DIY लाईफ हॅक्स

मर्मावर बोट ठेवणारे स्वार्थी मराठी कोट्स | Selfish Quotes In Marathi

Leenal Gawade  |  Jun 30, 2022
selfish quotes in marathi

स्वार्थी या शब्दाचा शब्दश: अर्थ नेहमीच वाईट असतो असे नाही. काही वेळा चांगल्यासाठी स्वार्थी असणे फारच जास्त गरजेचे असते. आपल्यातील स्वार्थीपणा तसाच ठेवत त्याचा उपयोग चांगल्यासाठी करणे गरजेचे असते. आज खास यासाठीच Selfish Quotes In Marathi शेअर करत आहोत. या शिवाय Selfish Status In Marathi मराठी हे देखील शेअर करणार आहोत. 

तुमच्यातील स्वार्थीपणा हा कायम टिकून ठेवा. त्याने इतरांचे नुकसान होणार नाही. याचीही काळजी घ्या.  पण जर एखाद्याच्या स्वार्थीपणा तुमच्यासाठी त्रासदायक असेल तर तुम्ही काळजी घ्यायला विसरु नका. 

कारण ही काळजी घेणे ही फार महत्वाचे असते. या शिवाय मित्रांप्रती भावनिक कोट्स देखील शेअर करु शकता. जे तुमचे नाते अधिक दृढ करण्यास मदत करतील. 

स्वार्थीपणावरील कोट्स मराठी – Selfish Quotes In Marathi

Selfish Quotes In Marathi

शॉर्ट स्वार्थी स्टेटस मराठी – Short Selfish Status In Marathi

तुमच्यातील स्वार्थीपणा कोणासाठी नुकसानकारक ठरु नये असे मनाशी ठेवून मगच तुम्ही इतरांनी वागा. चला जाणून घेऊया Selfish Quotes In Marathi. याशिवाय भावाला द्या वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायलाही विसरु नका

  1. खोटं बोलणारी माणसं खरी बोलू शकत नाही,
    आणि खरं बोलणारी माणसं कधी खोटं बोलू शकत नाहीत
  2.  लोकांचे रंग सरड्याप्रमाणे असतात,
    परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात
  3.  ज्या गोष्टी तुम्ही सहन करु शकत नाही,
    त्या गोष्टी तुम्ही इतरांसोबत करु नका
  4.  स्वार्थाने नाती तुटतात,
    त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती
    पुन्हा जोडली जातात
  5.  स्वार्थी माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे
    आपल्याच पायांवर दगड मारुन घेण्यासारखे असते
  6.  जेवढं मोठं आपलं ध्येय असतं
    तेवढ्या आपल्या समोर अडचणी येतात
  7.  तुमच्या जवळची खास माणसं
    दूर होऊ लागली की, समजून जा आता तुमची गरज भागली
  8.  एकवेळ हरवलेली माणसं तरी सापडतील
    पण बदलेली माणसं कधीही सापडत नाही
  9.  या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसतं,
    न पारखलेलं नातं एकदा धोका देऊ शकतं
  10. तुम्ही एखाद्याशी कितीही  प्रामाणिक राहा,
    जर ती व्यक्ती स्वार्थी असेल तर ती तुम्हाला त्रास देणारचं 

मुलींसाठी दुखी कोट्स

Short Selfish Status In Marathi

स्वार्थीपणा हा एखाद्याचे आयुष्य उद्धवस्त करु शकतो. अशावेळी तुम्ही थोडे जपून राहणे गरजेचे असते. अशा या स्वार्थीपणासाठी Short Selfish Status In Marathi  खास तुमच्यासाठी 

  1. स्वार्थी असण्याापेक्षा कधीही एकटे असे चांगले असते
  2.  पूर्वी लोकं काळजीपोटी फोन करायचे आणि आता लोकं फक्त गरजेपुरते फोन करतात
  3.  एखाद्याची गरज भासते त्याच वेळी त्या व्यक्तिचे खरे रुप कळते
  4.  स्वार्थी माणसं जेव्हा गोड बोलू लागतात तेव्हा सावध राहावे
  1.  मनातून एखादी व्यक्ती उतरली की, तिच्याकडून जास्त अपेक्षा करु नका
  2.  स्वार्थी दुनियेत कोणीही कोणाचे नसते आणि न पारखता जोडलेले नाते हे कधीही टिकत नसते.
  3.  नात्यामध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ लागत नाही.
  4.  स्वार्थ सोडला तर माणसाला आनंदही घेता येतो आणि देताही येतो
  5.  काम असल्यावर गोड गोड बोलणारे आणि सलाम ठोकणाऱ्यांपासून सावध राहा
  6. माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज संपली की, निघून जातात

कुटुंबावरील स्वार्थी कोट्स – Family Selfish Quotes In Marathi

Family Selfish Quotes In Marathi

कुटुंबातही अनेकदा काही लोकांचे वागणे आपल्याला इतके खटकते की, आपल्याला त्याच्यामुळे खूप दु: ख असते. पण अशा स्वार्थी लोकांचा त्रास करुन घेण्यापेक्षा तुम्ही त्यांना समजावून पुन्हा नाते जोडण्याचा प्रयत्न करा. तुमचे प्रयत्नच तुम्हाला त्यांच्याजवळ नेतील

  1.  नाते सांभाळताना कधी कधी इतके झुकले जाते,
    की खूप जण आपल्याला अधिक झुकवायचा प्रयत्न करतात
  2.  कुटुंबातील एक स्वार्थी व्यक्ती संपूर्ण घर पोखरु शकते
  3.  स्वार्थ असावा तो घरातील लोकांमध्ये नसावा
  4. एकवेळ गोड बोलू नका पण घरातल्या
    घरात स्वार्थीपणा करु नका
  5.  केलेल्या प्रत्येक गोष्टीचा
    कारण हल्ली अनेक जण तू काय केले असे विचारतात
  6.  Ignore करायचं असेल तर करा,
    पण काम असेल तर पुन्हा येऊ नका
  7.  डोळे उघडे असतील तर स्वार्थी व्यक्ती पटकन ओळखता येतात
  8.  जीवनात दुसऱ्याला नाही,
    तर स्वत:ला बदला कारण
    त्यातच आपला फायदा असतो
  9.  कुटुंबात स्वार्थ असावा पण तो लोकांना एकत्र जोडणारा
  10.  नात्यांमध्ये गरज असावी,गरजेसाठी नाते नसावे

स्वार्थी प्रेमावरील कोट्स – Selfish Love Quotes In Marathi

Selfish Love Quotes In Marathi

 प्रेमातही अनेकदा स्वार्थीपणा येतो. काही स्वार्थीपणा हा त्रासदायक असतो. त्यातून काहीतरी शिकण्यासारखे असते स्वार्थी प्रेमावरील कोट्स selfish love quotes in marathi  खास तुमच्यासाठी. नवरा- बायको सहजीवनावरील कोट्स नाते अधिक दृढ करण्यासाठी नक्की पाठवा  

  1.  आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा,
    जे तुमच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करा
  2.  कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो,
    अशा व्यक्ती आपल्यापासून दूर राहतात
  3.  चेहरा बदलला तर त्रास होत नाही,
    पण माणसं बदलण्याचा खूप त्रास होतो
  4.  आजकालची नाती म्हणजे ज्याच्याशी
    जितके काम त्याच्याशी तितकेच प्रेम
  5.  मला असं वाटतं कधी कधी स्वार्थी होण्यातच
    इतकं शहाणपण आहे,
    कारण नि:स्वार्थ  माणसांच्या नशिबी कायम
    एकटं जगणं लिहिलेलं आहे
  6.  स्वार्थ कराल तिथे प्रेमाला कधीही जागा उरत नाही
  7.   ही दुनिया खूप मतलबी आहे,
    काम असेल तरच प्रेम करते नाहीतरी दुर्लक्ष करते
  8.  माझ्या स्वभावात चुका खूप असतील,
    पण मी कधीही कोणते नाते स्वार्थासाठी जोडले नाही
  9.  जगात खूप स्वार्थी लोकं असतात,
    जे आपलं काम झालं की,
    आपल्याला असे विसरतात की, आपण कोण आहोत याचा त्यांना विसर पडतो
  10.  स्वार्थी लोकं आयुष्यात आली की, आपल्याला आपली किंमत कळते

स्वार्थी माणसांसाठी स्टेटस मराठी – Status For Selfish Person In Marathi

Status For Selfish Person In Marathi

स्वार्थी माणसं कधीही बदलत नाही. त्यांच्यापासून चार हात दूर राहणे असणे फार गरजेचे असते. अशा स्वार्थी लोकांना ओळखून त्यांच्यापासून सावध राहण्यासाठी status for selfish person in marathi

  1.  स्वार्थी लोकांना समाजात मान मिळण्याची एकही संधी मिळत नाही
  2.  मतलबी नसते तर आयुष्य इतके वाईट नसते
  3.  मतलबी लोक आणि खोटी आश्वासने यापेक्षा एकटे राहणे बरे
  4.  स्वार्थी लोक आपल्या नेहमी आपल्या कर्तव्यांपेक्षा अधिक मौल्यवान वाटतात
  5.  मतलबी या दुनियेत केवळ स्वत: वर विश्वास ठेवणे गरजेचे असते
  6.  नाती ही आता व्यवसायासारखी झाली आहेत,
    प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त
  7.  आयुष्य प्रत्येकासाठी सारखे नसते
    जे काही स्वार्थाने केले जाते ते प्रेम नसते
  8.  स्तुतीच्या सागरात कधी तरी उडी मारा,
    तुम्हाला खोल गेल्यानंतर स्वार्थी माणसांचे जग
    किती खोल आहे ते कळेल
  9.  जिंकण्याची मजा तेव्हात येते,
    ज्यावेळी लोकं तुमच्या हरण्याची वाट पाहतात
  10.  जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा,
    पण स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवू नका

स्वार्थी नातेवाईकांवरील मराठी स्टेटस – Status On Selfish Relatives In Marathi

Status On Selfish Relatives In Marathi

 कधी कधी नातेवाईक हे देखील फार स्वार्थी असतात. अशा स्वार्थी नातेवाईकांसाठी खास मराठी स्टेटस Status On Selfish Relatives In Marathi पाठवायला हवं.

  1.  या स्वार्थी जगात लोकं, स्वत:साठी जगतात,
    त्यांच्या प्रियजनांसाठी नाही
  2.  ज्याला प्रेम समजतं, शब्द समजतो,
    तो वेळ पाळतो नि,
    ज्याला फक्त स्वार्थ समजतो,
    तो फक्त वेळ साधतो
  3.  नातेवाईकांचा खरा चेहरा तेव्हा कळतो,
    ज्यावेळी तुम्हाला त्यांची गरज असते
  4.  स्वार्थी नातेवाईकांच्या तुम्ही जितके दूर राहाल,
    तितकी तुमची प्रगती होईल
  5.  काही स्वार्थी संबंध न राखणे,
    हे व्यक्तिसाठी अधिक फायदेशीर असते
  6.  काही लोकं केवळ काम असतील त्यावेळीच नाती बनवतात,
    आणि त्यानंतर आपल्याला सोडून जातात
  7.  लोकांचा एकच गुणधर्म बनला आहे
    जो पर्यंत काम आहे तो पर्यंत साथ आहे
  8.  काही करु नका, पण स्वार्थीपणा दाखवू नका
  9.  रक्ताची नातीही त्रास देतात,
    जेव्हा ते स्वार्थीपणा करतात
  10. मिळालीच तुम्हाला संधी तर
    कोणाची मदत करण्यासाठी सारथी बना,
    स्वार्थी बनू नका

स्वार्थी मैत्रीवरील स्टेटस मराठी – Selfish Friends Status In Marathi

Selfish Friends Status In Marathi

मित्र हे आपल्या सगळ्यात जवळचे असतात. एखादा मित्र स्वार्थी असेल तर अशा मित्रांपासून चार हात दूर राहणे कधीही चांगले असते. अशा मित्रांना त्यांची चूक दाखवून देणेही तितकेच गरजेचे असते. खास स्वार्थी लोकांसाठी selfish friends status in marathi. या शिवाय खास मित्रांमध्ये शेअर करण्यासाठी मराठी फिशपाँड ही पाठवा

  1.  आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर तुम्ही स्वार्थी लोकांच्या मैत्रीची अपेक्षा करु नका
  2.  एक स्वार्थी मित्र हा तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन मार्गी लावतो
  3.  गद्दारांची चर्चा सुरु झाली, जुन्या मित्रांची आठवण झाली
  4. श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात,
    कारण साखरेलाच अधिक मुंग्या चिकटतात
  5.  आयुष्यात मित्र नसले तरी चालतील,
    पण कोणतेही मित्र स्वार्थी असता कामा नये
  6.  अनुभवाने शिकायला मिळाले कोणी कोणाचे नसते,
    केवळ कामासाठी अनेक जण जवळ येतात
  7.  स्वार्थी माणसाला सोडलेलेच बरे असते
    कारण अशा व्यक्ती आयुष्यात कधीही बदलू शकत नाहीत
  8.  एखाद्या व्यक्तीची गरज संपते,
    त्यावेळी त्याचे वागणेही बदलते
  9.  मित्र बनवा पण नि:स्वार्थपणे
  10.  एखादा मित्र सतत मागणी करत असेल तर
    त्यापासून दूर राहणे कधीही चांगले

स्वार्थीपणावरील कोट्स (Selfish Quotes In Marathi) शेअर केले आहेत. त्यातून बोध घेऊन तुम्ही तुमचे आयुष्य व्यतित करायला हवे. पण स्वार्थीपणाचे स्टेटस (Selfish Status In Marathi) समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम नक्कीच करतील.

Read More From DIY लाईफ हॅक्स