DIY लाईफ हॅक्स

आयुष्यात आभार मानणे का आहे गरजेचे

Leenal Gawade  |  Dec 14, 2021
आभार माना आयुष्य बदलेल

 धन्यवाद, आभारी आहे, थँक्यू वेगवेगळ्या स्वरुपात मानलेले आभार हे आपल्याला नेहमीच सकारात्मक उर्जा देतात. काही लोकांना अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये आभार मानायची सवय असते. पण ही सवय चांगली आहे. कारण समाधान मिळणे कोणत्याही मनुष्यासाठी गरजेचे असते. समाधान ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे आयुष्य सफल झाल्यासारखे वाटते. तुम्हाला आभार मानायची सवय नसेल तर आजच लावून घ्या. कारण ‘आभार’ या शब्दामध्ये एक जादू जडलेली आहे. तिचा कसा उपयोग केला की तु्म्हाला फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया.

आयुष्यासाठी आभार

खूप जणांना आपण जन्माला का आलो याचे उत्तर सापडत नाही. आपल्या आयुष्याला कोसत बसण्यापेक्षा मिळालेल्या आयुष्याचे समाधान मानणे गरजेचे असते. त्यामुळे तुम्हाला मिळालेल्या मौल्यवान अशा आयुष्यासाठी तुम्ही आभार मानायला हवेत. आयुष्य हे एकदाच मिळते. त्या आयु्ष्यासाठी आपल्याला समाधान हवे. मला जन्माला का घातलं असं म्हणण्यापेक्षा माझा जन्म हा चांगल्या कामांसाठीच झाला आहे याचे आभार तुम्ही मानायला हवे. त्यामुळे आयुष्यासाठी आभार मानायला शिका. तुमचे आयुष्य चांगले जगण्यासाठी तुम्ही आभार मानायला शिका 

तुमच्यासाठी काम करणाऱ्यांचे आभार

तुमच्यासाठी अगदी काहीही काम करणाऱ्या व्यक्तीचे तुम्ही आभार मानायला हवे. त्यामुळे दोन गोष्टी होतात तुमच्या समोर असलेल्या व्यक्तीला त्याने काम केल्याचा मोबदला मिळतो आणि तुम्हाला आपण कृतज्ञ आहोत याची जाणीव होते. तुमच्यापेक्षा पदाने मोठी अथवा लहान असे कोणत्याही पदाच्या व्यक्तीला मनापासून धन्यवाद म्हणजा. ती व्यक्ती तुमच्यासाठी असल्यामुळे तुमचे काम होते याची जाणीव करुन देणारी अशी ही कृती आहे. त्यामुळे जाता येता अशा लोकांचे आभार मानायला हवे. 

कुटुंबासोबत जोडीदाराची भेट करून देण्यापूर्वी अशी करा पूर्वतयारी

रोजच्या दिवसासाठी आभार माना

 रोजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असतो.  त्यामुळे प्रत्येक दिवसाचे तुम्ही आभार मानायला हवे. प्रत्येक दिवसासाठी तुम्ही डोळे बंद करुन आभार माना. येणारा नवा दिवस तुमच्या आयुष्यात नवा बदल घेऊन येत असतो. त्या दिवशी वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत घडणार असतात. अनेक घटना तुमच्या मनाप्रमाणे होतील काही तुमच्या मनाप्रमाणे होणारही नाहीत. पण तरीदेखील आहे त्या दिवसासाठी आणि जे होत आहे त्यासाठी तुम्ही तयार राहायला हवे. म्हणूनच प्रत्येक दिवसासाठी तुम्ही आभार मानायला शिका. 

समस्यांचेही माना आभार

आयुष्यात कोणालाही समस्या येऊ नये असे वाटते. पण कधीकधी समस्यांमधून खूप काही शिकण्यासारखे असते. त्यामुळे ज्या समस्या आल्या त्यासाठी आभार माना कारण त्यामधून तुम्हाला शिकता आले. त्यातून बाहेर कसे पडायचे ते देखील कळले त्यामुळे समस्यांचे आभार मानणे हे कधीही चांगले 

आपल्याला मिळालेल्या सगळ्या गोष्टींसाठी तु्ही आभार मानायला शिका तुम्हाला तुमचे आयु्ष्य कसे  बदलते हे देखील लक्षात येईल.

आजीआजोबांना मुलांपेक्षा का जास्त प्रिय असतात नातवंडे

यशाची गुरूकिल्ली मिळवण्यासाठी फॉलो करा या 10 गोष्टी

Read More From DIY लाईफ हॅक्स