बॉलीवूड

Corona Virus च्या या काळात सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, घरात शोकाकुल वातावरण

Dipali Naphade  |  Mar 31, 2020
Corona Virus च्या या काळात सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, घरात शोकाकुल वातावरण

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात आता बॉलीवूडमधून एक वाईट बातमी आली आहे. बॉलीवूड अभिनेता सलमान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या घरात सध्या शोकाकुल वातावरण  निर्माण झाले आहे. सलमान खानचा आतेभाऊ अब्दुल्लाह खानचे निधन झाले आहे. अब्दुल्लाह खान बऱ्याच महिन्यांपासून मुंबईतील कोकिलाबेन रूग्णालयात भरती होता. मिळालेल्या माहितीनुसार अब्दुल्लाह खानला लंग कॅन्सर होता. तसंच त्याला श्वसनप्रक्रियेचाही त्रास होता. त्याच्या निधनाची बातमी स्वतः सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केली आहे. अब्दुल्लाह खानला श्रद्धांजली देत सलमानने लिहिले आहे की, ‘नेहमीच तुझ्यावर प्रेम करत राहू’ अब्दुल्लाह खान हा सलीम खान यांच्या लहान बहिणीचा मुलगा होता. 

अजय देवगणच्या निसाला कोरोनाची लागण, काय म्हणाला अजय

अब्दुल्लाह सलमानचा आतेभाऊ

अब्दुल्लाहला गेल्या दोन दिवसापासून जास्तच त्रास होत होता. त्यामुळे त्याची कोरोना व्हायरसची तपासणीही करण्यात आली होती. मात्र त्याचा रिपोर्ट अजूनही आला नसताना अब्दुल्लाहने शेवटचा श्वास घेतला. अब्दुल्लाह हा सलमानचा आतेभाऊ असून अबा नावाने ओळखला जात होता. इंदूरमध्ये खान कंपाऊंडमध्ये अब्दुल्लाह राहात होता. अब्दुल्लाहच्या निधनाने सलमान खूपच भावूक झाला असून त्याने अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली आहे. अब्दुल्लाह हा सलमानच्या  खूपच जवळचा होता. ते दोघेही नेहमी एकत्र वर्कआऊट करायचे. सलमानच्या जिम फ्रेंचाईजीमध्ये अब्दुल्लाह सलमानची मदत करत होता. मात्र कोरोना व्हायरसच्या या काळात सलमान आपल्या पूर्ण कुटुंबासह पनवेलच्या फार्महाऊसवर आहे. त्यामुळे या काळात त्याला अब्दुल्लाहला शेवटचं भेटता येणं शक्य नाहीये. त्यामुळेच सलमान अधिक भावून झाला आहे. याआधीदेखील सलमानने अब्दुल्लाहसह फोटो शेअर केला होता. त्याने अब्दुल्लाहला आपल्या खांद्यावर उचलून घेतले होते. त्यामुळे या दोघांमधील बाँड अत्यंत जवळचा असल्याचं या फोटोतूनही दिसून येत आहे. या सगळ्यात सलमानला सावरण्यासाठी त्याचे चाहतेही त्याच्या दुःखात सहभागी होऊन सोशल मीडियावर त्याचे सांत्वन करत असल्याचे दिसून येत आहे. 

भारती सिंहला नको आहे मोठं घर, कारण ऐकून तुम्हालाही येईल हसू

सलमानशिवाय अन्य सेलिब्रिटींनीही व्यक्त केला शोक

सलमानने अब्दुल्लाहसह एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघेही एकाच पोझमध्ये उभे आहेत. यानंतर अनेक सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.  राहुल देवने ट्विट करून अबाला श्रद्धांंजली वाहिली आहे. तर या दुःखद समयी सलमानच्या कुटुंबाला देव सहन करण्याची ताकद देवो अशी प्रार्थनाही त्याने केली आहे. सलमानचे चाहतेही सलमानच्या दुःखात सहभागी होत आहेत. त्याशिवाय अभिनेत्री डेझी शाह आणि यूलिया वंतूरनेही आपले दुःख व्यक्त केले आहे. युलियानेही अतिशय भावून पोस्ट अब्दुल्लाहविषयी शेअर केली आहे, ‘तू म्हटलं होतंस ती आपण पडतो, तुटतो, अयशस्वी होतो. पण तरीही त्यातून सावरतो. वेळेनुसार सर्व काही ठीक होते. त्या वेळेतून बाहेर पडतो. पण तू खूपच लवकर सोडून गेलास आम्हाला’, तर डेझीने लिहिले, ‘बेस्टी तुझी आठवण काढेन नेहमी, देव तुझ्या आत्म्यास शांती देवो’. अब्दुल्लाह नेहमीच सलमानबरोबर असायचा त्यामुळे त्याच्या सलमानच्या जवळच्या व्यक्तींसह भेटीगाठीही जास्त होत्या. त्याला अनेक जण ओळखत होते.  त्याच्या स्वभावामुळे तो सर्वांच्याच जवळचा होता असंही सांगितलं जात आहे. मात्र वयाच्या 38 व्या वर्षीच आजारामुळे त्याचे निधन झाले असल्याचे आता समोर आले आहे. 

वयाच्या पंधराव्या वर्षी मी घरातून पळाले होते आणि ड्रग एडीक्टही झाले होते

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From बॉलीवूड