DIY लाईफ हॅक्स

नव वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी भूतकाळाला करा बाय बाय

Leenal Gawade  |  Dec 29, 2020
नव वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी भूतकाळाला करा बाय बाय

नवं वर्ष सुरु व्हायला आता काहीच तास उरले आहेत. नव्या वर्षात काय करायचे याचे प्लॅनिंग अनेकांनी केले सुद्धा असेल. कारण 2020 मधील कोव्हिड परिस्थितीचा विचार करता अनेकांना काहीच करता आले नाही. त्यामुळे 2021 मध्ये काहीतरी करायची इच्छा नक्कीच असेल. पण नव्या वर्षाची नवी सुरुवात करताना काही गोष्टी या मागे सोडून येणेच बरे असते. चांगल्या आठवणी घेऊन पुढे जाणे हे नेहमीच चांगले असते. पण वाईट आठवणींमधून बाहेर पडत नव्या गोष्टींमध्ये रमणे हे तितकेच गरजेचे असल्यामुळे नव वर्षाचे स्वागत करण्यापूर्वी भूतकाळाला बाय बाय करायला हवे. या भूतकाळातून बाहेर पडणे म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी करणे याचा विचार करत असाल तर या गोष्टी जाणून घेणे तुमच्यासाठी आहे फारच महत्वाचे. तेव्हाच खऱ्या अर्थाने नववर्षाच्या शुभेच्छा अनुभवता येतील.

नव्या वर्षापासून पिकनिकसाठी असे करा पैशांचे नियोजन

नात्यातील रुसवे- फुगवे

प्रत्येक नात्यात काही ना काही खटके उडत असतात. या वर्षी परिस्थिती थोडी वेगळी होती. यामुळेच कदाचित काही लोकांशी आपला जास्तीचा संबंध आला. आर्थिक जुळवाजुळव होत नसताना काही जवळच्या व्यक्तिंनीही तुमची साथ सोडली असेल. त्यामुळे जर नात्यामध्ये कटुता आली असेल.हा रुसवा सोडून द्या. कारण सगळीकडेच अशी भयावह परिस्थिती होती की, ज्यामुळे अनेकांवर आर्थिक आघात झाले. अशावेळी स्वत:ला त्यांच्या कुटुंबाला सांभाळताना अनेकांच्या नाकी नऊ आले होते. त्या एका मदतीमुळे जर तुम्ही एखाद्यावर नाराज झाला असाल तर हा रुसवा सोडून द्या आणि नव्या वर्षात नव्या पद्धतीने आपले मित्रसंबंध सुधारा. त्यामुळे तुमचे नाते अधिक दृढ होण्यास नक्कीच मदत मिळेल.

2021 नववर्षाचं स्वागत घरीच करण्यासाठी भन्नाट आयडियाज

ब्रेकअप्स विसरा

Freepik

आऊच… !!!! एखादे नाते तुटणे हे अजिबात चांगले नाही. पण काही कारणास्तव जर तुमचे प्रेमाचे नाते तुटले असेल आणि त्याची घडी पुन्हा बसणे कधीही शक्य नसेल तर ती बसवायला पुन्हा जाऊ नका.  कारण जुन्या गोष्टीला कवटाळून ठेवण्यात काहीच अर्थ नसतो. अशा गोष्टी पुढे जाऊन पुन्हा बिघडतात. त्यापेक्षा जी गोष्ट या वर्षी हातातून निसटून गेली आहे. ती गेलेलीच चांगली होती असे म्हणत तुम्ही नव्या वाटचालीला सुरुवात करा. या नव्या वर्षात अशा व्यक्तीवर प्रेम करा जी व्यक्ती तुम्हाला समजू शकेल. सुरुवातीलाच सावध भूमिका घेत त्या व्यक्तिला पारखून मगच प्रेम करा आणि मागील नात्याचा उल्लेख न करता त्या नात्यातील चूक परत करण्याचा मुळीच प्रयत्न करु नका. असे केले तर तुम्हाला त्रास कमी होईल आणि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण नक्कीच येतील. 

हिशोब करा जपून

पैशांच्या बाबतीत अनेकांना वेगवेगळे अनुभव या वर्षाने नक्कीच दिले असतील. काहींची फसवणून झाली तर काहींना या काळाने भरभरुन दिले. पण पैशांच्या बाबतीत जर एखाद्याने तुमची फसवूणक केली असेल तर भविष्यात अशा व्यक्तीसोबत पुन्हा कधीही व्यवहार करायला जाऊ नका. एकदा हात पोळल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा कोणताही व्यवहार करायला जाऊ नका. यंदाच्या वर्षात प्रॅक्टिकल राहण्याचा प्रयत्न करा.जे कराल ते फक्त कामांसाठी आणि पैसै कमावण्यासाठी करा. त्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयक्न मुळीच करु नका. 

आम्ही सांगितलेल्या या गोष्टींचा तुम्हाला कधीतरी नक्कीच अनुभव आला असेल आणि या गोष्टी तुम्हाला विसरायच्या असतील तर थोडे प्रयत्न करा नवे वर्ष नक्कीटच चांगले जाणार आहे. 

2020 मध्ये हिट झाल्या या लॉकडाऊन रेसिपी, तुम्ही करुन पाहिल्यात की नाही?

Read More From DIY लाईफ हॅक्स