दर आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’ मध्ये कर्मवीर विशेष साजरा करण्यात येतो. यावेळी निमित्त आहे ते म्हणजे स्वातंत्र्यदिनाचे. स्वातंत्र्यदिनानिमित्त मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे ‘कोण होणार करोडपती’ – कर्मवीर विशेषमध्ये येणार आहेत. कर्मवीरच्या भागामध्ये विशेष अतिथी येऊन सामाजातल्या गरजू घटकांसाठी हे दोन्ही दमदार कलाकार खेळले असून सर्व जिंकलेली रक्कम त्यांनी गरजूंना मदत म्हणून देऊ केली आहे. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा या संस्थेला सयाजी शिंदे आणि मनोज बाजपेयी हे या भागात जिंकलेली रक्कम मदत म्हणून देणार आहेत. हे दोन्ही कलाकार दमदार असून अत्यंत हुशार आणि संवेदनशील आहेत. त्यामुळे हे दोघेही प्रश्नांची उत्तरे कशी देणार याकडे नक्कीच त्यांच्या चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
अधिक वाचा – पहिल्याच दिवशी पेटले भांडण, दिव्या – प्रतीकचे घमासान
दर्जेदार अभिनेते दिसणार कोण होणार करोडपतीमध्ये
सयाजी शिंदे हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी आणि नाटकसृष्टी यातलं नावाजलेलं व्यक्तिमत्त्व आहे. फक्त आपल्या अभिनयासाठी नाही तर आपल्या समाजसेवेसाठीसुद्धा सयाजी शिंदेना ओळखलं जातं. त्यांनी आत्तापर्यंत अनेक समाजपयोगी कामं केली आहेत. मनोज बाजपेयी यांनी आपल्या दर्जेदार अभियानयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत नाव कमावलं आहे. अनेक उत्तमोत्तम कलाकृती त्यांनी प्रेक्षकांना दिल्या आहेत, अजूनही देत आहेत. मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे गेली बरीच वर्ष एकमेकांचे मित्र आहेत आणि त्यांनी शूल या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटदरम्यानच्या आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला. मनोज बाजपेयी हे हरिवंश राय बच्चन यांचे चाहते आहेत. मनोज बाजपेयींनी हरिवंश राय बच्चन यांची कविता मंचावर म्हणून दाखवली. मनोज बाजपेयी यांनी सचिन खेडेकर मालिका करत असताना सचिनजींच्या अभिनयातले बारकावे पहिले आणि ते त्यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात त्यांनी कसे वापरले, हेदेखील यावेळी बोलता बोलता सांगितले आहे.
अधिक वाचा – सोनाली कुलकर्णी येतेय परत…चित्रपटाचे पोस्टर रिलीज
कलाकारांमुळे रंगला भाग
मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे हे दोन्ही कसलेले कलाकार आहेत. तसेच माणूस म्हणूनही संवेदनशील आणि उत्तम आहेत. या कलाकारांच्या मंचावर येण्याने कोण होणार करोडपतीच्या मंचाला वेगळाच रंग चढला होता. सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा यांना मदतीचा हात म्हणून हे कलाकार कोण होणार करोडपतीच्या मंचावर आले. इथे जिंकलेली रक्कम ही सह्याद्री देवराई सामाजिक संस्था, सातारा यांना सुपूर्द करण्यात येणार आहे. आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांचे मन जिंकणारे हे कलाकार आता सामाजिक कार्याला हातभार लाऊनही प्रेक्षकांचे आणि आपल्या चाहत्यांचे मन जिंकून घेत आहेत असं म्हटलं तर नक्कीच वावगं ठरणार नाही. दरम्यान या भागात या दोन्ही अप्रतिम कलाकारांनी किती रक्कम जिंकली याची नक्कीच आता चाहत्यांनाही उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या भागात याचे उत्तर नक्कीच मिळेल आणि हा भाग नक्कीच धमाल गाजवणारा असेल यात शंका नाही! मनोज बाजपेयी आणि सयाजी शिंदे यांचा वेगळाच चाहतावर्ग आहे. त्यामुळे कर्मवीर विशेषचा हा भाग नक्कीच त्यांच्यासाठी पर्वणी ठरणार आहे. या पर्वणीमुळे प्रेक्षकांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मिळतील यात शंका नाही.
एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका
हेही वाचा –
15 ऑगस्टसाठी खास देशभक्तीपर गीतांची लिस्ट
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade