Advertisement

आपलं जग

आजीआजोबांना मुलांपेक्षा का जास्त प्रिय असतात नातवंडे

Trupti ParadkarTrupti Paradkar  |  Nov 24, 2021
grandparents love their grandchildren more than their own children in Marathi

Advertisement

आजीआजोबांचे त्यांच्या नातवंडावर जीवापाड प्रेम असते. असं म्हणतात की, माणसाला दुधापेक्षा दुधावरची सायच जास्त आवडते. कारण मुळ मुद्दलपेक्षा व्याजच सर्वांना जास्त आवडतं. अगदी तसंच स्वतःच्या मुलांपेक्षा आजीआजोबांना नातवंडे प्रिय असतात. स्वतःची मुलं सर्वांना प्रिय असतातच पण नातवंडांबद्दल जास्त जिव्हाळा वाटतो. मुलांना लवकर मुलं व्हावी अथवा आपल्याला मुलांसाठी जे जे नाही करता आले ते आपण नातवंडासोबत करावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यामुळे नेहमीच आजीआजोबा आणि नातवंडांचे एक वेगळेच नाते पाहायला मिळते. या गोष्टींवर करण्यात आलेल्या एका संशोधनातही ही गोष्ट प्रकर्षाने दिसून आली. 

लाडक्या आजी-आजोबांसाठी कोट्स (Aaji Aajoba Quotes In Marathi)

काय सांगतं याबाबत संशोधन 

grandparents love their grandchildren more than their own children in Marathi

अमेरिकेतील काही संशोधकांनी आजी आजोबा आणि नातवंडे यांच्या नात्यावर संशोधन केले. या संशोधनात आढळून आले की, आजी असो वा आजोबा ते स्वतःच्या मुलांपेक्षा त्यांच्या नातवंडांसोबत भावनिक रुपात जास्त जोडले जातात. यासाठी काही आजीआजोबांच्या मेंदूचे स्कॅनिंग करण्यात आले. हे स्कॅन करताना त्यांच्यासोबत त्यांची नातवंडे देण्यात आली अथवा नातवंडाचे फोटो देण्यात आले. या स्कॅनिंग दरम्यान जेव्हा हे आजी आजोबा त्यांच्या नातवंडांचे लाड करत होते अथवा नातवंडाचे फोटो पाहून त्यांची आठवण काढत होते तेव्हा त्यांच्या मेंदूत भावनिक हालचाली झालेल्या आढळून आल्या. अशी भावनिक सहानभुती माणसाला तेव्हाच वाढते जेव्हा त्याला एखाद्याबद्दल स्वतःप्रमाणे समान प्रेम वाटू लागते. या प्रेमात समोरच्याचा आनंद स्वतःचा आनंद होतो आणि समोरच्या व्यक्तीचे दुःख स्वतःचे दुःख होते. एवढंच नाही तर या संशोधनादरम्यान सहभागी झालेल्या लोकांना त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवण्याची अथवा मुलांचे फोटो पाहण्याची संधीदेखील देण्यात आली. मात्र त्यावेळी अशा संवेदना आढळून आल्या नाहीत ज्या नातवंडांवर प्रेम करताना दिसून आल्या. याचाच अर्थ माणूस स्वतःच्या मुलापेक्षा त्याच्या नातवंडावर जास्त प्रेम करतो. 

Trust Quotes And Status In Marathi | विश्वासावरील मराठी सुविचार | Vishwas Marathi Status

आजीआजोबा म्हणजे नातवंडांसाठी मायेची सावली

आजवर अनेकांना हा अनुभव आला असेल की आपले आजी आजोबाच आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करत होते. यासाठीच आजी आजोबांचे निधन झाल्यावर नातवंडांना याचा सर्वात जास्त त्रास आणि धक्का बसतो. कारण नातवंडांचे मन समजून घेणे, त्यांची सुखदुःख स्वतःची समजून त्यांना मदत करणे, मनाला न पटणाऱ्या गोष्टी करूनही नातवंडांना माफ करणे हे फक्त आजी आजोबाच करू शकतात. त्यामुळे नकळत आजी आजोबा आणि नातवंडे यांच्यात एक निस्सिम प्रेमाचा बॉंड तयार होतो. जो कोणीही कधीच तोडू शकत नाही. यासाठीच नातवंडांचे संगोपन आजीआजोबा चांगल्या पद्धतीने करू शकतात तर नातवंडेही मोठी झाल्यावर त्यांच्या आजीआजोबांची मनापासून काळजी घेतात. एवढंच नाही जर नातवंडांचे प्रेम मिळाले तर आजीआजोबांचे आयुष्यही वाढू शकते असंही या संशोधनात आढळून आलं आहे.

60+ Birthday Wishes For Daughter In Marathi 2021 | मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश