग स्वच्छ करता येते. बॅग स्वच्छ झाल्यानंतर दुसरा कपडा घेऊन तो स्वच्छ पाण्यात बुडवून बॅगवरुन डिटर्जंट काढायला विसरु नका. 

*कारण जर तुमची बॅग ओली राहिली तर हे लेदर खराब होऊ शकते.

ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर (Olive Oil and Vinegar)

shutterstock

Leather बॅगसाठी आणखी एक दुसरा उपाय आहे तो म्हणजे ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर. तुम्हाला एका भांड्यात एक बूच ऑलिव्ह ऑईल आणि व्हिनेगर समप्रमाणात मिसळायचे आहे. अगदी डिटर्जंटच्या इलाजाप्रमाणे तुम्हाला कपड्याचा उपयोग करुन ते बॅगवर फिरवायचे आहे. व्हिनेगरमुळे तुमच्या बॅगवरील घाण निघून जाते आणि ऑलिव्ह ऑईलमुळे लेदर चमकते त्यामुळे तुम्हाला तुमची बॅग अगदी लगेचच स्वच्छ आणि चमकदार दिसते. 

उपवासाच्या दिवसात चहा-कॉफी पिणं योग्य की अयोग्य

मॉश्चरायझर (Moisturizer)

shutterstock

एखाद्या मॉश्चरायझरचा उपयोग करुनही तुम्ही तुमची बॅग स्वच्छ करु शकता. तुमच्याकडे एखादे मॉश्चरायझर असेल तर ते टिश्यू पेपरवर घेऊन मॉश्चरायझर तुमच्या लेदर बॅगवर लावा. तुम्हाला तुमची बॅग स्वच्छ दिसेलच. शिवाय तुम्हाला तुमचे लेदर चमकदार दिसेल. तुमच्या घरी असलेले कोणतेही मॉश्चरायझर तुम्ही यासाठी वापरु शकता.

क्युटीकल रिमुव्हल क्रिम किंवा पेट्रोलिअम जेल (Cuticle remover cream)

shutterstock

क्युटीकल क्रिम किंवा पेट्रोलिअम जेलचा उपयोग करुनही तुम्ही तुमची leather bag स्वच्छ करु शकता. सॉफ्ट टिश्यू पेपरवर जेल घेऊन तुम्हाला तुमच्या बॅगवर ही जेल फिरवायची आहे. जर तुम्हाला ही जेल अधिक चिकट वाटत असेल तर तुम्ही दोन तीन वेळा टिश्यू पेपर फिरवून तुम्ही तुमची बॅग स्वच्छ करुन घ्या.

पावसाळ्यात कपडे वाळवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

हे ही असू द्या लक्षात

 

 

Read More From DIY लाईफ हॅक्स