मनोरंजन

या अभिनेत्रीने दिलाय मुलीला जन्म, एक वर्षानंतर चाहत्यांना कळले

Dipali Naphade  |  Oct 14, 2021
shriya saran

‘दृष्यम’ फेम अभिनेत्री श्रिया सरनने (Shriya Saran) जेव्हा लग्न केले तेव्हाही तिने आपल्या चाहत्यांना धक्का दिला होता. आतादेखील तिने आपण आई झाल्याची बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. श्रियाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करत आपण मुलीला जन्म दिल्याचे सांगितले आहे. 2020 मधील क्वारंटाईन असलेला वेळ हा तिच्यासाठी अत्यंत सुखदायक आणि आयुष्यभरासाठीचा आठवणीचा राहिला आहे असं तिने सांगितलं आहे. एका बाजूला जिथे जगभरात सगळीकडे उलथापालथ चालू होती तिथे आमचे जग मात्र रोमांच, उत्साह आणि वेगवेगळ्या शिकवणीने भरले होते. आमच्या आयुष्यात एक लहानशी परी आली. आम्ही यासाठी देवाची खूप खूप आभारी आहोत, असं सांगत श्रियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

अधिक वाचा – ती’ आणि ‘ती’ पण आहे रीना मधुकरच्या आयुष्यातील आदिशक्ती

मुलीचं नाव आहे राधा 

याआधी श्रियाने आपला बॉयफ्रेंड आंद्रे कोशेव याच्याबरोबर लग्न केले तेव्हाही आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. यावर्षीच ऑगस्ट महिन्यात श्रिया भारतात पुन्हा एकदा राहायला आली आहे. तर आता तिने आपण आई झाल्याचे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहे. इतकंच नाही तर आपली मुलगी ही आपली सर्वात चांगली मैत्रीण असल्याचेही श्रियाने सांगितले आहे. एका मुलाखतीमध्ये श्रियाने सांगितले की, राधा आता नऊ महिन्यांची आहे आणि आता यापेक्षा जास्त ती आपल्या मुलीला लपवू शकत नाही. श्रिया आणि आंद्रेने कोविड 19 च्या महामारी दरम्यान कुटुंब वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अचानक संपूर्ण जग थांबलं होतं. आता मी पुन्हा काम सुरू केलं आहे. माझी मुलगी राधा 9 महिन्यांची आहे आणि आता मी तिला अजिबातच कोणाहीपासून लपवू शकत नाही असं श्रियाने एका मुलाखतीमध्येही स्पष्ट केले आहे. आपल्या मुलीच्या जन्मानंतर श्रिया खूपच आनंदी असून राधाचा जन्म बार्सिलोनामध्ये झालं असल्याचंही तिने सांगितलं आहे. 

अधिक वाचा – Bigg Boss Marathi: का वाढत चालली आहे जयबद्दल नाराजी

मुंबईमध्ये राहते श्रिया

श्रिया भारतात परत आली असून आपला पती आंद्रेसह ती आता मुंबईमध्ये राहात आहे. तर तिने गरोदरपणानंतर वजन कमी केले असल्याचेही सांगितलं आहे. आता तिला सेटवर जाण्याचा अनुभव परत घ्यायचा आहे. सध्या श्रिया अभिनेता शरमन जोशी (Sharman Joshi) याच्याबरोबर एका फिल्म ए म्युझिकल स्कूलमध्ये काम करत आहे. तसंच यानंतर ती एका तेलुगू चित्रपटातही काम करत आहे, जो चित्रपट हिंदीसहित अनेक भाषांमध्ये डब होणार आहे. अनेक वर्ष नात्यात राहिल्यानंतर श्रियाने लग्न करून ज्याप्रमाणे धक्का दिला होता. त्याचप्रमाणे मुलगी इतकी मोठी झाल्यानंतरच श्रियाने आपल्या चाहत्यांना ही बातमी दिली आहे. त्यामुळे चाहत्यांना आनंद झाला असून सध्या तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 2018 मध्ये श्रियाने उदयपूरमध्ये लग्न केले होते. तर ती काही काळ भारताच्या बाहेर राहात होती. नुकतीच ती भारतात परत आली असून कामालाही सुरूवात केली आहे. 

अधिक वाचा – सूर्यवंशीसाठी रोहीत शेट्टीचा अनोखा प्रमोशन फंडा, असा करणार प्रचार

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From मनोरंजन