Fitness

उन्हाळ्यात खा सब्जा आणि वजन करा कमी

Leenal Gawade  |  Apr 22, 2021
उन्हाळ्यात खा सब्जा आणि वजन करा कमी

 

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा काळ फारच उत्तम आहे. कारण उन्हाळ्यात सहसा आपल्याला भूक लागत नाही. त्यामुळे आहारावर नियंत्रण मिळवणे हे फारच सोपे जाते. तुम्हीही वजन कमी करण्याचा विचार करत असाल. पण नैसर्गिक पद्धतीने तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आता त्यावर एक सोपा उपाय म्हणजे ‘सब्जा’ खाणे . हो तुम्ही वाचत आहात ते अगदी खरे आहे. कारण सब्जाच्या सेवनामुळे पोटाला थंडावा मिळतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण त्यामुळे वजन कसे कमी होते याचा विचार तुम्ही करत असाल तर तुम्हाला सब्जा खाणे आणि वजन कमी करण्याचे गणित माहीत असायला हवे. चला तर जाणून घेऊया उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आणि वजन कमी करण्याची पद्धत

वजन कमी करण्यासाठी खा chia seeds च्या चविष्ट रेसिपी

सब्जा कमी करतो वजन

सब्जा वजन कमी करण्यासाठी फारच फायदेशीर असतो.  यामागील कारणं काय आहेत ती जाणून घेऊया.

उन्हाळ्यात सब्जा खाण्याचे आरोग्यदायी फायदे

असे करा सब्जाचे सेवन

Instagram

 

सब्जाचे सेवन असेच्या असे खाता येत नाही. सब्जा खाताना तो विशिष्ठ पद्धतीने खावा लागतो. तो भिजवूनच खावा लागतो. वेगवेगळी रेसिपी करुन तुम्ही त्याचे सेवन करु शकता. 

  1. साधारण एक मोठा चमचा सब्जा भिजत घाला. तो छान फुलून आल की, लगेचच  तो तसाच खा. त्याचे पाण्यासोबत सेवन केले की अधिक सोपे जाते 
  2. जर तुम्हाला मिल्कशेक आवडत असेल तर एखादा मिल स्किप करुन तुम्ही मिल्कशेकमध्ये सब्जा घालून त्याचे सेवन करु शकता. त्यामध्ये साखर घातली नाही तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळेल. 
  3. जर तुम्ही सूप पित असाल तर त्यामध्येही तुम्हाला सब्जा घालून पिता येईल. सूप हे आधीच पौष्टिक असते. त्यात सब्जा घातल्यामुळे अधिक फायदा मिळतो. 

आता सब्जाचे सेवन करा आणि मिळवा फायदाच फायदा. 

उष्माघाताची लक्षणे आणि उपाय (Heat stroke symptoms and treatment in Marathi)

Read More From Fitness