मनोरंजन

सारा रमजानच्या काळात तरी अशी वागू नको, सारा झाली ट्रोल

Leenal Gawade  |  Apr 27, 2020
सारा रमजानच्या काळात तरी अशी वागू नको, सारा झाली ट्रोल

सेलिब्रिटी कधी कोणत्या कारणांवरुन ट्रोल होतील हे सांगता येत नाही. आता सारा अली खानच घ्याना तिने नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टवरुन ती सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. इब्राहमसोबत वर्कआऊट करतानाचा हा फोटो असून या फोटोमध्ये दोघेही छान दिसत आहेत. एकीकडे चाहत्यांची या फोटोला पसंती मिळत आहे. तर काही लोकं मात्र तिला धर्माच्या नावाखाली ट्रोल करत आहेत. आता हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे ते आधी जाणून घेऊया. जाणून घेऊया सारा नेमकी कोणत्या कारणामुळे झाली ट्रोल.

सहानुभूती मिळवण्यासाठी रश्मी ‘वूमन कार्ड’ खेळत असल्याचा अरहान खानचा आरोप

सारावर कमेंटचा पाऊस,ट्रोलर्सही करत आहेत ट्रोल

बहीण-भावाची जोडी म्हटली की, सारा अली खानचे नाव अगदी आवर्जून घेतले जाते. सारा आली खान नेहमीच तिचे आणि इब्राहमचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असते. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच घरी असल्यामुळे ती आपला जास्त वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. सारा अली खानसुद्धा तिची आई आणि भावासोबत वेळ घालवत आहे. तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शनिवारी एक फोटो शेअर केला या फोटोमध्ये ती तिच्या जीमवेअरमध्ये दिसत आहे. तिच्या शेजारी इब्राहम शर्टलेस झोपला आहे. या बहीण-भावाच्या जोडीचा हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांना तो क्युट वाटला. त्यांना लगेचच सारा आणि इब्राहमची या फोटोसाठी तारीफ केली. तर दुसरीकडे काही लोकं मात्र सारावर चिडली असून ती साराला या फोटोसाठी ट्रोल करत आहे. रमजानचा पवित्र महिना सुरु असताना साराने असे कपडे घालणे अनेकांना रुचले नसावे. कारण त्यावरुनच तिला ट्रोल करायला सगळ्यांनी सुरुवात केली आहे. सारा तुला असे लहान कपडे घालणे या दिवसांमध्ये शोभत नाही. थोडी तरी लाज बाळग अशी कमेंट त्या खाली ट्रोलर्सने केली आहे. 

प्रेग्नंसीमध्येही शूटींग करत होत्या या अभिनेत्री

बिकिनी फोटोवरुनही झाली ट्रोल

Instagram

सारा अली खान काही महिन्यांपूर्वी मालदीव्जला जाऊन आली आहे. या टूरचे फोटोही तिने तिच्या इन्स्टावर शेअर केले होते. या फोटोमध्ये तिने बिकिनी घातली होती. या फोटोमध्ये हँडसम इब्राहम अली खानसुद्धा होता. या बोल्ड फोटोमुळेही काही गट फारच दुखावला गेला होता. सारा अली खानच्या अशा प्रकारच्या कपडे घालणाऱ्यावर काही जणांनी आक्षेप घेतला होता. तिने या आधीही काही बोल्ड फोटो शेअर केले होते. आणि त्यामुळेही ती मोठ्याप्रमाणात ट्रोल झाली होती. पण ट्रोलर्सना उत्तर देण्याचा ती कधीही विचार करत नाही म्हणूनच ती अनेकांना जास्त आवडते. 

सोशल मीडियावर सारा अली खानच्या बिकिनी फोटोवर होतेय चर्चा

इब्राहमला मिळत आहे खूपच प्रसिद्धी

सारा अनेकांची आवडती स्टार किड आहे.  तसाचा इब्राहमही आहे. इब्राहम या क्षेत्राशी निगडीत नसला तरी देखील त्याच्यामध्ये पतौडी घराचे टॅलेंट दिसून येते. बहिणीपेक्षाही जास्त तो टिकटॉकवर असतो. त्याचे टिकटॉक व्हिडिओज फारच प्रसिद्ध आहे. त्यामुळे हल्ली इब्राहम ज्या फोटोमध्ये असेल त्या फोटोला आणि त्या व्हिडिओला अधिक पसंती मिळते. 

त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरेत काहीही कारण नसताना सारा अली खान आली आहे. 

 घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. 

Read More From मनोरंजन