Fitness

प्रत्येक आजारावर खात असाल ‘पेनकिलर’ तर वेळीच सावध व्हा

Dipali Naphade  |  Sep 7, 2019
प्रत्येक आजारावर खात असाल ‘पेनकिलर’ तर वेळीच सावध व्हा

आजकालच्या आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपलं शरीर हे मशीनसारखंच काम करत राहातं. रात्री किमान 8 तासाची व्यवस्थित झोप मिळू शकेल याचीही खात्रीही नसते. या सगळ्या गोष्टींमुळे डोकेदुखी, पोटदुखी अथवा कधीकधी शरीरामध्ये पेटके येणं ही अतिशय साधारण बाब झाली आहे. यापूर्वी बऱ्याचदा या सगळ्यापासून सुटका मिळण्यासाठी घरगुती उपाय केले जायचे त्याची जागा आता मात्र एक पेनकिलर (Pain Killer) घेतली आहे. आयुष्याच्या या धावपळीत आपल्याला जाणवत असलेला त्रासही आपल्याला लगेच बरा करायचा असतो. अशावेळी बरेच जण प्रत्येकवेळी पेनकिलरचा आधार घेतात. पेनकिलर हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय सर्वांना वाटतो. पण तुम्हाला माहीत आहे का ही सवय सर्वात वाईट सवय ठरू शकते? कशी ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही जर सतत पेनकिलर घेत असाल तर हे नक्की वाचा आणि वेळीच सावध व्हा. 

पेनकिलरची सवय लागली असेल तर वेळीच व्हा सावध

Shutterstock

एक पेनकिलरने तुमचा त्रास नक्कीच कमी होतो. डोकेदुखीपासून ते कंबरदुखी, पोटदुखी, पायाचा त्रास या सगळ्यातून लवकर सुटका मिळवायची असेल तर नक्कीच तुम्हाला सर्वात पहिले समोर काय दिसत असेल तर पेनकिलर. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेडिकल स्टोअर्समध्ये डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तुम्हाला ही पेनकिलर विकत घेता येते. मग अगदी जरासं डोकं दुखलं तरीही काही जण पेनकिलरचा आधार घेतात. पण तुमची ही सवय तुमच्यासाठी नुकसानदायी ठरू शकते. यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरावर घातक परिणाम सहन करावे लागतात. 

आम्ही तुम्हाला अशाचा काही दुष्परिणांबाबत (Side Effects) सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही नक्कीच पेनकिलर खाणं कमी कराल आणि ही सवय सोडून द्याल अथवा लावून घेणार नाही. 

पोटदुखीचा त्रास

Shutterstock

बऱ्याचदा मासिक पाळीच्या दिवसात होणाऱ्या पोटदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी मुली पेनकिलरचा आधार घेतात. कधी कधी ठीक आहे पण प्रत्येक महिन्यात अशी सवय लावून घेणं चुकीचं आहे. पेनकिलरचं जास्त सेवन हे पोटामध्ये गॅसची समस्या निर्माण करतात. तसंच यामुळे सतत तुम्हाला जळजळ, आंबट ढेकर येणं आणि उलटी होणं याचाही त्रास होण्याची शक्यता वाढते. 

Kiss करण्याचे असतात अफलातून फायदे, आरोग्य राहातं निरोगी

लिव्हरवर प्रभाव

Shutterstock

पेनकिलरची सवय आपल्या लिव्हरवर खूपच वाईट परिणाम करते. अधिक प्रमाणात पेनकिलरचं सेवन केल्यास, लिव्हरचे सेल्स तुटण्याची भीती असते आणि त्यामुळे भूक कमी लागणं हे सर्वात मोठं लक्षण दिसून येतं. तुम्हाला अशी समस्या निर्माण झाली तर तुम्ही त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे अन्यथा त्याचा लिव्हरवर अधिक वाईट परिणाम होण्याची शक्यता असते. 

वजन वाढण्याची समस्या

Shutterstock

पेनकिलर प्रमाणापेक्षा अधिक खाल्ल्यास, तुमचं वजन वाढण्याचीही शक्यता असते. तुम्ही नेहमी पेनकिलर घेत असाल तर तुम्हाला वजनामध्ये नक्कीच फरक जाणवेल. तुम्ही पेनकिलर घेणं कमी करा. पण असं करत असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायलाही विसरू नका.  

जीभेच्या रंगावरून ओळखा तुमच्या आरोग्य समस्या

कॉन्स्टिपेशन अथवा लूज मोशन्स

तुम्ही जी पेनकिलर घेत आहात ती तुमच्या शरीराला प्रत्येकवेळी सूट करेलच असं नाही. बऱ्याचदा पेनकिलरच्या सेवनाने तुम्हाला कॉन्स्टिपेशन अथवा लूज मोशन्सच्या त्रासालाही सामोरं जावं लागू शकतं याची माहिती करून घ्या. 

रिकाम्या पोटी कधीच घेऊ नका

Shutterstock

रिकाम्या पोटी पेनकिलर घेण्याने तुमच्या शरीरामध्ये गॅस आणि अॅसिडिटीचं प्रमाण अधिक वाढतं. त्यामुळे तुमची तब्बेत अधिक बिघडण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे पेनकिलर घेण्याआधी तुम्ही काहीतरी खाल्लेलं असणं अत्यंत गरजेचं आहे.

योगासन केल्यामुळे होतं आरोग्य निरोगी

Read More From Fitness