मनोरंजन

श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर, या मालिकेतून येतोय परत

Trupti Paradkar  |  Jul 29, 2021
श्रेयस तळपदे पुन्हा झळकणार छोट्या पडद्यावर, या मालिकेतून येतोय परत

श्रेयस तळपदेने आज बॉलीवूडमध्ये स्वतःचं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. हिंदी मालिकांमध्येही त्याने चांगलीच प्रसिद्धी मिळवली. मात्र त्याला अभिनय क्षेत्रात खरी ओळख दिली ती मराठी मालिकांमधून…. आभाळमाया या मराठी मालिकेमधून श्रेयसने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पुढे अवंतिका मालिकेमधून त्याला त्याच्या अभिनयाची झलक दाखवता आली. बघता बघता त्याने हिंदी मालिका आणि चित्रपटांमध्ये कधी आपले पाय भक्कम केले हे कळलं सुद्धा नाही. आता श्रेयस पुन्हा मायमराठीकडे वळत मराठी टेलीव्हिजनवर कमबॅक करत आहे.

श्रेयस या मालिकेतून वळतोय पुन्हा मराठीकडे

छोट्या पडद्यावरूनच आणि मराठी मालिकेमधूनच श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती त्यामुळे पुन्हा त्याने या माध्यमात यावं ही कौतुकास्पद गोष्ट  आहे. झी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ” या मालिकेतून श्रेयस पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.या मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आणि या मालिकेची झलक पाहूनच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मालिकेचं कथानक वेगळं असून एक सुंदर प्रेमकथा या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत श्रेयस तळपदे सोबत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे प्रमुख भूमिकेत असणार आहे. या मालिकेतील इतर कलाकार आणि कथानक अजूनही गुलदस्त्यात असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल. या मालिकेच्या  प्रोमोमध्ये  दाखवण्यात येणाऱ्या  चिमुकलीने प्रेक्षकांची मने नक्कीच जिंकून घेतली आहेत.

श्रेयसला छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतूर

कमबॅकबद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “पुन्हा एकदा मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून एका दमदार कथानकासोबत पुनरागमन करताना मला प्रचंड आनंद होत आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका खूप वेगळी आहे ही एक अनोखी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे, यातील माझी भूमिका प्रेक्षकांना आपलीशी वाटेल.” श्रेयसने आजवर इक्बाल, वाह ताज, ओम शांती ओम, हाऊसफुल्ल, गोलमाल, गोलमाल 3 आणि 5, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल अगेन, मस्ती या  सारख्या हिंदी सुपरहिट चित्रपट आणि मराठीतून साररखेड एक गाव, सनई चौघडे, बाजी, पोस्टर बॉय्ज अशा मराठी चित्रपटातून काम केले  आहे.  बऱ्याच दिवसांपासून तो कोणत्याही माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेला नव्हता. त्यामुळे एका मोठ्या ब्रेकनंतर त्याचा पुन्हा माय मराठीमध्ये होत असलेला कमबॅक प्रेक्षकांना सुखावणारा आहे. 

होम मिनिस्टरमध्ये लिटिल चॅम्प्स मिळवून देणार पैठणीचा मान

नोरा फतेही आहे धकधक गर्लची फॅन, करायचं आहे माधुरीच्या बायोपिकमध्ये काम

केआरकेवर लागला विनयभंगाचा आरोप, मॉडेलने केली तक्रार

Read More From मनोरंजन