रणबीर कपूर सध्या आलिया भटसोबतच्या रिलेशनशीपमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण सध्या तो त्याच्या पुढील चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. तो सध्या शमशेरा या चित्रपटाचे शुटींग करत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील त्याला एक लुक व्हायरल झाला आहे. या आधी त्याच्या संजू या चित्रपटातील संजय दत्तच्या लुकची चर्चा होत होती आणि आता हा नवा लुक चर्चेचा विषय ठरत आहे. कारण यामध्ये रणबीर कपूर ओळखताच येत नाही.
ब्रेकअपनंतर श्रुती हसन खऱ्या प्रेमाच्या शोधात, म्हणाली…
डाकूची भूमिका
‘शमशेरा’ या चित्रपटाबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती. या चित्रपटाबद्दल रणबीर कपूरचा या आधी एक इंटरव्ह्यू घेण्यात आला. त्यावेळी त्याने समशेराबद्दल सांगितले होते. शमशेरा ही एका डाकूची कहाणी असून रणबीर कपूर यामध्ये डाकूची भूमिका साकारत आहे. हा डाकू आदिवासी लोकांसाठी इंग्रजांच्या विरोधात लढाई करतो. अशी या चित्रपटाची कहाणी आहे. हा चित्रपट अॅक्शन, ड्रामा, कॉमेडी असे सगळे काही असणार आहे. धर्मा प्रोडक्शनचा हा चित्रपट असून याचे शूटींग सुरु झाले आहे.
गावरान लुक
आता इंग्रजांच्या काळातील चित्रपट आहे म्हटल्यावर या चित्रपटातील रणबीरचा लुक हा वेगळाच असणार म्हणा. हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला हा रणबीर आहे हे ओळखताच येणार नाही. कारण या पूर्वी रणबीर असा कधीच दिसला नाही. या फोटोमध्ये रणबीरने खादी कुडता घातला असून त्याची बॉडी वेगळी दिसत आहे. त्याचे हे ट्रान्सफॉर्मेन्शन पाहिल्यानंतर हा रणबीर कपूर आहे असे अजिबात वाटत नाही. तो लुकमध्ये फारच वेगळा दिसत आहे.
तमन्नाला भेटस्वरूपात मिळाला जगातील मौल्यवान ‘हिरा’
टीझर आधीच झाला रिलीज
फिल्म मेकर्सने या आधी शमशेरा चित्रपटाचा टीझरही रिलीज केला आहे. 45 मिनिटांच्या या टीझरमध्ये रणबीर कपूर युद्धभूमीवर दिसत असून त्याच्या हातात कुऱ्हाड आणि धनुष दिसत आहे. डाकू असा तरी ही एका विधायक कामासाठीची लढाई असल्याचे यात म्हटले आहे. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत संजय दत्त, वाणी कपूर, रोनित रॉय, आशुतोष राणा आणि आहाना कुमरा दिसणार आहे. वाणी कपूर या चित्रपटात प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी 31 जुलै 2020 साली रिलीज होणार आहे.
रणबीरच्या या लुकचीही होणार चर्चा
रणबीर कपूरच्या या लुकचीही फार चर्चा होणार आहे. या आधीही त्याने त्याच्या लुकवर फार प्रयोग केले आहेत. संजूसाठी त्याने फारच मेहनत घेतली होती. जग्गा जासूस या चित्रपटातही एका कॉलेजवयीन मुलाची भूमिका त्याने अगदी चोख पार पाडली होती..आता हा त्याचा नवा लुकदेखील चर्चा करायला भाग पाडणार हे नक्की! त्या आधी धर्मा प्रोडक्शनचा ब्रम्हास्त्र हा चित्रपटदेखील येणार आहे. त्यामध्ये तो आलियासोबत दिसणार आहे.
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje