लाईफस्टाईल

Sex Education : जागरणाचा सेक्सलाईफवर असा होतो परिणाम

Leenal Gawade  |  May 12, 2022
जागरण आणि सेक्सलाईफ

 लवकर झोप न येणं हा सगळ्यांच्याच लाईफस्टाईलचा भाग झाला आहे. गेल्या तीन वर्षात तर अनेकांच्या सवयी बदलून गेल्या आहेत. काहींना चांगल्या सवयी लागल्यात तर काहींना चुकीच्या सवयी. रात्री उशीरा झोपणे सकाळी उशीरा उठणे. पण आता सगळे काही पूर्ववत झाले तरी देखील रात्री उशीरा झोपण्याची काही जणांची सवय काही सुटलेली नाही. अजूनही खूप जणांना रात्री उशीराच झोप लागते. या अपुऱ्या झोपेचा आणि रोजच्या जागरणाचा तुमच्या सेक्सलाईफवर विपरित परिणाम होऊ शकतो.  हे तुम्हाला महीत आहे का? नसेल तर आजचा विषय तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. 

अनेक जोडप्यांमध्ये सेक्सचे प्रमाण फारच कमी असते. कधी कधी अपुरी झोप आणि फोनचा अति वापर यामुळेही जोडीदाराकडे दुर्लक्ष होते. एकूणच यामध्ये जागरण प्रकर्षाने दिसून येते. याचा सेक्सलाईफवर (Sex) परिणाम होतो. अनेकांना ही गोष्ट जाणवतही असेल. नुसता सेक्सलाईफवरच नाही तर अनेक तऱ्हेने जोडप्यामधील प्रेम कमी करण्यास हा कारणीभूत ठरु शकतो.

सेक्सलाईफची मजा संपते

तुम्ही जेव्हा जोडीदाराला वेळ देता त्यावेळी होणारा शरीरसंबंध आणि करायचे म्हणून केलेले सेक्स यामध्ये खूप फरक असतो. सेक्स म्हणजे त्यामध्ये प्लेझरचा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. जर तुम्हाला प्लेझर मिळाले तर ते सेक्स सगळ्यात जास्त आवडणारे असते. पण नुसते करायचे म्हणून केलेले सेक्स काहीही कामाचे नसते. तुम्हालाही सेक्समध्ये अशी मजा आणि पॅशन जाणवत नसेल तर तुमचे लाईफस्टाईल त्यासाठी कारणीभूत आहे. आधीच शरीराला आलेला थकवा त्यामुळे अनेक जोडप्यांमध्ये सेक्स हे नावापुरतेच होते.

वीर्याची कमतरता

वंध्यत्व हा सध्याच्या घडीला अनेक जोडप्यांना होणारा त्रास आहे. हल्लीची लाईफस्टाईल पाहता खूप जणांना गर्भधारणा ही लगेच होत नाही. झालीच तर त्यात अनेक अडचणीही असतात. पुुरुष आणि स्त्री या दोघांना आलेला थकवा हा यासाठी कारणीभूत असतो. पुरुषांना वीर्याची कमतरता यामुळे नक्कीच जाणवू शकते. त्यामुळेही सेक्सची मजा येत नाही. अनेकांना थकवा इतका असतो की, सेक्समध्ये प्लेझर मिळायच्या आधीच ते थकून जातात. मग त्यासाठी बाजारात मिळणारी औषधांचे सेवन केले जाते. पण या सगळ्या क्षणिक गोष्टी आहेत. त्यामुळे तुमचे सेक्सलाईफ तात्पुरते सुधारते. पण त्याचा दूरगामी परिणाम तुमच्या नात्यावर होतो.

सेक्सची इच्छ न होणे

जागरणाचा हा सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे सेक्सची इच्छा न होणे. खूप जणांना सेक्सची इच्छा होत नाही. यासाठी जागरण हे कारणीभूत असू शकते. कामाचा ताण किंवा इतर काही गोष्टींमुळे जागायची सवय झालेली असेल तर अशावेळी खूप जणांना काहीही करावेसे वाटत नाही. त्यामुळे साहजिकच जोडीदारासोबत प्रेम करणे या गोष्टीही करायचा कंटाळा येतो. हा  कंटाळा पुढे जाऊन जोडप्यांच्या घटस्फोटाचे कारण बनतो. 

आता तुम्हीही सतत जागरण करत असाल आणि तर तुमचे सेक्स लाईफ नक्कीच धोक्यात येऊ शकते. 

Read More From लाईफस्टाईल