मनोरंजन

‘सावित्रीजोती’चा महापरिवर्तक लग्नसोहळा, प्रेक्षक अनुभवणार अविस्मरणीय क्षण

Harshada Shirsekar  |  Jan 27, 2020
‘सावित्रीजोती’चा महापरिवर्तक लग्नसोहळा, प्रेक्षक अनुभवणार अविस्मरणीय क्षण

आधुनिक विचारांनी, ज्यांनी प्रगतीची वाट दाखवली, त्या महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सोनी मराठी वाहिनीवरील ‘सावित्रीजोती – आभाळाएवढी माणसं होती’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाज बदलणारे, आधुनिक समाजाचा पाया असणारे विचार महात्मा जोतीराव फुले यांनी सगळा विरोध पत्करून, तो झुगारून संपूर्ण समाजात रुजवले, याची बीज त्यांच्या आयुष्यात बालपणापासून  घडलेल्या अनेक घटनांमध्ये आहेत. बालपणीच सावित्री त्यांच्या आयुष्यात आली, या दोघांनी जे समाजवास्तव पाहिले त्यावर शांत न बसता त्यांनी आयुष्यभराच्या सोबतीने क्रांतीची वाट स्वीकारली. असे हे आदर्श सहजीवन असलेले जोडपे एकत्र आले त्याची गोष्टही मोठी रंजक आहे. तापट स्वभावाचे जोतीराव अर्थात जोती आणि सर्वांना समजून – उमजून घेणारी सावित्री अर्थात सावी यांचे लग्न हे साधेसरळ नव्हते, त्या दोघांच्या स्वभावातला विरोधाभास, फुले कुटुंबीयांमधली भाऊबंदकी तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे सामाजिक असमानतेचा मोठे दर्शन आणि या सार्‍याच्या विरोधात लग्नसराईत उभे ठाकलेले जोतीराव यामुळे हे लग्न सर्वस्वी वेगळे ठरते.

(वाचा : सुहृद वार्डेकर-सायलीचा ‘दाह’ सिनेमा ‘व्हॅलेंटाईन डे’ला होणार प्रदर्शित)

किंबहुना वर्‍हाडात सर्व जातीतले गावकरी सहभागी होण्यावरून अस्पृश्यता निवारण, पापक्षालनासाठी ब्राम्हणाचे पाय धुवून तीर्थ पिणे यासारख्या निरर्थक रूढींचा ठाम विरोध, गूळ – खोबरे उधळून टाकण्याऐवजी प्रत्येकाला हक्काचा घास मिळवून देणे, या त्या काळात लग्नात सामान्य वाटणार्‍या गोष्टींबद्दल जोतीरावांनी घेतलेली भूमिका त्यांच्या पुढील असामान्य कार्याची चुणूक दाखवणारी ठरली. असे हे जगावेगळे लग्न ‘सावित्रीजोती’ या मालिकेत येत्या सोमवारी 27 तारखेपासून झाला असून  हळद,तळी भरणे,लग्न,गोंधळ हा लग्नाचा प्रवास आठवडाभर सुरू असणार आहे. 3 आणि 4 फेब्रुवारीला हा महापरिवर्तक विवाह सोहळा सोमवार ते शनिवार  संध्याकाळी 7. 30 वाजता फक्त सोनी मराठीवर संपन्न होईल. दूरचित्रवाणी मालिकांमधले हे वेगळे लग्न प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव देणारं आहे.

(वाचा : जिजाऊंचा इतिहास ‘जिऊ’च्या स्वरुपात झळकणार मोठ्या पडद्यावर)

भारतीय स्त्री मुक्तीच्या आणि स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची चरित्रगाथा ‘सोनी मराठी’ वाहिनीवर सुरू झाली आहे.समाजाला स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कठीण कार्य फुले दाम्पत्य करत राहिले. पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. ‘धर्म बुडाला’ अशी ओरड करत त्यावेळी अनेक धर्ममार्तंडांनी सावित्रीबाई फुलेंवर दगड, माती, शेण फेकले. तरीदेखील त्या मागे हटल्या नाहीत. ‘तुम्ही माझ्यावर दगड किंवा शेण फेकत नसून, माझ्यावर फुलांचा वर्षाव करत आहात. यामुळे मला काम करण्याची प्रेरणा मिळते’ असं म्हणत त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवलं.

(वाचा : ‘हिरकणी’नंतर प्रसाद ओक करणार विश्वास पाटलांच्या ‘चंद्रमुखी’चं दिग्दर्शन)

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From मनोरंजन