बॉलीवूड

सांड की आंखच्या निर्मातीने 100 लीटर ब्रेस्ट मिल्क केलं अनाथ मुलांना दान

Trupti Paradkar  |  Oct 18, 2021
Saand Ki Aankh producer Nidhi Parmar donated 100 Litres Of Breast Milk in Marathi

तापसी पन्नू आणि भूमी पेडनेकरच्या मुख्य भूमिका असलेला महिला प्रधान चित्रपट सांड की आंख तुम्ही नक्कीच पाहिला असेल. या चित्रपटाची निर्माती आहे निधी परमार हिरानंदानी… निधी सध्या कोणत्याही चित्रपटासाठी नाही तर एका समाज कार्यासाठी चर्चेत आहे. निधीने मागच्या लॉकडाऊनमध्ये अनेक अनाथ मुलांचा जीव वाचवला आहे. कारण तिने या काळात स्वतःचं 100 लीटर दूध या तान्हुल्यांसाठी दान केलं आहे. एका मुलाखतीत तिने यामागचा उद्देश स्पष्ट केला आहे.

Bigg Boss Marathi : चावडीवर घेतली पुन्हा गायत्री-मीराची शाळा, सुरेखा कुडची झाल्या आऊट

वयाच्या चाळीशीत निधी झाली आई

निधी परमार हिरानंदानीने एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिच्या मते जेव्हा ती 37 वर्षांची होती तेव्हाच तिने तिचे स्त्रीबीज म्हणजेच एग्ज फ्रीज करून ठेवले होते. कारण त्या काळात तिला आई होण्यापेक्षा तिच्या करिअरकडे लक्ष देणं जास्त महत्त्वाचं होतं. यासाठी ती तरूणपणीच मुंबईत आली आणि खूप स्ट्रगल करत स्वतःचे अस्तित्त्व निर्माण केले. अस्टिटंट डायरेक्टर पासून टॅलंट एजंटपर्यंत तिने अनेक भूमिका निभावल्या. याच काळात तिला आयुष्याचा जोडीदारही मिळाला. लग्नानंतर लगेच आई व्हायचं नव्हतं म्हणून तिने स्त्रीबीज फ्रीज करून ठेवलं. ज्यामध्ये तिच्या पतीने तिला संपूर्ण सपोर्ट दिला. त्याच काळात मी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आणि सांड की आंखची निर्मिती केली. या चित्रपटाच्या यशानंतर निधीला ती सेटल झाली आहे आणि आता ती आई होण्याचा निर्णय घेऊ शकते असं वाटू लागलं. स्त्रीबीज फ्रीज केलेले असूनही निधीला नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा झाली. बाळाच्या  जन्माचा नऊ महिन्यांचा काळही तिच्यासाठी अतिशय सुखावह होता. माझ्या मुलासोबत तो काळ मी आनंदात घालवला. वयाच्या चाळीशीत आई होण्याचा प्रवास कसा होता हे इतर महिलांनाही समजावे यासाठी तिने तिचा हा प्रवास शब्दबद्ध करत शेअर केला आहे.

भगवान श्रीरामाच्या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळालेले अभिनेते

निधीने दिलं अनेक तान्हुल्यांना जीवदान

निधीसाठी करिअर असो वा एका बाळाची आई हा कोणताच प्रवास सहज सोपा नक्कीच नव्हता. प्रत्येकाला त्यासाठी थोडेफार कष्ट घ्यावेच लागतात. मात्र यामुळे निधीला करिअर आणि आई होण्याबाबत लोकांच्या मनात असलेल्या बुरसट विचारसरणीला ब्रेक करायचं होतं. यासाठीच तिने ब्रेस्टफिडिंग करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या काळात अनेक अनाथ मुलांना आईच्या दुधाची गरज होती. कारण प्रीमॅच्युअर बेबी, अनाथ नवजात बाळ किंवा एखाद्या नवमातेमध्ये पुरेसे दूध निर्माण होत नसेल तर तिच्या बाळाच्या पोषणासाठी इतर मातेचे दूध वरदान ठरू शकते. यासाठी तिने लॉकडाऊनच्या काळात जवळजवळ स्वतःचे 100 लीटर दूध या मुलांसाठी दान केले. आज तिला लोक विचारतात की, बाळासाठी तू करिअर नाही का बदललं ? तेव्हा ती स्वाभिमानाने उत्तर देते की तिने सर्वात आधी स्वतःला निवडलं त्यामुळेच ती आजही वीर ची प्रेमळ आई आणि बॉलीवूड निर्माती दोन्ही आहे. 

या अभिनेत्रीने दिलाय मुलीला जन्म, एक वर्षानंतर चाहत्यांना कळले

Read More From बॉलीवूड