आरोग्य

उपाशीपोटी खाऊ नका आलं, होईल नुकसान

Trupti Paradkar  |  Feb 17, 2022
उपाशीपोटी खाऊ नका आलं, होईल नुकसान

आलं आणि आल्याचा रस नियमित खाण्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि इनफेक्शन होत नाही. कोरोनाच्या काळात स्वयंपाकातही आल्याचा वापर यामुळे लोकांनी वाढवला आहे. वजन कमी करण्यासाठी आणि पचनशक्ती सुधारण्यासाठी आलं स्वयंपाकात असणं गरजेचं आहे. दररोज आल्याचा गरम गरम चहा अथवा काढा घेतला की घसा, नाक आणि पोट निरोगी राहते. थोडक्यात आले खाण्याचे फायदे आरोग्यासाठी आणि केसांसाठी (Ginger Benefits In Marathi) अनेक आहेत. मात्र काही लोक यासाठी उपाशीपोटी आल्याचा रस अथवा काढा पितात.आल्यामुळे घशाला आराम मिळतो यासाठी उपाशीपोटी आलं कधीच खाऊ नये. जाणून घ्या याचे दुष्पपरिणाम…

यासोबतच जाणून घ्या जाणून घ्या लसूण खाण्याचे फायदे | Lasun Khanyache Fayde

उपाशीपोटी आलं खाण्यामुळे काय होतं 

अनोशी पोटी म्हणजे सकाळी उठल्यावर काहीच न खाता जर तुम्ही आलं अथवा आल्याचा रस घेतला तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावर होतात.

अपचन होणे

रात्री जेवल्यानंतर सकाळी नाश्ता करेपर्यंत तुमचे पोट रिकामे असते. त्यामुळे सकाळी उठल्यावर पोटाला आराम मिळेल असे पदार्थ सेवन करायला हवेत. आलं योग्य प्रमाणात खाणं गरजेचं आहे जर तुम्ही अती प्रमाणात आलं खाल्लं तर त्यामुळे तुमच्या पोटात गॅस पकडू शकतो. ज्यामुळे अपचन, जळजळ, आंबट पाणी तोंडात येणे असे त्रास होतात. बऱ्याचदा लोक सकाळी उपाशीपोटी आल्याचा चहा घेतात जे आरोग्यासाठी मुळीच चांगले नाही.

वजन अती प्रमाणात कमी होणे

वजन कमी करण्यासाठी उपाशी पोटी आल्याचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण आल्यामधील अॅंटि ऑक्सिडंटमुळे तुमचे मोठ्या प्रमाणावर वजन कमी होते. मात्र अधिक प्रमाणात असं सकाळी उपाशीपोटी आलं खाणं तुमच्या आरोग्यासाठी मुळीच योग्य नाही. कारण यामुळे तुमचे प्रमाणापेक्षा जास्त वजन झपाट्याने कमी होते. ज्याचा दुष्परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. 

छातीत जळजळ होणे

सकाळी रिकाम्या पोटी जे लोक आल्याचा रस घेतात त्यांना छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. कारण  आल्यामुळे तुमच्या पोटात अॅसिडिटी निर्माण होते. तोंडावाटे आंबट पाणी येण्यामुळे तुमच्या छातीत यामुळे जळजळ होते. काही लोकांना पोट फुगणे, श्वासाला त्रास होणे अथवा पोटात दुखणे, छातीत दुखणे असा त्रासही यामुळे होतो. 

मासिक पाळीच्या समस्या वाढतात

महिलांना महिन्यातून एकदा मासिक पाळीच्या समस्या जाणवतात. काही महिलांना मासिक पाळीत जास्त त्रास होतो. जर तुम्ही या काळात सकाळी उपाशी पोटी आल्याचा रस घेतला तर तुमचा त्रास अधिक वाढू शकतो. कारण आलं उष्ण आहे ज्यामुळे तुमचे रक्त पातळ होण्यास मदत होते. मासिक पाळीत उपाशी पोटी आलं खाण्यामुळे तुम्हाला मासिक पाळीत अतिस्त्राव जाणवू शकतो. 

जुलाबाचा त्रास होणे

आलं हे उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे आल्याच्या सेवनामुळे शरीरात उष्णता वाढण्याची शक्यता असते. अती प्रमाणात शरीरात उष्णता वाढणं शरीरासाठी फायद्याचं नाही.काही लोकांना यामुळे शरीरावर लाल रंगाचे चट्टे उठणे, उलटी अथवा जुलाबाचा त्रास होऊ शकतो. जर अती प्रमाणात होत असतील तर जुलाब वर घरगुती उपाय (Julab Gharguti Upay In Marathi)

कधी आणि किती करावे आल्याचे सेवन

आलं शरीर आणि आरोग्यासाठी जरी  फायद्याचं असलं तरी ते कधी आणि किती प्रमाणात खावं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात एक चमचा आल्याचा रस घेणं योग्य राहिल. गरोदर महिलांना जास्त आल्याचा रस मुळीच सेवन करू नये. सकाळी उपाशी पोटी आलं मुळीच खाऊ नये या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरात एक ते दोन चमचे आल्याचा रस नक्कीच घेऊ शकता.

Read More From आरोग्य