मनोरंजन

घटस्फोटाची चर्चा सुरु असताना सिद्धार्थने शेअर केला बायकोसोबत फोटो

Leenal Gawade  |  Jun 28, 2022
सिद्धार्थ आणि तृप्ती

 मराठी इंडस्ट्रीमधील ज्या बातमीने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या ती बातमी म्हणजे सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) आणि त्याची पत्नी तृप्ती यांच्या घटस्फोटाची. सिद्धार्थसोबत त्याची पत्नी गेल्या काही दिवसांपासून दिसत नाही.हे दिसून आले होते. त्यामुळे त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. पण आता सिद्धार्थने मुलगी स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर केला आणि त्यामुळे सगळ्यांनाच सुखद धक्का बसला आहे. शिवाय तिचा फोटा शेअर करत सिद्धार्थनेदेखील त्याच्या नात्यात सगळे काही आलबेल आहे असे दाखवून दिले आहे. चला जाणून घेऊया या विषयी अधिक 

आणि तृप्ती दिसली….

खरंतरं गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ आणि तृप्तीमध्ये काहीतरी गडबड आहे हे दिसून आलं होतं. कारण या दोघांचे फोटो एकत्र दिसत नव्हते. सिद्धार्थ मुलींसोबत एकत्र असला तरी देखील त्या फोटोमध्ये तृप्ती काही केल्या दिसत नव्हती.त्यामुळे अनेकांनी त्यांच्या नात्यासंदर्भात काही प्रश्न उभे केले होते. त्यातच सिद्धार्थ-तृप्तीच्या घटस्फोटाची चर्चा सुरु झाली. त्यांनी घटस्फोटाचा रितसर अर्ज केला आहे असेही सांगितले जात होते. पण सिद्धार्थने मुलगी स्वराच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फॅमिली फोटो शेअर केला आहे. त्या फोटोच्या अगदी मधोमध तृप्ती बसलेली दिसत आहे. तृप्तीला पाहून अनेकांना सुखद असा धक्का बसला आहे. या दोघांचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर काही गोष्टींना फुलस्टॉप मिळाला असला तरी देखील या चर्चा काही केल्या थांबणार नाही असेच दिसत आहे. आता हा फोटो फक्त बातम्या येऊ नये म्हणून केलेल्या आहेत का? असाही संशय अनेकांना आहे. 

सिद्धार्थ आणि तृप्तीमध्ये बिनसलं तरी काय?

सिद्धार्थ आणि तृप्ती ही एक आदर्श अशी जोडी आहे. कारण अनेक संघर्ष करुन मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत जागा मिळवण्यासाठी या सिद्धार्थने खूप प्रयत्न केले आहेत. त्याला तृप्तीची साथ आहे. सिद्धार्थने देखील हे अनेकदा मुलाखतीत सांगितले आहे. पण आता लग्नाच्या इतक्या वर्षानंतर वेगळे होण्याचे नेमके कारण काय? या संदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. पण गेल्या दोन वर्षांपासून हे दोघे वेगळे राहात आहेत असे सांगितले जात आहे. मध्यंतरी सिद्धार्थ दुबईला गेला होता. त्यावेळीही त्याच्या फोटोमध्ये केवळ मुली दिसत आहे. त्यात तृप्ती कुठेही दिसत नाही. त्यामुळे कारण हे अजूनही गुलदस्यात आहे असे म्हणावे लागेल. दरम्यान, चाहत्यांनाही हे दोघे वेगळे होऊ नये असेच वाटते.

या जोडीच्याही घटस्फोटाची चर्चा

एकीकडे सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाची चर्चा असताना आणखी एक सेलिब्रिटी कपल म्हणजे उर्मिला आणि आदिनाथ यांच्याही नात्यात काहीही आलबेल नसलेलं दिसून आलं आहे. हे दोघेही एकमेकांसोबत राहात नाहीत असे दिसत आहे. उर्मिला ही आदिनाथपासून फारच दुरावल्याचे दिसून येत आहे. चंद्रमुखी सारख्या मोठ्या चित्रपटात नवऱ्याची मोठी भूमिका असतानाही तिने उपस्थितीती लावणे गरजेचे समजले नाही. शिवाय तिने एकत्र पोस्ट करणेही बंद केले आहे. त्यामुळे या जोडीकडेही अनेकांचे लक्ष आहे. 

आता सिद्धार्थ आणि तृप्तीचे नाते पूर्ववत व्हावे हीच इच्छा आहे .

Read More From मनोरंजन