महिला आरोग्याद्च्या एका तक्रारीपैकी एक म्हणजे श्वेतपदर.. यालाच मराठीमध्ये अंगावरुन पांढरे जाणे असे म्हणतात. खूप महिलांना पांढरे जाण्याचा त्रास असतो. पण खूप जण याकडे दुर्लक्ष करतात. अंगावरुन पांढरे जाणे हे महिला आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. जर तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला काही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. खूप जणांना मासिक पाळी येण्याआधी शरीरातून पांढरे जाते असे वाटते. पण असे नाही. काही जणांना अंगावरुन पांढरे सतत जाते. श्वेतपदराची ही समस्या तुम्हाला होत असेल तर तुम्हाला यामागील कारणं आणि त्याची लक्षणं माहीत असायला हवीत. या शिवाय योनीच्या बाबतीत माहिती देखील प्रत्येकीला असायला हवी
वाचा- पिरेड्समध्ये वाढतं का वजन,जाणून घ्या तथ्य
अंगावरुन पांढरे जाण्याची कारणे
महिला आरोग्याच्या अनेक तक्रारींकडे दुर्लक्ष करतात. त्यापैकी एक म्हणजे अंगावरुन पांढरे जाणे. पांढरे जाण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. या पैकी काही कारणे खालीलप्रमाणे.
योनी मार्गातील इन्फेक्शन : खूप जणांना योनी मार्गाला इन्फेक्शन झालेले कळत नाही. पण अशावेळी जर तुमच्या अंगावरुन पांढरे जात असेल तर तुमच्या योनी मार्गाला इन्फेक्शन झाल्याची शक्यता असते. अंगावरुन जास्त पांढरे जात असेल तर तुम्ही तपासून घ्या.
गर्भाशयाला सूज: अंगावरुन पांढरे जाण्यामागे गर्भाशयाची सूज ही देखील कारणीभूत असू शकते. सतत पांढरे जात असेल तर तुम्ही याची देखील तपासणी करायला हवी. अंडाशयाचा कर्करोगाविषयी तुम्हाला माहिती असायला हवी
मानसिक तणाव: हल्ली महिला देखील तितक्याच तणावाखाली असतात. त्यामुळे ताण-तणावामुळे देखील महिलांना अशा प्रकारे श्वेतपदर जाण्याचा त्रास होण्याची शक्यता असते.
मधुमेह: मधुमेहामुळेही शरीरात अनेक बदल होतात. मधुमेहामुळे जंतुदोष होण्याची शक्यत अधिक जास्त होते. त्यामुळे अशा परिस्थितीतही अंगावरुन पांढरे जाऊ शकते.
स्त्रीबीज पाझर : महिलांना सेक्स किंवा तशी भावना आल्यानंतरही अशाप्रकारे पाझर सुटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशावेळात शरीरातून पांढरे जाणे एकदम स्वाभाविक आहे. त्यात काहीही घाबरण्याची गरज नाही.
लगेच जा डॉक्टरांकडे
तुम्हाला अगदी हलकासा स्त्राव होत असेल तर तो ठीक आहे. पण त्याचे प्रमाण आणि स्वरुप बदलले तर मात्र तुम्हाला लगेच डॉक्टरांकडे जाण्याची गरज आहे हे लक्षात घ्या.
- अंगावरुन जाणारे पांढरे खूप जाड आणि पिवळ्या रंगाचे असेल तर मात्र तुम्हाला त्याचे विपरित परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले
- स्त्रावाला जर खूप घाण येत असेल तर तुम्ही त्वरीत डॉक्टर गाठा कारण ते मुळीच चांगले लक्षण नाही.
- सतत ताप येणे, कंबर दुखणे आणि पोट दुखणे असे होत असेल तर ते देखील अजिबात चांगले नाही.
जर तुम्हाला असे बदल जाणवत असतील तर आताच त्याची काळजी घ्या.