मनोरंजन

या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?

Leenal Gawade  |  May 15, 2019
या जुन्या मालिकांचे टायटल ट्रॅक तुम्हाला आजही आवडतात का?

टीव्हीवरील मालिका या मनोरंजनासाठी असल्या तरी त्या मनात कधी घर करुन बसतात आपल्यालाच कळत नाही. या मालिकेतील  कॅरेक्टरसोबतच लक्षात राहतात त्यांचे टायटल ट्रॅक… मराठी असो किंवा हिंदी अशा अनेक मालिका आहेत ज्यांचे टायटल ट्रॅक आजही अनेकांना आवडतात. जर तुम्ही 90-2000च्या दशकातील असाल तर तुम्हाला आम्ही सांगितलेल्या मालिकांचे टायटल ट्रॅक नक्कीच आवडत असतील. मग करुया सुरुवात

वेबसिरीज आल्या तरी आजही या मालिका अनेकांना आवडतात

 वादळवाट:

मराठी प्रेक्षक ही मालिका विसरुच शकत नाही. मराठी मालिकांमध्ये एक वेगळेपणा साधारण 90 च्या दशकात पाहायला मिळतात. कौटुंबिक पण वेगळ्या अशा या मालिका त्यावेळी मराठीमध्ये सुरु झाल्या होत्या.2002-2003 दरम्यान ही आलेली मालिका.. या मालिकेचे टायटल ट्रॅक अनेकांच्या मोबाईलचे रिंगटोन होते आणि आजही आहे…आदिती सारंगधर, अरुण नलावडे, मेघना वैद्य, शरद पोंक्षे, सुबोध भावे हे मालिकेत प्रमुख भूमिकेत होते. थोडी सागर निळाई… थोडे शंख नि शिंपले…कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले…कधी उतरला चंद्र.. तुझ्या माझ्या अंगणात… अशा या मालिकेच्या शीर्षक गीताच्या ओळी होत्या… आजही हे गाण अनेकांना आल्हाददायक वाटत. पुन्हा ऐकावसं वाटत.

#MeToo प्रकरणात तनुश्रीला नाही गोळा करता आली नानाविरोधात साक्ष

असंभव:

मराठी मालिकांच्या बदलत्या स्वरुपाविषयी आपण बोललो आणि असंभव या मालिकेविषयी बोलणार नाही असे अजिबात होणार नाही. पूर्नजन्मावर आधारीत ही मालिका होती.उमेश कामत, उर्मिला कामत या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते. दिवसामागून रात्र धावते… सकाळ संध्याकाळ… सुत्रधार तो या साऱ्यांचा नाव तयाचे काय..असंभव असे या मालिकेचे टायटल ट्रॅक होते. ही मालिका ही अनेकांच्या पसंतीस उतरली होती.

वाचा – लता मंगेशकर यांची मराठी भावगीत

कुलवधू:

माझी डोली चालली ग.. दूर देशी नव्या गावा.. तिकडे सोबतीला येईल माझ्या स्वप्नांचा रावा…. असे बोल असलेल्या या टायटल ट्रॅकला ही अनेकांची पसंती मिळाली.या मालिकेत मधुरा वेलणकर आणि सुबोध भावे या मालिकेत प्रमुख भूमिकेत होते. एक नवी जोडी या निमित्ताने या प्रेक्षकांच्या भेटीला आली.

हुमा कुरेशी करणार आता वेबसिरीत काम.. नेटफ्लिक्सवर येतेय वेबसिरीज

देख भाई देख:

या मालिकेने अनेकांना रिलॅक्स करायचे काम केले आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅकही तितकंच खास होतं.  जया बच्चन निर्मित ही मालिका त्या काळात खूपच प्रसिद्ध झाली होती. या सिरिअलचं टायटल ट्रॅक उदित नारायण यांनी गायले होते. इस रंगबदलती दुनिया मे क्या तेरा है क्या मेरा है… देख भाई देख… हर शाम के बाद सबेरा है… असे या गाण्याचे बोल होते.  ही मालिका त्या काळात इतकी सुपर डुपर हिट होती की हे गाणही त्यावेळी अनेकांच्या लक्षात होतं.

कसौटी जिंदगी की:

https://youtube.com/watch?v=nlj2OWKabKE

तशा तर बालाजी टेलिफ्लिसच्या अनेक मालिकांचे टायटल ट्रॅक प्रसिद्ध आहेत. पण या मालिकेची  प्रसिद्धी काही औरच होती. या मालिकेचा दुसरा अध्याय किंवा रिमेक सध्या टीव्हीवर सुरु आहे. चाहत के सफर मे दिलो के हौसले देखो…. ये अक्सर तुट जाते है… कभी आँसू बहाते है…. प्रेरणा आणि मिस्टर बजाज ची ही अनोखी प्रेमकहाणी …. त्यात हे टायटल ट्रॅक.. त्यातील प्रेरणाचा तो काळ्या रंगाचा सलवार सूट आजही कित्येकिंना आवडतो. हे आम्हाला लोकांच्या बोलण्यातून लक्षात आले. तुम्हाला सुद्धा हे गाणं आवडत का ?

(सौजन्य-Instagram,Youtube)

Read More From मनोरंजन