प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीची सिनेमा निवडताना एक विशेष प्राधान्य असतं. कोणी स्क्रीप्टला महत्त्व देतं तर कोणी सिनेमातील रोलला. तर कोणी दिग्दर्शक किंवा प्रोडक्शन हाऊसला. मग ते बॉलीवूड असो वा मराठी चित्रपटसृष्टी. मराठीतील ग्लॅमगर्ल अभिनेत्री सई ताम्हणकरच्या बाबतीतही असंच काही आहे. तिला सातत्याने नाविन्याची सातत्याने ओढ असल्याचं तिच्या सिनेमाच्या निवडीने तिने दरवेळी दाखवून दिलंय. यामुळेच सई नव्या दिग्दर्शकांसोबतही काम करताना दिसते. प्रसिध्दीच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रींबाबत क्वचितच असे असते. असं एक्सपेरिमेंट करताना सई मात्र न कचरता नव्या दिग्दर्शकांना भक्कम सपोर्ट देत्येयं. याबाबतीत ती बॉलीवूडमधील खान मंडळीतील आमिर खानला फॉलो करत आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण आमिरही नेहमी नवनवीन दिग्दर्शकांसाोबत काम करताना दिसतो.
सईचं प्रसिद्धीच्या शिखरावरील नवं पाऊल
आधी ग्लॅमगर्ल म्हणून नावारूपाला आलेली सई आता मराठी चित्रपटसृष्टीतील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते. फक्त मराठीतच नाहीतर हिंदीतही सईचं नाव आवर्जून घेतलं जातं. याच कारण म्हणजे तिने आत्तापर्यंत केलेल्या विविध भूमिका. यंदाही दोन फर्स्ट टाईम फिल्ममेकर्ससोबत सईचे सिनेमे येत आहेत. एक म्हणजे नुकताच अभिनेता अमेय वाघसोबत आलेला गर्लफ्रेंड हा सिनेमा. ज्याचं दिग्दर्शन सिनेसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पाऊल ठेवणा-या उपेंद्र सिधये याने केलं होतं तर दुसरा सिनेमा म्हणजे मिडीयम स्पाईसी. ज्या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून डेब्यू करणा-या मोहित टाकळकरसोबत काम करण्याचा निर्णय सईने घेतला. पण नव्या फिल्ममेकर्ससोबत काम करण्याची तिचीही पहिलीच वेळ नाही. या आधीही सईने मनवा नाईक (पोर बाजार), हर्षवर्धन कुलकर्णी (हंटर), गिरीश कुलकर्णी (जाऊ द्या ना बाळासाहेब), दिपक भागवत (3.56 किल्लारी), ज्ञानेश झोटिंग (राक्षस) अशा फर्स्ट-टाईमर दिग्दर्शकांच्या सिनेमांतून काम केलं आहे.
सईला नकोय स्टारडमचं बॅगेज
सूत्रांनुसार, आपलं स्टारडमचं बॅगेज बाजूला ठेवून एखाद्या प्रोजेक्टला सामोरं जाण्यामध्ये सई विश्वास ठेवते. जेव्हा जेव्हा ती फर्स्ट-टाईमर दिग्दर्शकांसोबत काम करते. तेव्हा स्वत: पहिल्यांदा सिनेमात काम करत असल्याचा हुरूप सईच्या चेह-यावर नेहमी दिसतो. जिथे जिथे पहिली वेळ असते तिथे सई असतेच. ती पहिली मराठी अभिनेत्री आहे जी एका स्पोर्ट्स टीमची ओनर आहे. ती पहिली मराठी ए-लिस्टर अभिनेत्री आहे, जी स्टँडअप कॉमेडी जज करते. तिला सतत नाविन्याची ओढ आहे. त्यामुळेच नव्या फिल्ममेकर्सकडून तिला फिल्ममेकिंगचा नवा अप्रोच शिकायला खूप आवडतं. तिच्या याच दृष्टीकोनामूळे ती आज यशाच्या शिखरावर आहे. ती न्यू एज सिनेमाचा चेहरा आहे.
Read More: Indian Bridal Makeup In Marath
सई आपल्या या नव्या दिग्दर्शकांसोबत काम करण्याच्या अप्रोचयाविषयी सांगते की, “नव्या दिग्दर्शकांमध्ये फिल्ममेकिंगचा एक नवा दृष्टिकोन आणि फ्रेशनेस असतो. सिनेमा बनवताना नव्या दिग्दर्शकांच्या अप्रोचला अभिनेत्री म्हणून मॅच करण्यासाठी किंवा त्यांच्या अपेक्षा पूर्ण करताना मी आपसूकच स्वत:ला आव्हान देत असते. स्वत:ला ‘ऑन टोज’ ठेवण्यासाठीची ही अभिनेत्री म्हणून माझी एक्सरसाईज असते. भारतीय सिनेमा पूढे जायला हवा असेल आणि अभिनेत्री म्हणून प्रगल्भ व्हायचं असेल तर नव्या दिग्दर्शकांसोबत काम करायला हवं असं मला वाटतं.“
गर्लफ्रेंडचा मीडियम स्पाईसी तडका
गर्लफ्रेंडनंतर सई ताम्हणकर लवकरच दिसणार आहे मीडियम स्पाईसी या चित्रपटात. हा सिनेमा एक शहरात घडणारी लव्ह स्टोरी असून सईसोबत ललित प्रभाकर, पर्ण पेठे आणि सागर देशमुख हे कलाकारही असणार आहेत. या स्टारकास्टमुळे सिनेमाबाबतची उत्सुकता चांगलीच वाढली आहे.
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade