Festival

श्रावणी सोमवारी भगवान शंकराला कोणती फूले वाहावी, होतात मनोकामना पूर्ण

Dipali Naphade  |  Aug 4, 2021
divine flowers for shravan somwar

श्रावण महिना म्हटलं की अनेक सणवार (Festivals in Shravan) आपल्याकडे असतात. ज्याची सुरूवात होते श्रावणी सोमवारपासून. भगवान शंकर अर्थात शिव भक्तांसाठी हा महिना खूपच खास असतो. शिवाचा सर्वात आवडता महिना श्रावण मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवारी (Shravan Somvar) बऱ्याच जणांना उपवास असतो. सोमवार हा शंकराचा वार समजण्यात येतो. त्यामुळे शिवभक्तांसाठी श्रावण महिन्यातील सोमवार (Sawan Somvar) हे अत्यंत महत्त्वाचे असतात. शंकराचा आशीर्वाद मिळावा यासाठी संपूर्ण श्रावण महिन्यातील सोमवार शंकाराची भक्ती करण्यात येते. अनेक महिला आणि अविवाहित मुली शंकरासारखा नवरा आपल्यालाही मिळावा यासाठी हे श्रावणी सोमवारचे व्रत करतात. श्रावण महिन्यात संपूर्ण भारतामध्ये प्रत्येक शिव मंदिरात आपल्याला हर हर महादेव हे स्वर कानी पडतातच. देवांचा देव महादेवाचे एका विशिष्ट पद्धतीने या दिवशी पूजन करण्यात येते. श्रावण महिन्यातील महादेवाच्या पूजेला खूपच फलदायी मानण्यात येते. श्रावण महिन्याच्या सणांना खूपच महत्त्व आहे. त्यामुळे शिवशंकराची पूजा करताना नक्की कोणती फूले वाहायची आणि त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील याची विशिष्ट माहिती आम्ही तुम्हाला या लेखातून देत आहोत. 

अधिक वाचा – श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा (Shravan Month Wishes In Marathi)

बेलाची पाने (Belpatra)

भगवान शंकराला सर्वात प्रिय बेलाची पाने अर्थात बेलपत्रे आहेत हे आपल्या अनादी काळापासून माहीत आहे. शिवपुराणामध्ये याबाबत माहिती मिळते. बेलाच्या पानाची व्युत्पत्ती ही पार्वती मातेच्या घामापासून झाली होती. त्यामुळे शिवशंकाराला ही बेलपाने अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्रावणी सोमवारी महादेवाच्या पिंडीवर न चुकता ही पाने वाहावीत असे सांगण्यात येते. यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात असे समजले जाते. शंकर हा असा देव आहे जो भक्तीमुळे लवकर प्रसन्न होतो असा समज आहे. त्यामुळेच शंकराचे अनेक भक्त आहेत. 

प्राजक्ताची फुले (Prajakt) 

पांढरा रंग आणि पांढऱ्या रंगाची फुले सहसा महादेवाला प्रिय असतात. प्राजक्त अर्थात पारिजातकाचा सडाही शंकराला खूपच प्रिय आहे. त्यामुळे श्रावणातील सोमवारी पूजा करताना सहसा पारिजातकाच्या फुलांचा वापर करावा. यामुळे सुखसंपत्ती प्राप्त होते आणि जीवनामध्ये सतत संकटे येत असतील तर ती दूर होतात असा समज आहे. शिवाय शंकराचा मुलगा गणपती याला आवडीच्या असणाऱ्या दुर्वाही महादेवाला अर्पण करून चालते. यामुळे निरोगी शरीर आणि दीर्घायुष्य लाभते असे मानले जाते. 

चमेलीची फुले (Chameli)

एखाद्याला विवाह होण्यामध्ये अडचणी येत असतील तर त्याने श्रावणी सोमवारी शंकराला चमेलीच्या फुलांचा हार अपर्ण करावा अथवा चमेलीची फुले वाहून शंकराची भक्ती करावी असे सांगण्यात येते. यामुळे वैवाहिक जीवनात आलेला त्रासही दूर होते आणि वाहनप्राप्तीदेखील होते. 

धोतरा अथवा मंदाराची फुले (Mandar)

असं म्हटले जाते की, धोतरा हे फूल शिवशंकराचे आवडते फूल आहे. धोतरा आणि मंदार या फुलांमुळे सर्प, विंचू यासारख्या जीवाणूंपासून तुम्हाला सुरक्षा मिळते. मंदार फूलाने पूजन केल्यास, डोळ्यांची काही समस्या असेल तर त्या त्रासातून सुटका मिळते असेही म्हटले जाते. मात्र धोतरा आणि मंदाराच्या वासामुळे सर्प आणि विंचू आपल्या आसपास फिरकत नाहीत असेही म्हटले जाते. त्यामुळेच महादेवाची पूजा करण्यासाठी या फुलांचा वापर करण्यात येतो. 

कमळ (Lotus)

श्रावण महिन्यात शिवशंकराला कमळ अर्पण केल्याने जीवनामध्ये सुख सुविधा आणि धनवैभव वाढीला लागते असे सांगण्यात येते. शंकाराचे महामायधर रूप ज्या व्यक्ती पूजतात त्यांना शिवासह लक्ष्मी माताही प्रसन्न होते आणि आशीर्वाद लाभतो असे म्हटले जाते. त्यामुळे श्रावणी सोमवारी कमळदेखील वाहिले जाते.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Festival