कधी कधी पुरूषांना कळत नाही की, त्यांच्यासमोर महिला फेक ऑर्गेजम (Fake Orgasm) दाखवत असतात. आपली जोडीदार आपल्या सेक्सनंतर संतुष्ट नाही ही भावना पुरूषांना नक्कीच दुखावणारी असते. त्यामुळे महिलांनी असं अजिबात करू नये. आपल्याला नक्की सेक्समध्ये (Sex) काय हवंय हे आपण आपल्या जोडीदाराला नक्कीच सांगायला हवं. तसंच महिलांनी सेक्समध्ये संतुष्टी मिळण्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनही करावे, जेणेकरून दोघांनाही संतुष्टी मिळू शकते. सेक्समध्ये दोघांनाही समाधान मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे महिलांनी सेक्स करताना कोणत्या चुका करू नका हेदेखील जाणून घ्यायला हवे.
बेडवर तुमची एनर्जी ढळू देऊ नका (Don’t Lose Your Energy On Bed)
प्रत्येक जोडीदाराला दिवसभर थकल्यानंतर तुमच्या सहवासाचा आणि प्रेमाचा स्पर्श हवा असतो. त्यामुळे घरी आल्यानंतर सेक्स हे महत्त्वाचे आणि मुख्य आकर्षण असते. पण तुमच्याकडून नकार मिळाल्यास, तुमच्या जोडीदारासाठी हे नक्कीच निराशाजनक ठरते. महिलांनाही कामामुळे संपूर्ण दिवसाचा थकवा असतो. पण नकार न देता तुम्ही सेक्स करताना तुमचा उत्साह जर घालवत असाल तर ते अत्यंत चुकीचे आहे. तुम्हाला उत्साह असेल तरच आपल्या जोडीदारासह सेक्स करा अन्यथा वेळीच नकार द्या. तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेईल अशा शब्दात आणि लाडातच त्याला योग्य नकार द्या. जेणेकरून तुमचा दोघांचाही मूड खराब होणार नाही.
केवळ बेडरूमध्ये सेक्स करणे (Sex in Bedroom)
सेक्स करण्यासाठी सतत बेडचाच वापर करणे चुकीचे आहे. तुम्ही सेक्स करण्यासाठी कधीतरी बेडरूमच्या बाहेरही येणे गरजेचे आहे. घरातील स्वयंपाकघर, बाथरूम, काऊंटर इत्यादी अशा जागा आहेत, जिथे तुम्हाला सेक्स करता येते. जोडीदारासह सेक्स करताना वेगवेगळ्या जागा निवडणे गरजेचे आहे. जेणेकरून तुम्हाला सेक्स करताना कंटाळा येणार नाही आणि तुमच्या जोडीदारालाही उत्साह राहील. सतत बेडरूममध्ये सेक्स करणे आणि तेच तेच करत राहणे कंटाळवाणे ठरू शकते.
अधिक बोलणे टाळा (Avoid More Talk)
सेक्स करताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर बोलण्याची गरज नाही. सेक्स करताना कोणत्याही अन्य विषयावर चर्चा करणे सहसा टाळा. जेव्हा सेक्स करायचा असतो तेव्हा कमीत कमी गोष्टी बोलल्या जातील आणि सेक्सवर अधिक लक्ष ठेवता येईल याची तुम्ही काळजी घ्या. अशावेळी अशाच गोष्टी बोला ज्या तुम्हाला अधिक सेक्ससाठी प्रवृत्त करतील. उदाहरणार्थ एकमेकांशी सेक्सबाबत बोलणं, आपल्या जोडीदाराला अधिक प्रोत्साहित करण्यासाठी आवाज काढणं. मात्र यावेळी घरातील अन्य गोष्टींबाबत बोलणं योग्य नाही.
सिंकमध्ये नसणं (Not in Sink)
चांगल्या सेक्ससाठी आपल्या जोडीदारासह नेहमी त्याच्या गतीप्रमाणे सेक्स करावे. त्याच्या लयीप्रमाणे सेक्स केल्यास, योग्य सेक्स होऊ शकतो. आपल्या गतीने सेक्स करणे आणि जोडीदाराचा विचार न करणे हे चुकीचे आहे. आपल्या जोडीदाराच्या गतीने तुम्ही ताळमेळ बसवल्यास, तुम्हाला आणि जोडीदाराला नक्कीच समाधान मिळते. तुम्ही दोघेही जेव्हा ही गोष्ट जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला अधिक चांगले समरस होता येईल.
लक्ष वळवू नका
जेव्हा तुम्ही सेक्स करत असता तेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराचे लक्ष विचलित करू नका. हे चुकीचे आहे. ज्या प्रेमात जोडीदार तुमच्याशी समरस होत आहे, त्याच प्रेमाने आणि त्याच भावनेसह तुम्ही समरस व्हायला हवे. कारण असं करण तुमच्या सेक्समध्ये त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे सेक्स करताना या गोष्टीकडेही तुम्ही नक्की लक्ष द्या.
आम्ही ज्या चुका तुम्हाला सांगितल्या आहेत, त्या तुम्ही अजिबात करू नका. योग्य आणि समाधानकारक सेक्स हवा असेल तर तुम्ही हे नक्की वाचायला हवे.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade