रागी एक असे धान्य आहे ज्यामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. रागी (Ragi) अर्थात याला अनेक नावांनी ओळखलं जातं. मराठीत याला नाचणी असं म्हणतात. तसंच मंडुआ, फिंगर मिलेट अशीही याची नावे आहेत. पण रागी हे नाव अधिक प्रसिद्ध आहे. रागी अर्थात नाचणीचा वापर बऱ्याचदा सूप, भाकरी, वेफर्स अशा स्वरूपाचे पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. यामध्ये कॅल्शिमय, कार्बोहायड्रेट, पोटॅशियम फायबर, लायसिन अॅमिनो अॅसिड, मेथियोनिन आणि विटामिन डी असे अनेक पोषक तत्व आढळतात. ज्यामुळे शरीराला फायदा मिळतो. नाचणीमध्ये काही पोषकद्रव्ये आपल्या नेहमी वापरात असणाऱ्या म्हणजेच गहु, तांदूळ, ज्वारी यांच्या पेक्षा जास्त प्रमाणात आहेत. यात खनिजद्रव्ये, तंतुमय पदार्थ आणि काही जीवनसत्वांचा समावेश होतो. नाचणीमध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ व उर्जा साधारणपणे इतर तृणधान्या इतकीच आहे. पण नाचणीपासून अर्थात रागी अति प्रमाणात खाल्ल्यास त्याचा तोटाही होतो. याचा नक्की काय तोटा असतो ते पण आपण या लेखातून जाणून घेऊया.
किडनी
किडनीमध्ये कोणतीही समस्या असेल अथवा तुम्हाला किडनी स्टोनची समस्या असेल तर तुम्ही नाचणी खाणे योग्य नाही. नाचणीमुळे किडनीला अधिक त्रास होतो. नाचणी ही किडनीसाठी अत्यंत हानिकारक मानली जाते. त्यामुळे तुम्हाला तत्सम आजार असल्यास, रागी अर्थात नाचणीचे सेवन करू नये. नाचणी जितकी आरोग्याला चांगली आहे तितकाच त्याच्या अति सेवनाने त्रासही होतो. त्यामुळे खाण्यापूर्वी केवळ फायदेच नाही तर त्याचे तोटेही जाणून घेणे गरजेचे आहे. किडनीला त्रासदायक ठरणारी नाचणी तुम्ही योग्य प्रमाणात खायला हवी.
थायरॉईड
Freepik
थायरॉईडचा ज्या व्यक्तींना त्रास आहे अशा व्यक्तींसाठी नाचणीचे सेवन हे नुकसानदायी ठरू शकते. नाचणीचे सेवन करून थायरॉईडचा त्रास अधिक होतो. तसंच थायरॉईड असताना नाचणी अर्थात रागीचे अति सेवन केले तर त्याचा उलट परिणाम भोगावा लागतो.
जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं आणि उपाय (Thyroid Symptoms In Marathi)
डायरिया
रागीमध्ये असे अनेक गुण आढळतात ज्यामुळे तुम्हाला डायरिया, पोटात गॅस निर्माण होण्याची शक्यता होते. तुम्हाला आधीपासूनच पोटात गॅस तयार होण्याची समस्या असेल तर तुम्ही नाचणीचे सेवन करणे शक्यतो टाळा. यामुळे तुम्हाला अधिक त्रास होऊन पोटात दुखू शकते.
डाएटमध्ये करा मिलेट्सचा समावेश होईल फायदा
बद्धकोष्ठ
Freepik
ज्या व्यक्तींना बद्धकोष्ठतेची समस्या आहे. त्यांनी रागीचे सेवन न करणेच योग्य. नाचणी पटकन पचत नाही. त्यामुळे शौचाला जाताना अधिक त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला मुळातच त्रास असेल तर तुम्ही नाचणीचे सेवन करू नका. एका विशिष्ट वयानंतर अन्नाचे पचन होण्यास काही जणांना त्रास होतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या ही अत्यंत कॉमन झाली आहे. पण तुम्हाला जर हा त्रास असेल तर तुम्ही अजिबात नाचणीचे अर्थात रागीचे सेवन करू नका.
नाचणीपासून तयार केलेल्या ‘या’ सोप्या आणि पौष्टिक रेसिपीज
थंडीत करू नका सेवन
रागी अर्थात नाचणी ही शरीरासाठी थंडावा आणते. त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसात नाचणीचे सेवन अधिक करू नये. पावसाळा आणि हिवाळा या दोन्ही ऋतूंमध्ये नाचणी खाणे टाळा. उन्हाळ्यात याचे सेवन करणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. शरीराला थंडावा देण्यासाठी याचा उपयोग होतो.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक